पिकांची नुकसानभरपाई मिळाली खरडून गेलेल्या शेताचे काय ? तरुण शेतकऱ्याची मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या
निसर्गाचा प्रकोप झाला की काय होते याचा प्रत्यय मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीच्या दरम्यान आला आहे. ज्या नदीच्या पाण्यावर उत्पादन वाढीचे स्वप्न पाहिले जात होते त्याच नदीचे पाणी शेतात घुसल्याने अवघ्या काही वेळात पिकासह शेतजमिन खरडून गेली होती. त्यामुळे हताश अशा तरुण शेतकऱ्याने त्याच नदीच्या पात्रात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवलेली आहे.
लातूर : नदी पात्रालगतची (Farm land) शेत जमिन म्हणजे सुपीक यातून अधिकचे उत्पादन आणि लगतच (Manjra River) मांजरा नदी असल्याने सिंचनाचा काय प्रश्नच नाही. (Latur) असेच काहीशी चित्र असते नदी लगतच्या जमिनीचे. मात्र, निसर्गाचा प्रकोप झाला की काय होते याचा प्रत्यय मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीच्या दरम्यान आला आहे. ज्या नदीच्या पाण्यावर उत्पादन वाढीचे स्वप्न पाहिले जात होते त्याच नदीचे पाणी शेतात घुसल्याने अवघ्या काही वेळात पिकासह शेतजमिन खरडून गेली होती. त्यामुळे हताश अशा तरुण शेतकऱ्याने त्याच नदी पात्रात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवलेली आहे.
मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शिरुरअनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने बॅंकेच्या कर्जाची परतफेड करायची कशी तसेच पिकांची नुकसानभरपाई मिळाली मात्र, खरडून गेलेल्या शेतजमिनीचे काय असा सवाल बैचेन करणाऱ्या 25 वर्षीय अजित बन या शेतकऱ्याने नदी पात्रातच उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
नुकसान न भरुन निघणारे
डोंगरगाव येथील अजित बन यांना मांजरा नदी पात्राला लागूनच शेत जमिन होती. अतिवृष्टीने खरीपातील सोयाबीन, उडीद, मूगाचे तर नुकसान झालेच पण नदी पात्रातील पाणी थेट बन यांच्या शेतामध्ये घुसले होते. त्यामुळे पिकं तर वहीवटलीच परंतू शेत जमिनही खरडून गेली. नुकसान भरपाईच्या अनुशंगाने सरकारने तुटपूंजी का होईना मदत केली मात्र, ज्यांची शेतीच खरडून गेली आहे त्यांच्याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अजित बन यांना नैराश्य आले होते. शिवाय त्यांनी पिक पेरणीसाठी कर्जही घेतले होते. पण आता शेतीच राहिली नाही तर कर्जफेड करायची कशी असा त्याच्या समोर होता. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
चाढ्यावर होती कर्जाची मूठ
खरीप हंगामातील पेरणीसाठी त्यांनी बॅंकेचे तर कर्ज काढले होतेच शिवाय मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून पैसे घेऊन खरीप हंगामातील पेरणी केली होती. मात्र, पिक जोमात असतानाच निसर्गाची अवकृपा झाली आणि बन यांच्या शेतीचे होत्याचे नव्हते झाले. वाढते कर्ज आणि परतफेडसाठी काही साधनच नसल्याने ज्या नदीपात्रातील पाण्यामुळे नुकसान झाले त्याच नदीत उडी घेऊन जीवन संपवले.
मराठवाड्यातील मंत्री झोपा काढत आहेत काय?
राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत केली आहे. शिवाय यामध्येही केवळ 75 टक्केच रक्कम अदा केली आहे. शेतकऱ्यांचे पिकच नाही तर सर्वस्वच वाहून गेली आहे. या दाहकतेची जाणीव सरकारला राहिलेली नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना मराठवाड्यातील मंत्री काय झोपा काढताता का असा सवाल आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी उपस्थित केला आहे. विदर्भासाठी वेगळा न्याय आणि मराठवाड्यासाठी वेगळा न्याय अशी भूमिका सातत्याने राज्य सरकार घेत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही बाब मराठवाड्यातील मंत्र्यांच्या निदर्शनास येत नाही काय? येथील मंत्री जनतेचे प्रश्न मार्गी न लावता झोपा काढतात का असा सवाल आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या :
ऊस उत्पादनाचे काय आहे गणित ? लागवडीपासून तोडणीपर्यंतची अशी घ्या काळजी अन् मिळवा भरघोस उत्पादन
रात्रीची थंडी, दिवसा ढगाळ वातावरण, तूरीवर मारुका किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना?