Onion : कांद्याच्या घटत्या दरावर रामबाण उपाय, ना वाहतूकीचा खर्च ना दरातील चढ-उताराची धाकधूक..!

ढगाळ वातावरणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीतून कांद्याची काढणी, छाटणी करुन कांदा बाजारपेठेत जाईल याची व्यवस्था केली मात्र, असे असूनही दरात मोठी घसरण झाली आहे. 33 रुपये किलो जाणारा कांदा आता 9 रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आता विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला आहे. कांदा चाळीचा आधार घेऊन शेतकऱ्यांना किमान 8 ते 9 महिने कांदा साठवता येतो.

Onion : कांद्याच्या घटत्या दरावर रामबाण उपाय, ना वाहतूकीचा खर्च ना दरातील चढ-उताराची धाकधूक..!
उन्हाळी हंगामातील कांद्याची साठवणूक केली जात आहे.
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 3:28 PM

पुणे : मागच्या दोन महिन्यात (Onion Rate) कांदा दराचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आलाच आहे. हंगामाच्या सुरवातीला विक्रमी दर आणि आता कवडीमोलात विक्री अशी अवस्था झाली आहे. खरिपातील लाल कांद्यानंतर लागलीच (Summer Season) उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली होती. शिवाय ढगाळ वातावरणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीतून कांद्याची काढणी, छाटणी करुन कांदा बाजारपेठेत जाईल याची व्यवस्था केली मात्र, असे असूनही दरात मोठी घसरण झाली आहे. 33 रुपये किलो जाणारा कांदा आता 9 रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आता विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिला आहे. (Onion rice) कांदा चाळीचा आधार घेऊन शेतकऱ्यांना किमान 8 ते 9 महिने कांदा साठवता येतो. आता दरवाढीची चिन्हंच नसल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा भविष्यात फायदा होणार आहे.

कांद्याचे संरक्षण आणि योग्य दरही

वातावरणातील बदलाचा सर्वात आगोदर परिणाम हा कांदा पिकावर होतो. मध्यंतरीची अवकाळी आणि वाढते ऊन यामुळे काढलेल्या कांद्याला देखील धोका निर्माण झाला आहे. कांदा हा नाशवंत आहे. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. महिन्याभरात चारपटीने दर घसरले असल्याने आता वाहतूकीचा खर्चही शेतकऱ्यांना परवड नाही. त्यामुळे कांद्याचे संरक्षण आणि भविष्यातील योग्य दर मिळावा या अनुशंगाने कांद्याची साठवणूक केली जात आहे. यामध्येही एकसारखा कांदा साठवणूक न करता त्यास ऊन द्यावे लागते शिवाय कांदा नासला तर नाही याची पाहणी करावी लागते.

आता भाव वाढल्यावरच विक्री

कांद्याचे दर हे अधिकच्या काळासाठी स्थिर राहतच नाहीत. याचा अभ्यास आता शेतकऱ्यांनीही केला आहे. त्यामुळे शेतकरीही योग्य वेळ साधण्याचा शोधात आहे. अवघ्या काही दिवसांच्या फरकाने कांद्याचे घसरले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आता योग्य दर मिळाल्याशिवाय कांदा विक्रीसाठी बाहेर काढलाच जात नाही. जून-जुलैमध्ये पुन्हा दरात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच चाळीतला कांदा विक्रीसाठी काढला जाणार आहे.

कांदाचाळीत अशी घ्या काळजी

1) कांदा चाळीतील कांदा सडू नये म्हणून एकाच ठिकणी अधिकच्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करु नये. शिवाय साठवणूक करण्यापूर्वी कांदा हा तीन ते चार वेळेस कडक ऊन्हामध्ये वाळवणे आवश्यक आहे.

2) कांदा वाळवल्यानंतर लागलीच तो गोण्यामध्ये भरुन ठेऊ नये किंवा ढीग घालून एकत्र ठेऊ नये. त्यामुळे ढीगाच्या खाली असलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण होते.

3) कांदा चाळीत ठेवलेल्या कांद्याची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे. किमान जो कांदा खराब झाला आहे त्याला बाहेर काढून इतर कांद्यापासून दूर ठेवावे. जेणेकरुन इतर कांदे सडणार नाहीत.

संबंधित बातम्या :

Sugarcane: अगोदर अतिरिक्त ऊसाचा अहवाल मग तोडणीचे नियोजन, नगदी पिकातून शेतकऱ्याचे नुकसान

चाळीसगाव बाजार समिती उभारणार शेतकऱ्यांच्या हिताची गुढी, निर्णय छोटाच पण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा

Nanded मध्ये तीव्र उष्णतेच्या झळांमुळे केळीची पाने कोमेजली, लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.