PM kisan Yojna : 11 व्या हप्त्याची उत्सुकता शिघेला, तक्रार निवारण्यासाठीही सरकारने केली सोय

वर्षभरात दर तीन महिन्यांनी देशातील शेतकऱ्यांना वेध लागतात ते पीएम किसान योजनेतील निधीचे. यापूर्वी 1 जानेवरी रोजी केंद्र सरकारने 10 व्या हप्त्याचा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये वर्ग केला होता. त्यानंतर योजनेचा लाभ शेतकऱ्यांनाच मिळावा या अनुशंगाने बदल करण्यात आले आहेत. आता या बदलानंतर कुणाच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आणि कुणाच्या नाही याची चर्चा रंगली आहे.

PM kisan Yojna : 11 व्या हप्त्याची उत्सुकता शिघेला, तक्रार निवारण्यासाठीही सरकारने केली सोय
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 2:22 PM

मुंबई : वर्षभरात दर तीन महिन्यांनी देशातील शेतकऱ्यांना वेध लागतात ते पीएम किसान योजनेतील निधीचे. यापूर्वी 1 जानेवरी रोजी (Central Government) केंद्र सरकारने 10 व्या हप्त्याचा निधी (Farmer) शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये वर्ग केला होता. त्यानंतर (Central Scheme) योजनेचा लाभ शेतकऱ्यांनाच मिळावा या अनुशंगाने बदल करण्यात आले आहेत. आता या बदलानंतर कुणाच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आणि कुणाच्या नाही याची चर्चा रंगली आहे. शेतकऱ्यांची ही संभ्रम अवस्थादेखील या महिन्यातच दूर होईल कारण एप्रिल महिन्याच्या अखेरीस 11 व्या हप्त्याची रक्कम जमा होणार असल्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. शिवाय ज्यांना योजनेतील लाभाबद्दल तक्रार असेल त्यांच्या एक फ्री टोल क्रमांकही उपलब्ध झाला आहे.

यादीत नाव तरच मिळणार लाभ, अशी करा पडताळणी

* सर्वात प्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. * या वेबसाईटच्या मुख्य पेजवरच डाव्या बाजूला असलेल्या Farmer Corner यावर क्लिक करावे लागणार आहे. * यामध्ये तुम्हाला Beneficiary Status यावर क्लिक करावे लागणार आहे. * यानंतर आपले स्टेटस चेक करण्यासाठी येथे आधार नंबर, मोबाईल नंबर यासारखी माहिती भरावी लागणार आहे * ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपण आपले नाव चेक करु शकता

या टोल फ्री क्रमांकावर तक्रारीचे निवारण

योजनेची व्याप्ती मोठी आहे शिवाय लाभार्थी हे शेतकरी असल्याने अनेकांना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतात. शिवाय याबाबत ना कृषी विभाग मार्गदर्शन करतोय ना महसूल. यामुळे केंद्र सरकारने योजने संदर्भात अडचण असल्यास 011-23381092, 155261 या हेल्पलाईनची मदत घेऊ शकणार आहात तसेच 1800115526 हा टोलफ्री क्रमांकही देण्यात आला आहे.

वर्षाकाठी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये

शेतकऱ्यांना शेतीकामात थेट आर्थिक मदत मिळावी या अनुशंगाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. देशातील 11 कोटी 30 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे थोड्याबहुत प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना मदत होत आहे. 4 महिन्याला 2 हजार रुपये अशा तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. 10 व्या हप्त्यासाठी सरकारने 20 हजार 900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले होते.

संबंधित बातम्या :

Marathwada : 3 लाख क्विंटल हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, कृषी विभागानेच केली शेतकऱ्यांची अडचण..!

Osmanabad : ‘स्वाभिमानी’ चे ठरले..! दिवसा वीजेसाठी आता न्यायालयीन लढा, 1 मे रोजी महत्वाची भूमिका

Latur : वीज टंचाईच्या नावाखाली टक्केवारीचं ‘राजकारण’, भाजप आमदाराकडून कृत्रिम वीज टंचाईची पोलखोल

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.