Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojna : दोन विभागांमध्ये धूसफूस लाखो शेतकरी लाभापासून वंचित, योजनेतही राजकारण?

पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात असली तरी राज्य सरकारची अंमलबजावणी ही महत्वाची आहे. यामध्ये महसूल आणि कृषी विभागाचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची यादी, खाते क्रमांक, लाभ न मिळाल्यास नेमक्या त्रुटी काय याची पाहणी ही महसूल विभागालाच करावी लागणार आहे. तर शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास घेण्यास पात्र आहे का याची शहनिशा ही कृषी विभागाच्या माध्यमातून केली जाते.

PM Kisan Yojna : दोन विभागांमध्ये धूसफूस लाखो शेतकरी लाभापासून वंचित, योजनेतही राजकारण?
पीएम किसान सन्मान योजनेसाठीची नोंदणी आता मोबाईलद्वारेही करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 10:53 AM

पुणे : (PM Kisan Yojna) पीएम किसान योजना ही (Central Government) केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात असली तरी राज्य सरकारची अंमलबजावणी ही महत्वाची आहे. यामध्ये महसूल आणि (Agricultural Department) कृषी विभागाचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची यादी, खाते क्रमांक, लाभ न मिळाल्यास नेमक्या त्रुटी काय याची पाहणी ही महसूल विभागालाच करावी लागणार आहे. तर शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे का याची शहनिशा ही कृषी विभागाच्या माध्यमातून केली जाते. शिवाय केंद्र सरकारने कामाची विभागणी करुनही स्थानिक पातळीवर कृषी आणि महसूल विभागातील धूसफूसीचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि योजनेवर झालेला आहे. या महत्वकांक्षी योजनेचा राज्यातील तब्बल 8 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारचे आदेश असनाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे काम पूर्ण झाले नसल्यानेच ही स्थिती ओढावल्याचे समोर आले आहे.

आता कॅम्पच्या माध्यमातून सावरासावर

पीएम किसान योजनेचा लाभ तळागळातील शेतकऱ्यांना मिळावा शिवाय योजनेत पारदर्शकता येण्याच्या अनुशंगाने आता 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यापूर्वी गावस्तरावर कॅम्पचे आयोजन करुन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामध्ये महसूल आणि कृषी विभागाचा समोवेश राहणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच अपात्र असूनही ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून वसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, महसूल आणि कृषी विभागाच्या अंतर्गत मतभेदाचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. आता याची सावरासावर करण्यासाठीच अशी भूमिका घेतली असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

नेमके काय आहे धूसफूस?

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत नेमका सहभाग कुणाचा यावरुन कृषी आणि महसूल विभागात मतभेद आहेत. योजनेच्या सुरवातीला महाराष्ट्राने चांगली कामगिरी केल्यामुळे केंद्राकडून राज्याचा गौरव करण्यात आला होता. या दरम्यान, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे राबायचे आम्ही आणि गुणगौरवाच्या दरम्यान कृषी विभाग असे का? असा सवाल महसूल विभागाने उपस्थित केला होता. तेव्हापासूनच या योजनेचे काम स्थानिक पातळीवर सुरळीत झालेले नाही.

आता नेमके काय पाऊल उचलले जाणार?

राज्यातील 8 लाख शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी आता स्थानिक पातळीवर यंत्रणा राबणार आहे. महसूल आणि कृषी विभागातील मतभेद दूर करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात कृषिमंत्री दादा भुसे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडली होती. असे असतानाही स्थानिक पातळीवरील मतभेद हे मिटलेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण राहिले आणि शेतकरी योजनेपासून वंचित राहिले आहेत.

संबंधित बातम्या :

धरण उशाला अन् कोरड घशाला : उजनी जलाशयालगतच्या केळी बागा जमिनदोस्त, नेमके कारण काय?

कापसाचे उत्पादन वाढले पण उत्पादकांचे स्वप्न हवेतच विरले, ‘कापूस ते कापड’ उपक्रमाचे काय झाले ?

Papaya : पपई लागवडीस पोषक वातावरण, कृषितज्ञांच्या 10 टीप्स वापरा अन् भरघोस उत्पादन मिळवा

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.