Special Story | Dragon Fruit चं गुजरातमध्ये नामकरण, महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट शेतीची स्थिती काय?

Dragon Fruit : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रुटचं नामकरण केल्याचं जाहीर केल्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

Special Story | Dragon Fruit चं गुजरातमध्ये नामकरण, महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट शेतीची स्थिती काय?
उत्तम आरोग्यासाठी खूप उपयुक्त ड्रॅगन फळ
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 8:21 AM

मुंबई: भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात झटापट झाली. भारताचे 20 सैनिक या झटापटीत शहीद झाले. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीमुळे दोन्ही देशात तणाव वाढला. केंद्र सरकारनं अतर्गत सुरक्षेचा मुद्दा पुढं करत टिक-टॉक ते पबजी या चिनी अ‌ॅप्ससह 100 पेक्षा अधिक अ‌ॅप्सना दणका दिला. आता याचं लोण थेट चीनमधील एका प्राण्याच्या नावानं असणाऱ्या फळाच्या नामांतरापर्यंत पोहोचलं. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रुटच्या नामकरणाची घोषणा केली. यावेळी त्यांनी यामागे राजकारण नसल्याची भूमिका नसल्याचं स्पष्ट करत ड्रॅगन फ्रुट कमळासारखं दिसत असल्यानं त्याचं नाम कमलम असं केल्याचं सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर ड्रॅगन फ्रुट ट्रेंड झालं, अनेकांनी मीम्स देखील बनवल्या. यापार्श्वभूमीवर ड्रॅगन फ्रुट शेती गुजरातचे शेतकरी करतात तर महाराष्ट्रातले शेतकरी काय करतात, असा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातले शेतकरी देखील ड्रॅगन फ्रुट शेतीमध्ये मागे नाहीत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील शेतकरी दहा वर्षांपासून ड्रॅगन फ्रुट शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवतायतं. (Dragon Fruit Farming in Gujrat and Maharashtra)

ड्रॅगन फ्रुट नाव चिनी पण मूळ मेक्सिको

ड्रॅगन फ्रुट हे नाव जरी चिनी वाटतं असलं तरी हे फळ मुळचं दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे. सध्या या फळाची शेती संपूर्ण जगभर केली जाते. या फळाला पिटाया, पिटाहाय आणि स्ट्रॉबेरी पिअर या नावानं ओळखलं जातं. प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या या फळाची शेती अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलियायसह चीन आणि भारतात होत आहे. 1963 मध्ये या फळाला ड्रॅगन फ्रुट म्हटलं जातं.

गुजरात राज्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रुटच्या नामांतराची घोषणा केल्यानं हे फळ चर्चेत आलं. मोठ्या प्रमाणावर विटॅमिन असलेल्या ड्रॅगन फ्रुटची शेती गुजरातमधील कच्छ, जामनगर, नर्मदा आणखी काही जिल्ह्यात केली जात आहे. कच्छ जिल्ह्यातील 150 ते 200 शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे 1000 एकरांवर ही शेती केलीय. काही शेतकरी ग्रीन हाऊसमध्ये शेती करतात. काही पारंपारिक पद्धतीनंही याची शेती करताना पाहायला मिळतात. गुजरातमध्ये साधारणपणे 2014 ते 2015 पासून ड्रॅगन फ्रुटची शेती केल्याचं पाहायला मिळतं.

दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना संधी

महाराष्ट्रातील दुष्काळी आणि कमी पाण्याची सोय उपलब्ध असणाऱ्या भागातील शेतकरी ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. साधारणपणे ड्रॅगन फ्रुटच्या दोन रागांमध्ये 10 फुटांचं अंतर ठेवण्यात येते. तर, एका रांगेतील दोन खांबांमध्ये 7 फुटाचं अतर ठेवलेलं असते. ड्रॅगन फ्रुटची लागवड करताना 5 ते 6 फुट उंचीचे सिमेंटचे खांब त्यावर सिमेंटची किंवा टायरची रिंग बसवावी लागते. तर, सिमेंटच्या खांबाभोवती चारी बाजून ड्रॅगन फ्रुटची रोपं लावली जातात. पाण्याचा निचरा होण्यासाठी खाबांभोवती 3 फुटांचा बेड घ्यावा लागतो. त्यामध्ये शेण खताचा वापर केला जातो. या पिकाला कमी पाणी लागत असल्यानं ड्रीप इरिगेशनचा वापर करावा लागतो. खडकाळ जमिनीवरही हे पीक घेता येते. रासायनिक खतांचा वापर करावा लागत नाही.

कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ड्रॅगन फ्रुटची लागवड करता येईल. या शेतीमध्ये आंतरपीक घेता येते. एका एकरामध्ये सरासरी एक टनाच्या आसपास उत्पन्न होते. ड्रॅगन फ्रुटला एका किलोला सरासरी 200 रुपयांच्या आसपास दर मिळतो. एकदा लागवड केल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर ते दीड वर्षानंतर फळ येण्यास सुरुवात होते. रोपं, पोल, ड्रीप आणि खत असा एकूण एकरी 3 लाखांचा खर्च येतो. मार्च ते मे या जास्त उन्हाळ्याच्या महिन्यांशिवाय इतर महिन्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जाते. झाडापासून फळ तोडल्यानंतर 10 ते 15 दिवसांपर्यंत पीक टिकते

महाराष्ट्रात कुठे शेती होते?

राज्यातील अनेक शेतकरी बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या शेतीकडे वळत आहेत. राज्यात 2012 पासून ड्रॅगन फ्रुटची शेती केली जाते. पुणे, सांगली, बीड, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी निवडूंगवर्गीय ड्रॅगन फ्रुटची शेती केली जाते. वडिलोपार्जित शेतीतून अनेक शेतकरी ड्रॅगन शेतीकडे वळत आहेत.

ड्रॅगन फ्रुटची विक्री

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील बाजार समित्यामध्ये विक्री केली जाते. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये ड्रॅगन फ्रुटची विक्री केली जाते. एकदा लागवड केल्यानंतर व्यवस्थित निगा राखल्यास 20 ते 25 वर्ष हे पीक टिकते. पहिल्यांदा लागवडीचा खर्च केल्यानंतर पुन्हा पुढील वर्षांमध्ये लागवड खर्च कमी येतो. महाराष्ट्रातील शेतकरी व्हाईट आणि रेड ड्रॅगन फ्रुटची शेती केली जाते. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि हरयाणा राज्यातील शेतकरी ड्रॅगन फ्रुटकडे वळत आहेत. ड्रॅगन फ्रुटची खाणारा वर्ग तयार होत असल्यानं शेतकऱ्यांनी चांगली संधी आहे.

संबंधित बातम्या

ड्रॅगन फ्रुटच्या वाढत्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न? फळाचं चक्क नावच बदललं

(Dragon Fruit Farming in Gujrat and Maharashtra)

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...