Kharif : मान्सूनपुर्व पावसामुळे शेत शिवारात मशगतीच्या कामाची लगबग, शेती मशागतीचे महत्व काय?
उन्हाळी हंगामातील पेरणीला उशिर झाला असला तरी पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी योग्य वेळी झाली आहे. काढणीनंतर लागलीच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असताना आता मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेत जमिन ही पेरणी योग्य होणार असून यंदा खरिपात उत्पादन वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
नांदेड : यंदा (Monsoon) मान्सून वेळेत दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह काही वेगळाच आहे. शिवाय मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने (Agricultural cultivation) शेती मशागतीची कामे करणे सोईस्कर होणार आहे. (Summer Season) उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर लागलीच मराठवाड्यातील लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नांगरण, मोगडणी आणि कुळवणी आदी कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांकडे आता वेळ कमी असल्याने यंत्राच्या सहाय्याने हा कामे आटोपून घेतली जात आहे. मशागतीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असले तरी त्याची तमा न करता ही कामे आटोपून घेतली जात आहेत.
पेरणीपूर्व मशागत ही महत्वाचीच
शेतीची मशागत ही खरीप हंगामापूर्वीच करावी लागते. वर्षातून एकदा ही मशागत करुन उत्पादनवाढीचा शेतकऱ्यांचा प्रयत्न राहतो. मशागत केल्याने शेतजमिन ही भुसभुशीत होते. शिवाय उत्पादन वाढीसाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे. यामुळे जमिनीचा पोत वाढतो तर तणविरहीत पिकांसाठी मशागत करणे गरजेचे आहे. उन्हाळी पिकांची काढणी होताच पावसाला सुरवात होईपर्यंत ही कामे आटोपून घेतली जातात. यातच आता मान्सूनपुर्व पावसाने हजेरी लावल्याने शेती कामांना वेग आला आहे.
यंदा सर्वकाही वेळेतच
उन्हाळी हंगामातील पेरणीला उशिर झाला असला तरी पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी योग्य वेळी झाली आहे. काढणीनंतर लागलीच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असताना आता मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेत जमिन ही पेरणी योग्य होणार असून यंदा खरिपात उत्पादन वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. शिवाय मान्सूनचे आगमनही वेळेत होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.त्यामुळे यंदा सर्वकाही वेळेवर झाले तर गतवर्षी खरिपात झालेले नुकसान भरपाई यंदा निघेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.
मृग नक्षत्रानंतर पेरणीला होणार सुरवात
यंदा सर्वकाही वेळेवर होत असले तरी 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यात 1 जूनपासून पावसाला सुरवात होईल असा अंदाज आहे. पुरेशा पावसानंतरच पेरणी झाली तर दुबार पेरणीचे संकट ओढावत नाही. दरवर्षी मृग नक्षत्रात पेरणी कामे उरकतात. सध्या पेरणीपूर्व सर्व शेती कामे उरकली गेली आहेत. प्रमाणात पाऊस झाला तर पेरण्या देखील वेळेत होणार आहेत.