केवळ पिक विमा भरुनच नाही तर नुकसान भरपाईसाठी करावी लागणार ‘ही प्रक्रिया’

निसर्गाच्या लहरीपणामुळे सबंध (Kharif Hnagam) खरिप हंगाम धोक्यात आला आहे. ऐन शेवटच्या टप्प्यात खरिप असतानाच (Marathwada) मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र अतिवृष्टी झाली होती. यामुळे आता पिक विमा भरणारे शेतकरी हे नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, या भरपाईसाठी पिकाच्या नुकसानीनंतर अवघ्या 72 तासाच्या आतमध्ये 'क्रॉप इंशुरंन्स' या ऍप झालेल्या नुकसानीची माहिती भरणे बंधनकारक राहणार आहे.

केवळ पिक विमा भरुनच नाही तर नुकसान भरपाईसाठी करावी लागणार 'ही प्रक्रिया'
शेतकऱ्याचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 7:52 PM

लातुर : निसर्गाच्या लहरीपणामुळे सबंध (Kharif Hnagam) खरिप हंगाम धोक्यात आला आहे. ऐन शेवटच्या टप्प्यात खरिप असतानाच (Marathwada) मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र अतिवृष्टी झाली होती. यामुळे आता पिक विमा भरणारे शेतकरी हे नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, या भरपाईसाठी पिकाच्या नुकसानीनंतर अवघ्या 72 तासाच्या आतमध्ये ‘क्रॉप इंशुरंन्स’ या ऍप झालेल्या नुकसानीची माहिती भरणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाले असेल तर नोंद करणे आवश्यक आहे. खरिप हंगामात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला आहे. पेरणी होताच काही शेतकऱ्यांनी विम्यापोटी काही रक्कम कंपनीला अदाही केली आहे. मात्र, दरवर्षी यामधून नुकसानच होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पाठही फिरवली होती. शिवाय गतवर्षीही विमा कंपनीलाच अधिकचा फायदा झाला होता. विम्याच्या माध्यमातून तब्बल 10 हजार कोटींहुन अधिकचा फायदा हा कंपनीलक झाला होता. असे असतानाही केवळ विमा रक्कम अदा केली अन् नुकसान भरपाई मिळाली असे नाही. तर नुकसान भरपाई पदरात पाडून घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यानंतर अवघ्या 72 तासामध्ये झालेल्या पिक नुकसानीची माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर ऑनलाईन तक्रारीची दखल घेऊन विमा कंपनीचे कर्मचारी हे पिक पाहणीसाठी बांधावर येणार आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी ही रक्कम पडणार आहे. Farmer do Online complaint crop kharif required for compensation

अशी आहे प्रक्रिया…

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनीच ‘क्रॉप इंशुरंन्स’ या ऑपवर माहिती भरता येणार आहे. यामध्ये पिक पेरा किती क्षेत्रावर झाला आहे. पेरणी केलेल्या पिकांची नावे, पिकाचे क्षेत्र, शेतकऱ्याचे नाव, गट नंबर, शेतकऱ्याचे नाव आदी बाबींचा समावेश करावा लागणार आहे.

किचकट प्रक्रिया, तालु्क्याला एकच कर्मचारी

शेतकऱ्यांनी पिक विमा भरला की कृषी अधिकारी हे दुर्लक्ष करतात तर विमा कंपनीचा तालु्क्याच्या ठिकाणी एकच कर्मचारी नेमण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी शक्य़ नसल्याने हा मार्ग कंपनीच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. परंतू, या तांत्रिक बाबींची माहिती शेतकऱ्यांना नाही. शिवाय कोणी मार्गदर्शन करायलाही नसल्याने ही माहिती भरावी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

गतवर्षीही शेतकऱ्यांचे नुकसानच

गतवर्षीही खरिपाच्या अंतिम टप्प्यात पावसाची अवकृपा झाली होती. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा होती. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे तक्रार नोंदिवली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर विमा कंपनी ही फायद्यात राहिली होती. (Farmer do Online complaint crop kharif required for compensation)

संबंधित इतर बातम्या : 

आता दोन कोटी शेतकऱ्यांचा होणार नाही ‘सन्मान’, राज्यांची कारवाई

रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणं मिळवायचंय, कृषी विभागाचं अर्ज करण्याचं आवाहन

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, केंद्र सरकारकडून रब्बी हंगामाची MSP जाहीर, ‘इथे’ पाहा संपूर्ण यादी

(Farmer do Online complaint crop kharif required for compensation)

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.