‘या’ कारणांमुळे घसरले चिकन, अंड्याचे दर ; दीड वर्षापासून वाढले होते भाव
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वेगवेगळ्या अफवांमुळे चिकन आणि अंड्याचे दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे पोल्ट्रीचालक अडचणीत आले होते. त्यानंतर मात्र, वाढलेले दर हे तब्बल दीड वर्ष कायम राहिले होते. आता दर घटन्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वेगवेगळ्या अफवांमुळे चिकन आणि (egg and chicken) अंड्याचे दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे पोल्ट्रीचालक अडचणीत आले होते. त्यानंतर मात्र, वाढलेले दर हे तब्बल दीड वर्ष कायम राहिले होते. आता दर घटन्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. एकतर सोयामील आयातीच्या घोषणेनंतर सोयाबीनचे दर हे कोसळले आहेत. त्यामुळे (poltry farm) कुक्कुटपालनावर होणारा खर्च हा कमी झाला आहे. तर दुसरीकडे सध्या सणासुदीचे दिवस असल्याने अंडी आणि चिकनच्या मागणीत घट होत आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर आता अंडी- चिकनच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहवयास मिळत आहे.
आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या अफवांमुळे चिकनचे दर हे कमी झाल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे व्यवसायिक अडचणीत येऊन अनेकांनी पोल्ट्री बंदही केल्या होत्या. या दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक फटका बसला होता. त्यानंतर मात्र, वाढलेले दर हे दीड वर्ष कायम राहिले होते. आता काही दिवसांपासून या दरामध्ये घट होत आहे.
अंडी-चिकनचे दर या कारणांमुळे होत आहेत कमी
केवळ एकाच अशा विशिष्ट कारणामुळे अंडी-चिकनचे दर हे कमी होत नाहीत तर वेगवेगळी कारणे आहेत. यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे सोयापेंडच्या आयातीची घोषणा. केंद्र सरकारने सोयापेंडची आयात करण्याची घोषणा केली आहे. आगामी महिन्यात हे सोयापेंड देशात दाखलही होईल. या घोषणेमुळेच भारतात 11000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले सोयबीन आता 7500 ते 8000 रुपये पर्यंत घसरले आहे.
कोंबडीच्या धान्याचा वापर म्हणून या गोष्टी वापरल्या जातात
कुक्कुटपालनात कोंबड्यांना खाद्य म्हणून सोयाबीनचा वापर केला जातो. सोयाबीनशिवाय मक्याचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून मक्याच्या दरात वाढ होत आहे. काही काळापूर्वी 1400 रुपये प्रति क्विंटल असलेल्या बिहारमधील मक्याची किंमत आता 1900 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. कोंबडीला देण्यात येणाऱ्या दाण्यामध्ये 30 ते 35 टक्के सोयाबीनचा समावेश असतो तर 50 ते 55 टक्के मक्याचा समावेश असतो. पण आता सोयाबीनचे दर घसरल्याने यावरच भर दिला जात आहे.
सणा-सुदीचाही मोठा परिणाम
सध्या पितृपक्ष सुरु आहेत. त्यानंतर नवरात्र महोत्सवाला सुरवात होणार आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने अंडी आणि चिकनच्या मागणीत घट झालेली आहे. अशीच परस्थिती अजून दोन आठवडे तरी राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय यापेक्षा अजून दरात घसरण होणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.
अंड्याच्या किंमती किती घसरल्या
ठोक बाजारात एक अंडे हे 4.30 प्रमाणे विकले जात होते आता अंडे आता ४ रुपयांना विकले जात आहे. ठोक बाजारात अंड्यांची किंमत दोन महिन्यांपूर्वीच सहा रुपयांवर पोहोचल्या होत्या. तर किरकोळ बाजारात एका अंड्याची किंमत 7 रुपयांवरून 8 रुपयांपर्यंत गेली होती.
भविष्यात कोंबडीचे दर काय राहतील
अंड्याच्या दरामध्ये तर दिवसेंदिवस घट होत आहे. पण कोंबड्याच्या दराचे काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. ठोक बाजारात कोंबड्यांची किंमत आता 180 रुपयांवरून 150 रुपये किलोवर आली आहे. किरकोळ बाजारातही कोंबडीच्या किंमतीत 20 ते 30 रुपये किलोपर्यंत घट झाली आहे. (Fall in egg and chicken prices after a year and a half. These are the reasons)
संबंधित बातम्या :
कारखाने सुरु करण्यासाठी ‘रेड झोन’ मधील साखर कारखान्यांची अनोखी शक्कल
लाळ्या-खुरकूताच्या लसीकरणाला सुरवात, अशी घ्या जनावरांची काळजी
वटाण्याचे हलक्या जमिनीत भरघोस उत्पादन, यंदा पोषक वातावरणही, जाणून घ्या लागवड पध्दत अन् सर्वकाही