Success Story : निसर्गाच्या लहरीपणात एकरभर क्षेत्रात लाखोंचे उत्पन्न, उत्पादनाबरोबर शेतकऱ्याने जुळवले मार्केटचे ‘गणित’

उत्पादन घ्यायचे पण भरवश्याचे असे म्हणतच प्रवीण कदम यांनी केवळ एका एकरात कोथिंबीरचे उत्पादन घेतले होते. तीन महिन्याच्या या पिकासाठी त्यांना केवळ 35 हजार रुपये खर्च आला. यामध्ये मशागत, मजुरी, बियाणे हे सर्व आले. असे असतानाही निसर्गाच्या लहरीपणामुळे फवारणीचा खर्च वाढला तो वेगळाच. प्रतिकूल परस्थितीमध्येही त्यांनी उत्पादन घेण्याची चिकाटी सोडली नाही.

Success Story : निसर्गाच्या लहरीपणात एकरभर क्षेत्रात लाखोंचे उत्पन्न, उत्पादनाबरोबर शेतकऱ्याने जुळवले मार्केटचे 'गणित'
एक एकर क्षेत्रात क्षेत्रात शेतकऱ्यास कोथिंबीरमधून लाखोचे उत्पन्न पदरी पडले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:24 PM

लासलगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे(Seasonable Crop)  हंगामी पिके घेणे मुश्किल झाले आहे. उत्पादन सोडा पिकांची निघराणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र, वेगळी वाट आणि अथक परीश्रम घेतले तर कमी क्षेत्रातही अधिकचे उत्पादन मिळते हे निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. हंगामी पिके तर दरवर्षीच आहेत म्हणत येथील प्रवीण कदम यांनी एक एकरात (Cultivation of cilantro) कोथिंबीरची लागवड केली होती. पावसाची रिपरिप सुरु असतनाही नियोजनबद्ध जोपासणा केल्याने त्यांना तीन महिन्यातच एक लाखाचे उत्पन्न पदरी पडले आहे. वेगळ्या प्रयोगाला त्यांनी स्थानिक पातळीवरच (Market) बाजारपेठ मळेल असे नियोजन केल्याने कदम यांचा खर्च अटोक्यात अन् उत्पन्न पदरात अशी स्थिती निर्माण झाली. खर्च वजा करुन त्यांना एका एकरामध्ये तब्बल लाख रुपये मिळाले आहेत.

एकरबर कोथिंबीर अन् 35 हजाराचा खर्च

उत्पादन घ्यायचे पण भरवश्याचे असे म्हणतच प्रवीण कदम यांनी केवळ एका एकरात कोथिंबीरचे उत्पादन घेतले होते. तीन महिन्याच्या या पिकासाठी त्यांना केवळ 35 हजार रुपये खर्च आला. यामध्ये मशागत, मजुरी, बियाणे हे सर्व आले. असे असतानाही निसर्गाच्या लहरीपणामुळे फवारणीचा खर्च वाढला तो वेगळाच. प्रतिकूल परस्थितीमध्येही त्यांनी उत्पादन घेण्याची चिकाटी सोडली नाही. अनेक वेळा पावसामुळे कोथिंबीरचे नुकसान झाले होते पण कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांनी हे पीक बहरातच आणले. खरीप हंगामातील पिकांपेक्षा कोथिंबीरमधूनच अधिकचे उत्पन्न मिळाले असे कदम यांनी सांगितले आहे.

स्थानिक व्यापाऱ्यामुळे खर्च टळला

केवळ एकरबरच क्षेत्र असल्याने त्यासाठी परजिल्ह्यातून व्यापारी न आणता कदम यांनी नाशिक येथील व्यापाऱ्यालाच हाताशी धरले. त्यामुळे त्यांचा वाहतूकीचा खर्च तर टळलाच पण काढणीला येताच पीक व्यापाऱ्याच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे दर्जेदार माल आणि त्याला दामही तसाच मिळाला आहे. एक एकरात कदम यांना 1 लाखाचे उत्पन्न पदरी पडले आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिके बेभरवश्याची झाली आहेत तिथे कदम यांना कोथिंबीरने साथ दिली आहे.

पावसाळ्यामुळे मिळाला चांगला दर

यंदा सतत पाऊस लागून राहिल्याने भाजीपाल्याचे दर गगणाला भिडलेले आहे. शिवाय ऐन पावसाळ्यातच काढणी यावी या उद्देशानेच प्रवीण कदम यांनी लागवड केली होती. अखेर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच कोथिंबीर बाजारात दाखल झाल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यालाही हे परवडले आहे. एका एकरात जिथे 30 ते 40 हजाराचे पीक पदरी पडणार तिथे कदम यांना लाख रुपये मिळाले आहेत.

ही पण बातमी वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.