E-Shram Yojna : आता शेतमजुरांनाही मिळणार अपघात विम्याचे कवच ; असे मिळवा ई-श्रम कार्ड…!

शेतकऱ्यांबरोबर आता शेतमजुरांनाही अपघात विम्याचे कवच राहणार आहे. याकरिता केंद्र सरकारने 'ई-श्रम योजना' ही सुरु केली आहे. देशातील असंघटित कामगार व मजुरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर शेतामध्ये कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यालाही याचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीकृत मजुरांना 2 लाखापर्यंतचा अपघाती विमा मिळणार आहे.

E-Shram Yojna : आता शेतमजुरांनाही मिळणार अपघात विम्याचे कवच ; असे मिळवा ई-श्रम कार्ड...!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 12:04 PM

मुंबई : शेतकऱ्यांबरोबर आता शेतमजुरांनाही (Farm Labour) अपघात विम्याचे कवच राहणार आहे. याकरिता (Central Government) केंद्र सरकारने ‘ई-श्रम योजना’ ही सुरु केली आहे. देशातील असंघटित कामगार व मजुरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर शेतामध्ये कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यालाही याचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीकृत मजुरांना 2 लाखापर्यंतचा अपघाती विमा मिळणार आहे.

केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या योजनेची माहीती अद्यापही अनेकांना नाहीच. आतापर्यंत ग्रामीण भागात केवळ स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ही माहिती होती. पण ई-श्रम योजनेबद्दल अनेकजण अनभिज्ञ आहेत. मात्र, या योजनेमुळे असंघटित कामगार व मजुरांना फायदा होणार आहे.

देशात 8 कोटी मजुरांचीच नोंदणी

देशभरात 38 कोटींवर मजुरांची संख्या आहे. मात्र, या योजनेचा अद्यापही प्रचार आणि प्रसार झालेला नाही. त्यामुळे केवळ 8 कोटी मजुरांचीच नोंदणी केंद्र सरकारने दिलेल्या पोर्टलवर झालेली आहे. महाराष्ट्रात प्रशासनाला 12 लाख नोंदणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. पैकी केवळ 52 हजार मजुरांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये असलेल्या मजुरांची नोंदणी करुन त्यांना लाभ मिळवून दिला पाहिजे.

कुणाला मिळणार योजनेचा लाभ

केंद्राच्या ‘ई-श्रम’ योजनेमध्ये शेती व शेतीसंलग्न क्षेत्रातील मजुरांना तसेच रोजगार हमी योजनेतील मजूर, बांधकाम क्षेत्र, मासेमारी, रोजंनदारी करणारे मजूर, फलाटावर काम करणारे मजूर तसेच फेरीवाले, घरकाम करणारे यांनाही सहभागी होता येणार आहे. दूध-चहा, भाजीपाला विक्रेते अशा तब्बल 300 व्यवसायिकांना ही योजना लागू करण्यात आली आहे.

असे मिळवा ई-श्रम कार्ड

ई-श्रम कार्डसाठी सर्वप्रथम नव्याने सुरु करण्यात आलेल्या E- shram.gov.in या वेबसाईट ओपन करावी लागणार आहे. येथील मुखपृष्ठावर नवीन नोंदणी चा पर्याय आहे. यामध्ये रजिस्टर ला क्लिक करून सेल्फ रजिस्ट्रेशन करून आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर Capcha कोड हा टाकायचा आहे. त्यानंतर सेंड ओटीपी याला क्लिक करायचे आहे.

* त्यानंतर मोबाईल वर आलेला ओटीपी नंबर टाकायचा आहे. ओटीपी टाकून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. यानंतर आधार कार्ड बाबतची माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. यानंतर सर्व अटी नियम मला मान्य आहे त्याला क्लिक करून सबमिट करायचे आहे.

* याला सबमिट केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल यामध्ये वैयक्तिक माहिती भरायची आहे. तसेच शैक्षणिक माहिती, महिन्याचा इन्कम आदी बाबींचा समावेश करावा लागणार आहे. तुमच्या व्यवसायाचीही माहिती द्यावी लागणार आहे. तुम्ही काय करता हे दिलेल्या पर्यायापैकी निवडावे लागणार आहे. यानंतर Save & Contunue यावर क्लिक करून पुढील माहिती भरायची आहे.

* पुढच्या स्टेप मध्ये बँकेत संदर्भात माहिती भरायची आहे. बँकेची पूर्ण माहिती भरल्यानंतर आपण जो आतापर्यंत फॉर्म भरला आहे. तो आपल्यासमोर येईल. हा फार्म संपूर्ण एकदा तपासून शेवटी डिक्लेरेशन द्यायचे आहे यामध्ये सर्व घोषणा सर्व अटी नियम हे मला मान्य आहेत असे संबोधून शेवटी Agree वर क्लिक करायचे आहे. हे सबमिट केल्यावर तुमचे ई- श्रम कार्ड कसे असेल हे देखील पाहता येणार आहे एवढेच नाही तर ते डाऊनलोड करून देखील घेता येणार आहे.

संबंधित बातम्या :

तुरीचा काढणीपूर्वीच झाला खराटा, काय आहे उपापयोजना ? शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

सोयाबीन दरवाढीला आता सरकारचाही ‘सपोर्ट’, काय होणार नेमका परिणाम?

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.