Onion : कांदा दराचा लहरीपणा, आठ दिवसांमध्ये असे काय दर घसरले की शेतकऱ्यांचेच नव्हे व्यापाऱ्यांचेही गणित हुकले..!

कांद्याचे दर रात्रीतून बदलतात हे आता व्यापाऱ्यांनाच काय शेतकऱ्यांनाही कळून चुकलेले आहे. असे असताना मध्यंतरी जवळपास महिनाभर कांद्याचे दर टिकून होते. दराच्या बाबतीत लहरी असलेला कांदा यंदा टिकून राहिल्याने केवळ लाल कांद्याचाच नाही तर उन्हाळी कांद्याचा देखील पैसाच झाला होता. पण गेल्या आठ दिवसांमध्ये असे काय दर कमी झाले आहेत शेतकऱ्यांचे गणितच हुकले आहेत.

Onion : कांदा दराचा लहरीपणा, आठ दिवसांमध्ये असे काय दर घसरले की शेतकऱ्यांचेच नव्हे व्यापाऱ्यांचेही गणित हुकले..!
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत.
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 3:48 PM

लासलगाव : कांद्याचे दर रात्रीतून बदलतात हे आता व्यापाऱ्यांनाच काय शेतकऱ्यांनाही कळून चुकलेले आहे. असे असताना मध्यंतरी जवळपास महिनाभर (Onion Rate) कांद्याचे दर टिकून होते. दराच्या बाबतीत लहरी असलेला कांदा यंदा टिकून राहिल्याने केवळ (Red Onion) लाल कांद्याचाच नाही तर उन्हाळी कांद्याचा देखील पैसाच झाला होता. पण गेल्या आठ दिवसांमध्ये असे काय दर कमी झाले आहेत शेतकऱ्यांचे गणितच हुकले आहेत. आठ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात तब्बल 764 रुपायांची घसरण झाली आहे तर उन्हाळ कांद्याच्या दरात 630 रुपयांची घसरण झाली आहे. मागणीपेक्षा (Onion Arrival) आवक अधिक तर झालीच पण युध्दजन्य परस्थितीमुळे निर्यातीमध्येही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, अचानक घटलेल्या दरामुळे कांदा उत्पादकांना 11 कोटी 72 लाख रुपयांचा फटका बसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

आवक वाढ्यालाचा दरावर परिणाम

उन्हामध्ये वाढ होत असल्याने देशांतर्गत मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि राज्यात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची आवक दाखल होत आहे. तसेच नवीन उन्हाळ कांद्याची आवक कमी-अधिक प्रमाणात दाखल होत असल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा देशांतर्गत पुरवठा अधिक होत आहे.26 फेब्रुवारी शनिवारी रोजी लाल कांद्याला कमाल 2625 रुपये पर्यंत बाजार भाव मिळत होता. मात्र, 5 मार्च शनिवार रोजी लाल कांद्याला कमाल 1861 रुपये इतका बाजार भाव मिळाल्या प्रति क्विंटल मागे 764 रुपयांची घसरण झाली आहे. 26 फेब्रुवारी रोजी उन्हाळ कांद्याला कमाल 2430 रुपये पर्यंत बाजार भाव मिळत होता मात्र आठ दिवसानंतर 5 मार्च उन्हाळ कांद्याला कमाल 1800 रुपये इतका बाजार भाव मिळाल्या प्रति क्विंटल मागे 630 रुपयांची घसरण झाली आहे

कांदा उत्पादकांचे कोट्यावधींचे नुकसान

लासलगाव बाजार समिती गेल्या आठ दिवसात लाल कांद्याची 1 लाख 41 हजार 969 क्‍विंटल आवक विक्रीसाठी दाखल झाली 764 रुपयांची घसरण झाल्यामुळे 10 कोटी 84 लाख 64 हजार 316 रुपयांचा फटका बसला तर नवीन उन्हाळ कांद्याची 2 हजार 552 क्विंटल अवक विक्रीसाठी दाखल आठ दिवसात 630 रूपयांची घसरण झाल्याने 16 लाख 7 हजार 760 रुपयांचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात लासलगावसह 17 कांद्याच्या बाजार समित्या असून अंदाजे 80 ते 100 कोटींच्या जवळपास फटका बसल्याचे दिसते

उन्हाळी कांद्याची आवक सुरु

यंदा कधी नव्हे ते दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील लाल कांद्याची रात्रीतूनच काढणी, कापणी ही कामे उरकून बाजारपेठा जवळ केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कांद्याचे पैसेही पडले. पण लाल कांद्याची आवक सुरु असतानाच उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक ही सुरु झाली होती. त्यामुळे लाल कांद्याची साठवणूक केलेला आणि आता नव्याने दाखल झालेला उन्हाळी कांदा यांची आवक वाढल्याने सर्वकाही बिघडले आहे. शिवाय कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने धोरण ठरवण्याची मागणी शेतकरी संघटनांमधून होत आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीन दोन दिवस स्थिरवाल्यानंतर पुन्हा दरात घसरण, तुरीला मात्र हमीभावाप्रमाणे दर

Rabi Season : वावरातलं पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे ढग कायम

Natural Farming : नैसर्गिक शेतीचा असा ‘हा’ फायदा, शेती क्षेत्रात वाढ होण्यासाठी केंद्राचे काय आहे धोरण?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.