Osmanabad : पावसाने वाढ खुंटली अन् गोगलगायीने पीक फस्त केलं, अवघ्या काही दिवसांमध्ये खरिपाचं होत्याचं नव्हतं झालं

नैसर्गिक संकटानंतर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते. पण अद्यापही अनेक ठिकाणी पंचनाम्याला देखील सुरवात झालेली नाही. पावसानंतर काही तासांमध्ये पंचनामे झाले तर त्याच्या नुकसानीची दाहकता लक्षात येते. मात्र, पावसाने उघडीप देऊन आता चार दिवस उलटले तरी कृषी विभागाचे अधिकारी फिरकलेले नाही. त्यामुळे उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि कैलास पाटील यांनी पिकांची पाहणी केली आहे.

Osmanabad : पावसाने वाढ खुंटली अन् गोगलगायीने पीक फस्त केलं, अवघ्या काही दिवसांमध्ये खरिपाचं होत्याचं नव्हतं झालं
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवष्टीमुळे खरिपातील पिके पाण्यात आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 5:01 PM

उस्मानाबाद : मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांवरील धोका टळलेला नाही. मध्यंतरीच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली तर आता गोगलगायीच्या वाढत्या प्रादुर्भावाने पिकेच फस्त होत आहेत. सोयाबीन, कापूस, मूग या पिकांवर गोगलगायी ताव मारत आहेत. पिके कोवळी असतानाच गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांची वाढ तर सोडाच (Crop Damage) पिकेच फस्त केली जात असल्याने खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडेल तरी कसे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. बीडनंतर (Osmanabad Farmer) उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गोगलगायीची संख्या वाढत आहे. त्यामुळे पीक पाहणी करुन पंचनामे आणि त्वरीत शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

खरीप हंगामातील पिकांची पेरणी होताच वरुणराजाने सलग 15 दिवस हजेरी लावली. यामुळे शेत शिवरात पाणी साचून तर राहिले आहे. पाण्यात पिके असल्याने वाढ तर खुंटलीच शिवाय पिके पिवळीही पडलेली आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन शेंग अवस्थेपर्यत वाढणार की नाही अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्यसरकारने अद्याप ही पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले नाहीत माञ या शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

लोकप्रतिनिधींकडून आढावा

नैसर्गिक संकटानंतर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते. पण अद्यापही अनेक ठिकाणी पंचनाम्याला देखील सुरवात झालेली नाही. पावसानंतर काही तासांमध्ये पंचनामे झाले तर त्याच्या नुकसानीची दाहकता लक्षात येते. मात्र, पावसाने उघडीप देऊन आता चार दिवस उलटले तरी कृषी विभागाचे अधिकारी फिरकलेले नाही. त्यामुळे उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि कैलास पाटील यांनी पिकांची पाहणी केली आहे. शिवाय नुकसानभरपाईचीही मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

गोगलगायीवर असे मिळवा नियंत्रण

पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.