Kharif Season : गावनिहाय होतेय खरीप हंगामाचे नियोजन, शेतकऱ्यांसाठी कोणत्या 25 बाबी महत्वाच्या ?
शेती व्यवसायामध्येही नियोजन महत्वाचे आहे. त्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही. ही बाब आता कृषी विभागाच्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळेच आगामी खरिपाच्या नियोजनासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. केवळ कागदोपत्री नियोजन न करता थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून हे नियोजन ठरवले जाणार आहे. अद्यापही खरिपासाठी वेळ असला तरी दरवर्षी सारखे घाई गडबडीत नियोजन न होता उत्पादन आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
पुणे : (Agricultural) शेती व्यवसायामध्येही नियोजन महत्वाचे आहे. त्याशिवाय उत्पादनात वाढ होणार नाही. ही बाब आता कृषी विभागाच्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळेच आगामी (Kharif Season) खरिपाच्या नियोजनासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. केवळ कागदोपत्री नियोजन न करता थेट (Farmer) शेतकऱ्यांशी संवाद साधून हे नियोजन ठरवले जाणार आहे. अद्यापही खरिपासाठी वेळ असला तरी दरवर्षी सारखे घाई गडबडीत नियोजन न होता उत्पादन आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यानिमित्ताने 25 गोष्टी अशा सांगितल्या जाणार आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. या प्रक्रियेला गावस्तरावर सुरवात झाली आहे. खरिपाचे योग्य नियोजन होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले आहे.
या आहेत महत्वाच्या 25 बाबी..
खरिपाच्या अनुशंगाने महत्वाच्या अशा 25 बाबी काढण्यात आल्या असून त्यावरच अधिकचे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. गावातील चालू पीक क्षेत्र, उत्पादन, उत्पदाकता आणि हंगमाचे उद्दीष्ट, प्रमुख पिकांच्या वाणाचे बिजोत्पादन, बियाणे उगवण क्षमता तपासणे, रासायनिक खतांची बचत, निविष्ठांची मागणी व पुरवठ्याचे नियोजन, जमिन सुपिकताचे निर्देशांक, पौष्टीक तृण धान्याचा प्रचार, रुंब वरंबा सरी पध्दतीने पेरणी, आंतरपिकांमध्ये, किड व रोग नियंत्रणासाठी मोहिम, कृषी योदनांची अंमलबजावणी, कृषी संजीवनी मोहिमेचे नियोजन, उपलब्ध पाण्यासुसार पीक नियोजन, प्रक्रिया उद्योगाची उभारणी, ‘विकेल के पिकेल’ अभियनाची अंमलबजावणी यासारख्या 25 बाबींवरच भर देऊन हंगाम यशस्वी करण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा राहणार आहे.
शेतकऱ्यांचीही भूमिका महत्वाची
आतापर्यंत केवळ कार्यालयात बसूनच हंगामाचा आराखडा तयार केला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी काय? उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न कोणते ? यासारख्या बाबींचा समावेशच होत नव्हता. त्यामुळे आता कृषी विभागाने खरिपाच्या आराखड्यात शेतकऱ्यांचा समावेश करुन घेण्याचा निर्धार केला आहे. एवढेच नाही तर प्रत्यक्षात सुरवातही झाली आहे. गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या अपेक्षा यामध्ये असणार आहेत.
आराखड्याची माहितीही द्यावी लागणार आहे
केवळ खरिपापुरतेच मर्यादित न राहता कृषी योजनांबाबत जनजागृती आणि फळाबागाचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न यासरखे उपक्रमही घेतले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कापूस व सोयाबीन मूल्य, स्मार्ट पोकरा, फलोत्पादन, यांत्रिकिकरण, जमिन सुपिकता अभियान अशा राष्ट्रीय विकास योजनांना प्रागान्य दिले जाणार आहे.
संबंधित बातम्या :
Washim : भारनियमन मुळावर, उपलब्ध पाणीसाठ्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांचे पाण्यात आंदोलन
Hapus Mango : कोकणातील हापूसचा आता राज्यभर गोडवा, कलमांसाठी कृषी विभागही लागला कामाला