Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pomegranate Garden : कीड-रोगाने डाळिंब बागांना घेरले, आता कृषी विभागाच्या मोहीमेने मिळणार का नवसंजीवनी!

डाळिंब बागा कमी पाण्यात खडकाळ माळरानावरही बहरतात. शिवाय शेतकरीही डाळिंबाचे पीक घेण्यास उत्सुक आहेत मात्र, बागा बहरात येताच कीड-रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या तीन वर्षात तर वातावरणातील बदलामुळे याचे प्रमाण वाढत आहे. पीन होल बोरर, रसशोषक कीड, फळकूज याचे प्रमाण वाढत असल्याने क्षेत्रही घटू लागले आहे. मात्र, यासंदर्भात कृषी विभागानेच राज्यातील डाळिंब बागांचा आढावा घेऊन एक विशेष मोहीम राबवण्याचे ठरविले आहे.

Pomegranate Garden : कीड-रोगाने डाळिंब बागांना घेरले, आता कृषी विभागाच्या मोहीमेने मिळणार का नवसंजीवनी!
राज्यात डाळिंबाचे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत.
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 10:17 AM

पुणे :  (Pomegranate orchard) डाळिंब बागा कमी पाण्यात खडकाळ माळरानावरही बहरतात. शिवाय शेतकरीही डाळिंबाचे पीक घेण्यास उत्सुक आहेत मात्र, बागा बहरात येताच (Outbreak of Pest diseases) कीड-रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या तीन वर्षात तर वातावरणातील बदलामुळे याचे प्रमाण वाढत आहे. पीन होल बोरर, रसशोषक कीड, फळकूज याचे प्रमाण वाढत असल्याने क्षेत्रही घटू लागले आहे. मात्र, यासंदर्भात (Agricultural Department) कृषी विभागानेच राज्यातील डाळिंब बागांचा आढावा घेऊन एक विशेष मोहीम राबवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कृषितज्ञ आणि कृषी अधिकारी हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी करुन योग्य मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे डाळिंब बागांना पुन्हा नवसंजीनी मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

डाळिंब बागांना नेमका धोका कशाचा ?

राज्यात तब्बल 1 लाख 71 हजार हेक्टरावर डाळिंबाचे क्षेत्र आहे. उत्पदनासाठी डाळिंब पीक सोपे असले तरी वाढत्या कीड आणि रोगराईमुळे शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पीन होल बोरर या रोगावर तर औषधच नाही. शिवाय यंदा या पीन होल बोररचा अधिक प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी बागांचीच मोडणी केली आहे. बागा बहरात येताच पीन होल बोरर, रसशोषक कीड, सूत्रकृमी, फळकूज अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे वर्षभर बाग बहरण्यासाठी खर्च करायचा अन् उत्पादन पदरी पडताना होणारे नुकसान हे ठरलेलेलच. राज्यात पुणे, नगर, नाशिक, सांगली या भागात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. मात्र, उत्पादनाचा भरवसा नसल्याने क्षेत्रात घट होत आहे.

कृषी विभागाचे काय आहे नियोजन?

केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील डाळिंब बागांची पाहणी केली होती. तेव्हापासून उपाययोजना राबवण्याबाबत पावले उचलली जात आहेत. आता कृषितज्ञ व कृषी अधिकारी हे डाळिंब रोपवाटिकेची पाहणी करणार आहेत तसेच राष्ट्रीय संशोधन केंद्रे, विद्यापीठे, डाळिंब उत्पादक संघ आणि कृषी विभाग सयुक्त कामे करणार आहेत. जिल्हानिहाय मोहीमांचे आयोजन करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत कीड-रोगराई व्यवस्थापनाची यंत्रे पुरवली जाणार आहेत.

अशी घ्यावी लागणार शेतकऱ्यांना काळजी

शेतकऱ्यांनी डाळिंबाची अतिघन लागवड करायची नाही. लागवड करताना 4.5 मीटर बाय 3 मीटर तर पाच बाय पाच मीटर दोन रांगामध्ये अंतर ठेवावे लागणार आहे. कीडनियंत्रणासाठी ड्रेचिंगचा वापर करता येणार नाही. याशिवाय कुजलेले कंपोस्ट खत व जैविक कीडनाशकांचा वापर वाढवावा लागणार आहे. त्यामुळे कृषी अधिकारी, कृषितज्ञ आणि विद्यापीठांच्या माध्यमातून डाळिंबाला नवसंजीवनी मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Mango : फळांच्या राजा यंदा निसर्गाच्या कचाट्यात, उत्पादन घटल्याने चवही महागणार

Rabi Season : उन्हाळी हंगामातील मका जोमात पण ‘मर’ रोगामुळे कोमात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

सोयाबीनची साठवणूक अन् हरभऱ्याची विक्री, काय स्थिती आहे खरेदी केंद्रावरची?

कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.