Kharif Season :  पीक कर्जाचे वाटप कासव गतीने, शेतकरी अडचणीत असतानाही बँकांचा आखडता हात, व्यापारी बँकांचा मनमानी कारभार

मराठवाड्यात खरीप हंगामात पीककर्ज वाटप करताना यंदाही व्यापारी बँकांनी हाथ आखडताच घेतल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेनी दिलेल्या उद्दिष्टांच्या आसपास शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. मात्र, 6728 कोटी 54 लाखांचे उदिष्ट असलेल्या व्यापारी बँकांनी केवळ 1734 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शिवाय आता हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना व्यापारी बॅंक उद्दिष्ट पूर्ण करणार कशी असा सवाल उपस्थित आहे.

Kharif Season :  पीक कर्जाचे वाटप कासव गतीने, शेतकरी अडचणीत असतानाही बँकांचा आखडता हात, व्यापारी बँकांचा मनमानी कारभार
खरीप हंगामात दुबार पेरणी करावी लागत असतानाही शेतकऱ्यांनी पीक कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही.
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 9:35 AM

नांदेड : (Kharif Season) खरीप अन् रब्बी हंगामातील पेरणी ही पैशाविना रखडू नये म्हणून हंगामाच्या सुरवातीलाच (Crop Loan) पीक कर्ज योजना ही राबवली जाते. यंदा तर महाराष्ट्र सरकारने अर्थसंल्पात तरतूद करताच अंमलबजावणीबाबत बॅंकांना कर्ज वितरणाचा सूचना केल्या होत्या. असे असतानाही आता खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात असतानाही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट सोडा शेतकऱ्यांना मागणीनुसार देखील पुरवठा झालेला नाही. केवळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिलेल्या उद्दिष्टानुसार वाटप केले आहे. (Nanded District) नांदेड जिल्ह्यासह मराठावाडा विभागात व्यापारी बॅंकांनी मात्र, हाथ आखडताच ठेवलेला आहे. गत तीन महिन्याच्या काळात या बॅंकेने नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ 1 लाख 64 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज दिले आहे. त्यामुळे एकीकडे निसर्गाचा लहरीपणा अन् दुसरीकडे सुल्तानी संकट कायम असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. आता उर्वरित काळात ही बॅंक उद्दिष्टपूर्ती करणार का नाही हे पहावे लागणार आहे.

शासन आदेशाला केराची टोपली

कोणतीही औपचारिकता न बाळगता अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीनुसार पीक कर्जाचे वाटप करावे अशा सूचना राज्य सरकारने बॅंकांना दिल्या होत्या. शिवाय कर्ज वाटपाचे उद्दिष्ट हे वर्षभरात पूर्ण करायचे असते त्यामुळे अनेक बॅंका हा आर्थिक वर्ष संपत असताना कर्जाचे वितरणावर भर देत होत्या. मात्र, नियमावलीत बदल करीत 1 एप्रिलपासून कर्ज वाटपाच्या सूचना असतानाही व्यापारी बॅंकांना त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे सरकारचा उद्देश आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल का नाही याबाबत संभ्रमता कायम आहे.

नांदेड जिल्ह्यातील काय आहे स्थिती?

मराठवाड्यात खरीप हंगामात पीककर्ज वाटप करताना यंदाही व्यापारी बँकांनी हाथ आखडताच घेतल्याचे चित्र आहे. जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेनी दिलेल्या उद्दिष्टांच्या आसपास शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. मात्र, 6728 कोटी 54 लाखांचे उदिष्ट असलेल्या व्यापारी बँकांनी केवळ 1734 कोटी 83 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. शिवाय आता हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना व्यापारी बॅंक उद्दिष्ट पूर्ण करणार कशी असा सवाल उपस्थित आहे. शेतकऱ्यांनी बॅंकांच्या दरात येण्यापूर्वी बॅंक अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्ज द्यावी अशा सूचना होत्या. परंतू, प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने नांदेड जिल्ह्यात या बॅंकेने केवळ 1 लाख 64 हजार शेतकऱ्यांनाच कर्ज दिले आहे.

हे सुद्धा वाचा

पीक कर्जाचा उद्देश काय ?

सध्या शेत शिवारात खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज लक्षात घेता ही पीक कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. तीन टक्के व्याजजराने परतफेड आणि नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमध्ये सूट असे योजनेचे स्वरुप आहे. यंदा निसर्गाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणी असल्याने या कर्जाची गरज आहे तर दुसरीकडे बॅंका हात आखडता घेत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.