द्राक्षातून नाहीतर बेदाण्यातून उत्पादनवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा, व्यापारी प्रतिक्षेत
वातावरणातील बदलाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर होतच आहे पण दर्जाही खलावत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा दरावर होणारच आहे. पण दुसरीकडे बेदाण्याचे दर हे टिकून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे बेदाणे निर्मितीस अडचणी निर्माण होत असल्या नवीन मालाची प्रतिक्षा व्यापाऱ्यांना लागलेली आहे.
सांगली : वातावरणातील बदलाचा परिणाम (Grape Production) द्राक्ष उत्पादनावर होतच आहे पण दर्जाही खलावत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा दरावर होणारच आहे. पण दुसरीकडे बेदाण्याचे दर हे टिकून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या (Climate Change) वातावरणातील बदलामुळे बेदाणे निर्मितीस अडचणी निर्माण होत असल्या नवीन मालाची प्रतिक्षा (Traders) व्यापाऱ्यांना लागलेली आहे. सध्या बेदाण्याला 120 ते 230 रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाला असला तरी त्याची कसर ही बेदाण्यातून भरुन निघणार का हे पहावे लागणार आहे. असे असले नवीन बेदाणा मार्केटमध्ये फेब्रुवारी महिना उजाडणार असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे द्राक्षाचे दर ठरुनही निर्यातदार कमी किंमतीने मागणी करीत आहेत. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून राहिले तर शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे.
मागणी वाढूनही दर स्थिरावलेलेच
गतवर्षी 1 लाख 80 टन इतका बेदाणा तयार झाला होता. वर्षभर मागणी असल्याने बेदाण्याची कमी अधिक विक्री होते. गतवर्षी तयार झालेला बेदाणा जवळपास संपत झाला आहे. डिसेंबरमध्ये बेदाण्याला बेदाण्याला प्रति किलोस १६० ते 225 रुपये असा दर होता. मात्र, गेल्या काही दिवासांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन होतो की, काय अशी भीती निर्माण झाली होती. याचा परिणाम मागणीवर झालेला नसला तरी दरातही वाढ ही झालेली नाही. आता नव्या बेदाण्याची प्रतिक्षा व्यापाऱ्यांना आहे पण हवामानात बदल झाल्याने निर्मितीस अडचणी येत आहेत.
उशिराने बेदाणा निर्मीती पण दर वाढतील
दरवर्षी जानेवारी महिन्यातच बेदाण्याची निर्मिती होते. याकरिता कोरडे वातावरण गरजेचे असते. यंदा बेदाणा निर्मितीला सुरवात होत असतानाच वातावरणात मोठा बदल झाला होता. त्यामुळे बेदाणा निर्मितीच्या अनुशंगाने तयार करण्यात आलेल्या शेडला अद्यापही प्रतिक्षाच आहे. आता फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष बेदाणा निर्मितीला सुरवात होणार आहे. मात्र, गतवर्षीची साठवणूक अंतिम टप्प्यात आहे. तर अनेक व्यापाऱ्यांना नव्या बेदाण्याची प्रतिक्षा आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षा मागणी अधिक झाली तर दर वाढतील असा अंदाज बेदाणा व्यापारी सुशिल हडदरे यांनी व्यक्त केला आहे.
नेमकी काय आहे परस्थिती
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बेदाणा तयार करणाऱ्या द्राक्षापासून बेदाणा निर्मिती होण्यास प्रारंभ होईल. सध्या द्राक्षाची विक्री करून शिल्लक राहिलेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार होत आहे. त्यामुळे बेदाणा तयार होण्याची गती वाढलेली नाही. अनेक भागातील शेड दुरुस्त झाले असून, बेदाणा तयार करण्यासाठी शेडमालक प्रतीक्षा करीत आहेत. पण वातावरणाचा परिणाम हा या निर्मितीवर झालेला असून लवकरच कोरडे वातावरण होऊन बेदाणा निर्मितीला वेग येईल असा आशावाद बाळगला जात आहे.
संबंधित बातम्या :
KCC कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी : योजना एक अन् फायदे अनेक, वेळेत परतावा केल्यास व्याजदरही घटणार
गारठा वाढणारच : रब्बी पिके अन् फळबागांच्या संरक्षणासाठी काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?
Positive News: तुरीची दमदार एन्ट्री : आवकही वाढली अन् दरही, आठवड्याभरातच बदलले चित्र