E-pik pahni: प्रशासनाकडून समर्थन, शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी कायम

ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांची माहिती शासनाला होणार आहे तर 'फार्म मित्र' या अॅपद्वारे शेतकऱ्यांना नुकसानीबाबतच्या तक्रारीची नोंद करता येणार आहे. यामुळे कारभारात तत्परता येणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंद होणार आहे. हे सर्व असले तरी प्रत्यक्षात याची नोंद घेताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

E-pik pahni: प्रशासनाकडून समर्थन, शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी कायम
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 12:00 PM

लातुर : ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांची माहिती शासनाला होणार आहे तर ‘फार्म मित्र’ या अॅपद्वारे शेतकऱ्यांना नुकसानीबाबतच्या तक्रारीची नोंद करता येणार आहे. यामुळे कारभारात तत्परता येणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक नोंद होणार आहे. हे सर्व असले तरी प्रत्यक्षात याची नोंद घेताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे या किचकट प्रक्रियेतून शेतकऱ्यांच्या पदरी काय पडणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोशल मिडीयावर सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे.

पावसाने खरिप पिकाचे नुकसान झाल्यानंतर ग्रामीण भागात सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती, ‘ई-पिक पाहणी’ आणि ‘फार्मा मित्र’ अॅपची. ई-पिक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणी केलेल्या पिकाची नोंद करता येणार आहे तर ‘फार्मा मित्र’ अॅपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची नोंद करुन तक्रार नोंदवता येणार आहे. मात्र, दोन्हीही पध्दती शेतकऱ्यांसाठी किचकट ठरत आहेत. ग्रामीण भागात मोबाईल रेंज नाही तर अत्याधुनिक मोबाईल वापराची माहिती अनेक शेतकऱ्यांना नाही. समाधान आंधळे या तरुण शेतकऱ्याने ‘ई-पिक पाहणी’ वर नोंद करतानाच्या अडचणी सोशल मिडीयावर मांडल्या आहेत.

पिक पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. हे कमी म्हणून की काय आता ‘ई-पिक पाहणी’ची जबाबदारी शेतकऱ्यांवर सोपवली आहे. ‘ई-पिक पाहणी’वर माहिती भरताना कागदपत्रांची पुर्तता, तांत्रिक अडचणी त्यामुळे शेतकऱ्याला हे सहज शक्य नाही. ‘ई-पिक पाहणी’ अॅपवर माहिती नाही भरली तर याचे परिणाम काय यासंबंधीही शेतकरी अनभिज्ञ आहे. तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी हे ‘ई-पिक पाहणी’ मुळे होणारे फायदे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. याकरिती बीड येथे तर आत्मा विभागाच्यावतीने मार्गदर्शन शिबीरही घेण्यात आले होते. असे असले तरी शेताच्या बांधावर शेतकरीच ही माहिती भरण्यासाठी धडपड करीत आहे. त्यामुळे या ‘ई-पिक पाहणी’त किती शेतकऱ्यांची पाहणी होणार किती वगळले जाणार हे पहावे लागणार आहे. (E-pik pahni: Support from administration, displeasure among farmers,)

मनुष्यबळ नसल्यानेच शेतकऱ्यांचा ‘बळी’

पिक रक्कम कंपनीला जमा झाली की शेतकऱ्यांकडे ना कृषी विभागाचे लक्ष राहते ना विमा कंपनीचे. अतिवृष्टीमुळे सर्रास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे किंवा पिकांची पाहणी करण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळ नाही. आता नु्कसानीनंतर हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली असावी. त्यामुळे अधिकतर हे अॅप कार्यरत होत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे तर हे अशा प्रकारचे अॅपच नसल्याने अडचणी वाढत आहेत.

तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी हताश

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अॅपद्वारे तक्रार नोंदिवण्याची तांत्रिक माहिती नाही. त्यामुळे ज्या तरुणाला याचे ज्ञान अवगत आहे त्या तरुणाकडून अॅपद्वारे माहिती भरुण नुकसानभरपाईसाठी पात्र होण्यास शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. याकरिता हातचे काम सोडू या प्रक्रियेतच शेतकऱ्यांना दिवस वाया घालावा लागत आहे. असे असले तरी मोबाईल रेंज नसने, अॅप पूर्ण क्षमतेने सुरु न होणे यामुळे शेतकरी शेतीची भरण्यात असमर्थ ठरत आहेत.

इतर संबंधित बातम्या :

ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीची शेतकऱ्यांवर सक्ती नको, बच्चू कडूंकडून अडचणींचा पाढा, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

उत्पादनापुर्वीच हळद पिवळी, साचलेल्या पाण्यामुळे कंदही जमिनीतच सडले

राज्यात 15 ऑक्टोंबरपासून होणार ऊसाचे गाळप, साखर कारखान्यांचे ‘बॅायलर’ पेटणार

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.