कृषी यांत्रिकरणाचा लाभ घ्यायचा आहे ? मग असा करा अर्ज अन् मिळवा योजनेचा लाभ

( Krushi Yantrikikaran Yojana 2021) सर्वाद जलद गतीने रुजलेली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण. या योजनेचा लाभ कसा घ्यावयचा यासाठी काय नियम अटी आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत.

कृषी यांत्रिकरणाचा लाभ घ्यायचा आहे ? मग असा करा अर्ज अन् मिळवा योजनेचा लाभ
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 6:48 PM

लातूर : यांत्रिकीकरण (mechanization ) या शेती व्यवसायतला अविभाज्य घटक झालेला आहे. (Essential factors in the agricultural business) काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल होऊन शेतकरी आता आधुनिकतेची कास धरत आहे. शिवाय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सरकारही वेगवेगळ्या योजना राबवत आहे. शिवाय याची जनजागृती झाल्यामुळे शेतकरी लाभ घेत आहेत. ( Krushi Yantrikikaran Yojana 2021) सर्वाद जलद गतीने रुजलेली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण. या योजनेचा लाभ कसा घ्यावयचा यासाठी काय नियम अटी आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत.

Krushi Yantrikikaran Yojana 2021 कमी खर्चात जास्तीत जास्त शेती उत्पादनासाठी यांत्रिकीकरण आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण म्हणजे जेथे शक्य असेल तेथे यांत्रिकीकरणाद्वारे शेता कामे करुन घेण्याची प्रक्रीया. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत यांत्रिकीकरणासाठी कर्ज व इतर सुविधा पुरविल्या जातात ज्यानुसार शेतकरी कमी किंमतीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात. कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 अंतर्गत ट्रॅक्टर, श्रेडर, उडणारी फॅन, औषध फवारणी पंप, डस्टर, सिंचन पंप इत्यादी सुविधा ग्रामीण बँकेमार्फत पुरविल्या जातात.

यांत्रिकीरणामध्ये शेतकऱ्यांना 80 टक्के पर्यंत अनुदान हे दिले जाते. जेणेकरुन शेतकरी ही साधने घेऊन शेतीचा विकास करु शकणार आहे. उत्पादनवाढीसाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करीत असून यांत्रिकीकरण या त्यामधीलच एक भाग आहे.

कोणत्या उपकरणाला किती अनुदान याची माहिती

पंपसेट (7.5 H.P पर्यंतच्या पंपसेटला त्याच्या किमतीच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10000 हजापपर्यंत अनुदान मिळते.

40 H.P पर्यंतच्या ट्रॅक्टरला त्याच्या मूळ किमतीच्या निर्धारित किमतीच्या 20% अथवा जास्तीत जास्त 45000 रुपये एवढे अनुदान प्रस्तावित आहे.

8 H.P पॉवर टीलरला त्याच्या किमतीच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 45000 हजार रुपयेपर्यंतचे अनुदान हे मिळते.

उस तोडणी यंत्राली त्याच्या किमतीच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 20000 हजार रुपये अनुदान मिळते.

8 H.P किंवा त्यापेक्षा अधिकच्या पॉवर टीलरला त्याच्या किंमतीच्या 40% अथवा जास्तीत जास्त 45000 रुपये

पॉवर थ्रेशरला मुळ किमतीच्या 40 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 20000 हजार रुपये मिळतात.

ट्रॅक्टर फवारणी यंत्राकरिता 25 टक्के निधी अनुदान स्वरुपात किंवा 4000 हजार रुपये हे देऊ केले जातात.

ट्रक्टरसाठी रोटावेटर हा महत्वाचा घटक आहे. रोटावेटरच्या निर्धारित किमतीच्या 50 टक्के किंवा 30000 हजार रुपये देऊ केले जातात.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकर्‍याचे आधारकार्ड.

बँकेचे पासबूक.

7/12 आणि 8 अ.

जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे original बिल.

जर ट्रॅक्टर शेतकर्‍याचे नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.

अटी व नियम

शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

शेतकर्‍यांच्या नावावर जमीन असावी.

अर्जदार जर अनुसूचीत जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 ऑनलाइन अर्ज

तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2021 चा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर कृषी विभागाचे मुखपृष्ठ उघडेल.

मुखपृष्ठावरच तुम्हाला Online Application किंवा Link 2 असे पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकि कोणत्याही एका पर्यायवर क्लिक करावे लागेल.

नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर Krushi Yantrikikaran Yojana 2021 चा अर्ज उघडेल.

अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागेल. (चुकीची माहिती आढल्यास तुम्ही पात्र ठरणार नाही)

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला Submit Button वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज भरतांना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुमच्या गावाकरिता निवडण्यात आलेल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून त्रुटी दूर करता येतात. (Development of agriculture due to mechanization, take advantage of the scheme)

संबंधित बातम्या :

पाऊस, अतिवृष्टी नंतर आता बुरशीचा प्रादुर्भाव, फळबागांच्या उत्पादनात निम्म्याने घट

वखार महामंडळाचा अनोखा उपक्रम, शेतीमालाला मिळणार योग्य दर

खरीपाच्या अंतिम टप्प्यात हमीभाव केंद्रचा आधार, किनवटमध्ये खरेदी केंद्र

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.