दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?

उत्पादनात घट म्हणजे दरात वाढ हे निश्चित मानले जाते आणि हेच बाजारपेठेचे सुत्रही आहे. मात्र, डाळिंबाच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे राज्यातील उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे.

दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागेवर परिणाम झााल आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 5:22 PM

नागपूर : उत्पादनात घट म्हणजे दरात वाढ हे निश्चित मानले जाते आणि हेच बाजारपेठेचे सुत्रही आहे. मात्र, (Pomegranate production) डाळिंबाच्या बाबतीत हे उलटे होताना दिसत आहे. कारण यंदा (Heavy Rain) अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे राज्यातील उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. असे असताना पदरी पडलेल्या डाळिंबाला अधिकचा दर मिळून झालेल्या नुकसानीची कसर भरुन काढता येईल असा शेतकऱ्यांचा कयास होता. पण झाले उलटे (Market) बाजारपेठेतले दर अणखीन घसरले आहेत. राज्यातील डाळिंबाचे उत्पादन घटले असले तरी गुजरात आणि राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे.

मृग बहर अधिकचा असूनही उत्पादनात घटच

देशात तब्बल 2 लाख हेक्टरावर डाळिंबाची लागवड केली जाते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. देशात 80 हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहर धरला जातो. त्यापैकी महाराष्ट्राचा मृग बहरातील 70 टक्के इतका वाटा आहे. कर्नाटक राज्यात काही भागांत अतिवृष्टी तर काही भागात कमी पाऊस झाला. त्यामुळे तेथील डाळिंबावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. येथील नुकसान पाहूनच आता परराज्यातून डाळिंबाची आवक वाढलेली आहे.

असा राहिला आहे डाळिंबाचा दर

यंदा हंगामाच्या सुरवातीला डाळिंबाला 130 ते 150 रुपये दर होता. शिवाय मध्यंतरी नुकसानीच्या दरम्यान यामध्ये अजून 15 ते 20 रुपयांची वाढ झाली होती. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली तरी वाढलेल्या दरातून अधिकचा पैसा पदरी पडेल अशी आशा डाळिंब उत्पादकांना होती. पण ऐन वेळी आता परराज्यातून डाळिंबाची आवक वाढल्याने दरात घसरण सुरु झाले आहे. आता डाळिंब थेट 100 ते 80 रुपये किलोवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादकांना याचा दुहेरी फटका बसलेला आहे.

निर्यातीवरही परिणाम

देशातून निर्यात होणाऱ्या डाळिंबामध्ये महाराष्ट्र राज्याची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. दरवर्षी देशातून डाळिंबाची युरोपला 2 हजार टन निर्यात होते. गतवर्षी देखील अतिवृष्टीचा फटका बसल्याने देशातून अवघे 300 टन डाळिंबाची युरोपला निर्यात झाली होती. मात्र यंदा सुद्धा राज्यात अतिवृष्टी, तेलकट रोगाचा प्रादुर्भाव आणि पिन बोअर होल या तिहेरी संकटाचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला आहे. त्यामुळे अवकाळी, अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ हंगामातील पिकांवरच नाही फळबागांवरही झालेला आहे. शिवाय तो अधिक परिणामकारक आहे हे महत्वाचे.

संबंधित बातम्या :

आता खासगी बाजार समित्यांच्या उभारणीवरुन शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

Positive News | आवक वाढूनही सोयाबीनचे दर स्थिरावले, तरीही शेतकऱ्यांनी…

पुन्हा पहिले दिवस : पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव, दोन दिवसात असे काय झाले अन् विक्रमी दर मिळाला!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.