AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरिपात नुकसान, रब्बी तरी पदरी पडू द्या, शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयातच ठिय्या

खरिपात निसर्गाने सत्वपरीक्षा घेतली पीकं तर पदरी पडली नाहीतच पण शेतजमिनीहा खरडून गेल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यात झाला होता. त्यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्च निघाला होता. आता कुठे रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच महावितरणच्या रुपाने सुल्तानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. मार्च महिन्याचे कारण सांगत किल्लारी परिसरात कृषीपंपाची थकबाकी वसुली मोहिम सुरु आहे.

खरिपात नुकसान, रब्बी तरी पदरी पडू द्या, शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयातच ठिय्या
कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी किल्लारी येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 10:13 AM

लातूर : खरिपात निसर्गाने सत्वपरीक्षा घेतली पीकं तर पदरी पडली नाहीतच पण शेतजमिनीही खरडून गेल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यात झाला होता. त्यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्च निघाला होता. आता कुठे (Rabi Season) रब्बी हंगामातील पिके जोमात असतानाच (MSEB) महावितरणच्या रुपाने सुल्तानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. मार्च महिन्याचे कारण सांगत किल्लारी परिसरात कृषीपंपाची थकबाकी वसुली मोहिम सुरु आहे. शिवाय वीजबिल अदा न केल्यास थेट (Power Supply) विद्युत पुरवठाच खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या कारवाईला त्रस्त होऊन किल्लारी परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच ठिय्या दिला होता. खरिपात निसर्गाच्या लहरीपणामुळे एकही पीक पदरी पडले नाही आता रब्बीत त्याचीच पुनरावृत्ती होत आहे फक्त या हंगामात निसर्गाची भूमिका महावितरण निभावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत

सध्या सबंध राज्यात वाढत्या थकबाकीमुळे कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. मात्र, ही मोहीम म्हणजे शेतकऱ्यांना कात्रीत पकडण्याची असल्याने शेतकऱ्यांच्या बांधापासून ते विधीमंडळापर्यंत हा प्रश्न पेटलेला आहे. असे असतानाही कोणताही तोडगा निघालेला नाही. सध्या पिके जोमात असून उन्हाचा कडाका वाढत आहे. पाणीसाठाही मुबलक आहे पण विद्युत पुरवठाच खंडीत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महावितरणने ही मोहीम खंडीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले होते.

रब्बी हंगामातील पिकांवरच शेतकऱ्यांची मदार

खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. सर्वकाही पाण्यात असताना शेतकऱ्यांना ऊसामधून उत्पन्न मिळेल असा आशावाद होता. पण अजूनही या भागातील 20 टक्के ऊस फडातच आहे. अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न कायम आहे. हे सर्व असले तरी पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा, गहू, सोयाबीन, ज्वारी ही पिके पोषक वातावरणामुळे बहरात आहेत. मात्र, सुरळीत विद्युत पुरवठ्याअभावी जोपासावी कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

महावितरणकडून मार्चएंडचे कारण

दरवर्षी मार्च महिन्याचे कारण पुढे करीत महावितरणची वसुली मोहीम ठरलेलीच आहे. पण यंदाची स्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने वीजबिल अदा करता येईल अशीही शेतकऱ्यांची स्थिती नाही. शिवाय पुन्हा रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान विद्युत पुरवठा खंडीत असल्या कारणाने झाले तर ही थकबाकी वाढतच जाणार आहे. त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Washim : शेतकरीही कमर्शियल, उन्हाळी हंगामात पारंपरिक पिकांना केले दूर अन् कडधान्यावर भर

Latur Market : सोयाबीन-हरभऱ्याचे दर स्थिर, आवक मात्र तेजीत, आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे चित्र?

अवकाळी, ढगाळ वातावरणानंतर आता उन्हाच्या झळा, मराठवाड्यात मात्र कोरडे वातावरण

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.