ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीमध्ये ‘बोयोसिरप’ची महत्वाची भूमिका, काय आहे नवे तंत्र?

ऊसापासून इथेनॉलची निर्मिती हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेतला विषय ठरलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी इथेनॅाल निर्मितीचे अवाहन शेतकऱ्यांना केले आहे. ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करता येते परंतू, नाशीवंत ऊसापासून याची निर्मिती होत नसल्याने 24 तासांमध्ये जेवढे उत्पादन होईल त्यावरच समाधान मानावे लागत होते. पण आता 'बायोसिरप'च्या माध्यमातून ऊसाचा रस हा वर्षभर टिकून राहणार आहे.

ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीमध्ये 'बोयोसिरप'ची महत्वाची भूमिका, काय आहे नवे तंत्र?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 12:40 PM

पुणे : उसापासून इथेनॉलची निर्मिती हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेतला विषय ठरलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी इथेनॅाल निर्मितीचे अवाहन शेतकऱ्यांना केले आहे. ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करता येते परंतू, नाशीवंत ऊसापासून याची निर्मिती होत नसल्याने 24 तासांमध्ये जेवढे उत्पादन होईल त्यावरच समाधान मानावे लागत होते. पण आता ‘बायोसिरप’च्या माध्यमातून ऊसाचा रस हा वर्षभर टिकून राहणार आहे. त्यामुळे वर्षभर इथेनॅालची निर्मिती शक्य होणार आहे. पुणे येथील प्राज कंपनीच्या वतीने हे तंत्र विकसीत करण्यात आले आहे. त्यामुळे ऊसाच्या रसावर विशिष्ट प्रक्रिया करता येणार आहे.

साखर कारखान्यांच्या अर्थकारणाला मिळेल बळकटी

सध्या उसाचे गाळप मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, इथेनॉल निर्मितीला काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने काही कालावधीपूरताच हा हंगाम सुरु राहत होता. कारण 24 तासानंतर ऊसाचा रस हा नाशवंत असल्याने जोपर्यंत गाळप हंगाम सुरु आहे. तोपर्यंतच इथेनॉलची निर्मिती होत होती. मात्र, आता रसाचे रुपांतर दीर्घकाळ टिकवणक्षमता असलेल्या पाकात होणार आहे. त्यामुळे साखर कारखाने हे वर्षभर या रसातून इथेनॉलची नर्मिती करु शकणार आहेत. त्यामुळे कारखान्याचे अर्थकारण तर सुधारेलच पण इंधनामध्ये जे इथेनॉल वापरण्याचा सरकारचा उद्देश आहे तो सुध्दा साध्य होणार आहे.

कुठे झाला पहिला प्रोजेक्ट?

इथेनॉल निर्मितीच्या अनुशंगाने कराड येथील जयवंत शुगरमध्ये पहिला प्रोजेक्ट ‘प्राज’ या कंपनीच्या वतीने उभारण्यात आला आहे. वर्षभर साठवलेल्या साखर पाकातील शर्कराघटक कमी झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. देशात अतिरिक्त साखरेचा साठा 60 लाख टनांचा झाला आहे. या साठ्यामुळे साखर कारखान्यांचा पैसा अडकून आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. मात्र बायोसिरपने इथेनॉलचा व्यावसायिक मार्ग आता शाश्‍वत केला आहे. या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड हे उपस्थित होते. या बायोसिरपमुळे साठवणूकीतील ऊसाच्या रसावर काही परिणाम होत नसल्याने इथेनॉल निर्मिती शक्य आहे.

योग्य नियोजन अन् उद्देशही साध्य

आतापर्यंत इथेनॉलची निर्मिती इथपर्यंत ठिक होते. पण यासाठी वेळेची मर्यादा होती. ऊसाचा रस चांगल्या अवस्थेत असतानाच इथेनॉलची निर्मिती शक्य होते. पण हा रस 24 तासानंतर नाशवंत होत होता. मात्र, ‘प्राज’ कंपनीने बायोसिरपच्या माध्यमातीन ऊसाच्या रसाची साठवण क्षमता तर वाढवली आहेच शिवाय यामध्ये ऊसाच्या रसाचे रुपांतर हे दीर्घकालीन टिकवणक्षमता असलेल्य पाकात होत आहे. त्यामुळे वर्षभर त्याच्या दर्जावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे वर्षभऱ कुठेही आणि कधीही इथेनॉलची निर्मिती होणार आहे. तर इंधनामध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण हा सरकारचा उद्देशही साध्य होणार असल्याचे प्राज इंडस्टिज लिमिटेडचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’, आता सोयाबीनची साठवणूक की विक्री ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

भाजीपाला रोपवाटिका काळाची गरज, असे करा व्यवस्थापन

दुधाळ जनावरांपासून उत्पादन वाढविण्याची शेतकऱ्यांना संधी, अनुदानावर मिळणार गाई-म्हशी

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.