…म्हणून गव्हाच्या पेऱ्यात घट, शेतकऱ्यांनी निवडला वेगळा पर्याय

1 नोव्हेंबरपर्यंत राज्यात गव्हाचा पेराच झाला नसल्याची नोंद कृषी विभागाकडे होती. नोव्हेंबरमध्येही अवकाळी पाऊस झाल्याने पेरणीला वेग आलेला नाही. शिवाय शेतकऱ्यांनी ज्वारी आणि गव्हाला पर्याय म्हणून मोहरीवर भर दिलेला आहे. रब्बीतील ज्वारी आणि गहू ही मुख्य पिके असली तरी घटते दर आणि काढणीचा त्रास यामुळे शेतकरी आता मोहरीचा पर्याय निवडत आहेत.

...म्हणून गव्हाच्या पेऱ्यात घट, शेतकऱ्यांनी निवडला वेगळा पर्याय
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 11:05 AM

लातूर : पावसामुळे (Rabi season) रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत. (impact of rain on sowing) त्यामुळे ज्वारीच्या पेऱ्यात घट होणार अपेक्षित होते तर गव्हाच्या पेऱ्यात वाढ होणार असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. मात्र, 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यात गव्हाचा पेराच झाला नसल्याची नोंद कृषी विभागाकडे होती. नोव्हेंबरमध्येही अवकाळी पाऊस झाल्याने पेरणीला वेग आलेला नाही. शिवाय शेतकऱ्यांनी ज्वारी आणि गव्हाला पर्याय म्हणून मोहरीवर भर दिलेला आहे. रब्बीतील ज्वारी आणि गहू ही मुख्य पिके असली तरी घटते दर आणि काढणीचा त्रास यामुळे शेतकरी आता मोहरीचा पर्याय निवडत आहेत. शिवाय ज्यांच्यावर पावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे त्या शेतकऱ्यांनी तर मोहरीवरच भर दिलेला आहे.

मोहरीची पेरणी ही अत्यल्प भागात होत असली तरी यंदा चित्र बदलत आहे. गव्हाला पर्याय म्हणून मोहरीच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर आहे. कारण त्याची किंमत किमान आधारभूत किंमतीपेक्षा 60 ते 70 टक्के जास्त आहे. अशा परिस्थितीत शेतकरी शास्त्रोक्त सल्ल्याने मोहरीची लागवड केल्यास पीक चांगले येईल. याशिवाय भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी गहू आणि मोहरीची पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना सल्लाही दिला आहे.

गव्हाची पेरणी करताना घ्यावयाची काळजी

* गहू रब्बी हंगामातील एक प्रमुख पिक आहे. पेरणीच्या दरम्यान, शेत जमिनीमधील ओलावा हा महत्वाचा आहे. * पेरणीपूर्वी हलक्या प्रकाराची मशागत करुन शेतजमिनीत ओलावा असल्यावरच पेरणी करावी लागणार आहे. वेळप्रसंगी शेत जमिन ओलवण्याची वेळ आली तरी चालेल पण कोरड्या क्षेत्रावर पेरणी केल्यावर उगवण होत नाही. * हवामान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीसाठी रिकामी शेतं तयार करावीत, असे सांगितले आहे. * यासोबतच सुधारित बियाणे व खतांची व्यवस्था करावी. पेरणीपूर्वी एक तास आगोदर बीजप्रक्रिया महत्वाचा आहे. अन्यथा बियाणाला बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. * शेतकऱ्यांनी गव्हाच्या लागवडीमध्ये वाणांची HD 3226, HD 18, HD 3086 आणि HD 2967 ची पेरणी करावी.

मोहरीची वेळेवर पेरणी महत्वाची

* मोहरीबाबत कृषी शास्त्रज्ञांचे मत आहे की, शेतकऱ्यांना तापमान लक्षात घेऊन मोहरीची पेरणी करावी. * मोहरीच्या पेरणीला जास्त वेळ उशीर करू नका. * यासोबतच माती परीक्षण करून घ्या. गंधकाची कमतरता असल्यास शेवटच्या मशागतीवर 20 किलो प्रति हेक्टरी द्यावे. * याशिवाय पेरणीपूर्वी जमिनीत योग्य ओलावा असावा याकडे लक्ष द्या. * त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पुसा विजय, पुसा -२९, पुसा -३०, पुसा -३१ इत्यादी वाणांची पेरणी करावी, त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. * त्याच वेळी, पेरणीपूर्वी, शेतातील आर्द्रतेची पातळी राखणे आवश्यक आहे, जेणेकरून उगवण प्रभावित होणार नाही.

बीजप्रक्रिया महत्वाचीच

पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याची बिजप्रक्रिया करावी. त्याचबरोबर ओळीत पेरणी केली तर जास्त फायदा होईल. कमी पसरणाऱ्या जाती असल्यास ३० सें.मी. जर अधिक पसरणाऱ्या जाती असतील तर 45-50 सेमी अंतरावर असलेल्या ओळींमध्ये पेरणी करावी. झाडापासून रोपापर्यंतचे अंतर 12-15 सें.मी. ठेवावे. योग्य वैज्ञानिक तंत्राने शेतकरी गहू आणि मोहरीची लागवड करू शकतात. यामुळे चांगले उत्पादन मिळेल, तसेच पिकाचा दर्जाही चांगला राहणार आहे.

संबंधित बातम्या :

नांदेड जिल्ह्यातील विमा परताव्याचा मार्ग अखेर मोकळा, प्रक्रिया सर्वात अगोदर परतावा शेवटी..!

पिकांची नुकसानभरपाई मिळाली खरडून गेलेल्या शेताचे काय ? तरुण शेतकऱ्याची मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या

ऊस उत्पादनाचे काय आहे गणित ? लागवडीपासून तोडणीपर्यंतची अशी घ्या काळजी अन् मिळवा भरघोस उत्पादन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.