सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

जमिन क्षेत्राचा उल्लेख सातबाऱ्यावर आहे पण पोटखराबा म्हणून, त्यामुळे अशा जमिनी शेतकऱ्यांना वहित अर्थात वापरात आणत्या येत नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांपासून अशा पोटखराबा जमिनीबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेण्याच्या तयारीत होते. सातबाऱ्यावर पोटखराबा असा उल्लेख ब्रिटीश काळापासून आहे. आता पोटखराबा हा उल्लेखच हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ही जमिन देखील शेतकऱ्यांना वहित करता येणार आहे.

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 2:28 PM

जळगाव : (Farm Land) जमिन क्षेत्राचा उल्लेख सातबाऱ्यावर आहे पण पोटखराबा म्हणून, त्यामुळे अशा जमिनी शेतकऱ्यांना वहित अर्थात वापरात आणत्या येत नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांपासून अशा पोटखराबा जमिनीबाबत (State Government) राज्य सरकार योग्य तो निर्णय घेण्याच्या तयारीत होते. सातबाऱ्यावर पोटखराबा असा उल्लेख ब्रिटीश काळापासून आहे. आता पोटखराबा हा उल्लेखच हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ही जमिन देखील (Farmer) शेतकऱ्यांना वहित करता येणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार असून सुरवातीला जळगावात हा उपक्रम सुरु केला जाणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया कसे असेल याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पोटखराबा क्षेत्राचा उल्लेख वहिवाटाखालील क्षेत्रात केला जाणार आहे.

पोटखराबा म्हणजे काय?

शेतकऱ्यांच्या जमिन क्षेत्रातूनच ओढे, नाले यांची उभारणी केली जाते. ही कामे शासनाच्या माध्यमातून होत असली तरी प्रत्यक्षात ही जमिन वहिवाटाखाली आणणे शक्य नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनी असूनही त्याचा वापर हा करता येत नव्हता. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर झाली तर क्षेत्रही वाढणार आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.

कशी होणार आहे प्रक्रिया?

-महसूल विभागाअंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सुरवातीला तलाठी पाहणी करणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना 16 प्रकराचे अर्ज तलाठ्यांकडे जमा करावे लगणार आहेत. – पोटखराबा जमिन वहिवाटाखाली आणण्यासाठी तलाठी गावातील गट क्रमांक निहाय जमिनीची माहिती संकलित करावी लागणार आहे. – यानंतर जबाब,पंचनामा आणि हस्तकेच नकाशा तयार करावा लागणार आहे. हा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे. – मंडळ अधिकारी देखील या अहवालातील 10 टक्के गट शिवारातील पाहणी करतील आणि आपल्या अभिप्राय हा तहसीलदार यांना देतील. – तहसीलदार हे गावनिहाय माहिती ही उपअधीक्षक भूमीअभिलेख यांच्याकडे अभिप्रायसाठी पाठविणार आहेत. यानंतर भूमी अभिलेखचे उपअधीक्षक हेच पोटखराबा जमिन वहिवाटाखाली येणार का नाही यासंबंधी अहवाल तहसीलदार यांना देणार आहेत. – या प्रक्रियेत तहसीलदार यांचीही भूमिकाही महत्वाची आहे. – अंतिम टप्प्यात भूमी अभिलेख कार्यालयाकडून अहवाल हा तहसीलदार, तलाठी यांच्याकडे आल्यानंतर यावर पोटखराबा क्षेत्र हे वहिवाटाखाली आल्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market: जे शेतकऱ्यांच्या मनात तेच सोयाबीनच्या बाजारात, अखेर चार महिन्यानंतर…

Success Story : कोरडवाहू जमिनीवर द्राक्षाची बाग, ध्येयवेड्या उमेशची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.