Garlic Crop : लसून पिकातील किड व रोगांचे ‘असे’ करा एकात्मिक व्यवस्थापन

लसणाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. अशा या अधिक नफा देणाऱ्या लसणाच्या उत्पादनात किड व रोगांमुळे नुकसान होते. कांद्याप्रमाणे लसणामध्ये फुलकिडे, पिवळे कोळी या किडीमुळे आणि तपकिरी करपा, जांभळा करपा, भुरी, कंदकुज यासारख्या रोगांमुळे फार नुकसान होते. त्यामुळे वेळीच त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Garlic Crop : लसून पिकातील किड व रोगांचे 'असे' करा एकात्मिक व्यवस्थापन
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 7:02 AM

लातूर : कांद्याप्रमाणेच मानवी आहारात लसणाचे खूप महत्व आहे. ( garlic crop) लसणाचा वापर प्रत्येक भाजी मध्ये केला जातो. लसणाचे औषधी गुणधर्म देखील आहे. यामुळे या लसणाला वर्षभर मागणी असते. लसणाची लागवड ( Rabi season) रब्बी हंगामात केली जाते. अशा या अधिक नफा देणाऱ्या लसणाच्या उत्पादनात किड व रोगांमुळे नुकसान होते. कांद्याप्रमाणे लसणामध्ये फुलकिडे, पिवळे कोळी या किडीमुळे आणि तपकिरी करपा, जांभळा करपा, भुरी, कंदकुज यासारख्या रोगांमुळे फार नुकसान होते. त्यामुळे वेळीच त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

लसणावरील प्रमुख किडी

फुलकिडे : रसशोषक वर्गातील आकाराने अतिशय लहान, पिपळ्या तपकिरी रंगाचे फुलकिडे मधल्या पोंग्यात राहतात. पोंग्यात राहून कोवळया पातीतून रसशोषण करत असतात. फुलकिड्यांनी केलेल्या जखमामुळे करप्यासारखे बुरशीजन्य रोग वाढतात. 25 – 35 अंश सेल्सिअस तापमानात फुलकिड्याची वाढ चांगली होते.

एकत्मिक व्यवस्थापन

लसूण लागवड दरम्यान मका लागवड केल्यास फुलकिड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते तसेच गव्हाची लागवड देखील फायद्याची ठरते. नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित करावा. जास्त नत्र दिल्यामुळे कोवळी पात वाढून फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. लसूण उगवळ्यानंतर किंवा लागवडीपूर्वी फोरेट 10 % दाणेदार कितनाशक हेक्टरी 10 किलो या प्रमाणात टाकावे. उगवणीनंतर 15 दिवसांनी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.कितकनाशके फवारताना त्यात चिकद्रव्य मिसळावे. फवारणी करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी.

पिवळा कोळी

आकाराने अतिशय लहान, चपळ, पिवळ्या रंगाची ही किड पानातील रस शोषण करते. पानावरती पांढरे चट्टे पडतात. लसणाचे कंद पोसत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव दिसू लागताच डायमियोएट 30 ईसी 15 मिली किंवा इथिऑन 10 मिली किंवा ॲबामेकटीन 3 मिली किंवा डायकोफॉल 10 मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 80 डब्ल्यू पी 20 ग्रम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. परत 10 -15 दिवसांनी एक फवारणी करावी लागणार आहे.

लसणावरील प्रमुख रोग

जांभळा करपा : या बुरशीजन्य रोगामुळे पातीवर पिवळसर – जांभळे, काळपट डाग पडतात. प्रादुर्भाव वाढत जाऊन पात करपते. या रोगाच्या वाढीसाठी धुके, पानावर पडणारे द्रव, असे वातावरण अनुक्ल असते. याचे व्यवस्थापन करण्यासाठी मॅन्कोझेब 75 डब्ल्यूपी 30 ग्रम किंवा क्लोरोथॅलोनिल 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

पिवळसर करपा

पातीवर लहान-लहान पिवळे डाग पडतात. अशा डागांचा आकार वाढत जाऊन पाने पिवळसर – तपकिरी होऊन कुरपतात . या रोगसही वाढत आर्द्रता आणि तापमान अनुकूल ठरते . फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढल्यास हा करपा रोग वाढतो. त्यामुळे लागवडीपूर्वी लसणास कार्बन्डेझिमची बीजप्रक्रिया करावी. तसेच धुके, दव पडल्यास फवारणी करावी. फवारणी करण्यासाठी डायथेन एम – 45 30 ग्रॅम किंवा कार्बन्डेझिम 50 डब्ल्यू पी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. याचबरोबर नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करून रसशोषक किडी व बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन करता येईल.

संबंधित बातम्या :

Kharif Season : खरिपातील या दोन पिकांच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण..!

PM KISAN : 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर, अशी करा आपल्या नावाची तपासणी !

PM Kisan : कशामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.