20 रुपयांनी मका पिकाची MSP वाढवून उत्पन्न दुप्पट कसं करणार? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

सर्वात कमी एमएसपी मका या पिकाची वाढली आहे. मका पिकाची एमएसपी 20 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. (MSP Maize)

20 रुपयांनी मका पिकाची MSP वाढवून उत्पन्न दुप्पट कसं करणार? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
मका
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 1:14 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादकांना त्यांच्या उत्पन्नाच्या मोबदल्याची रास्त किंमत मिळावी, या उद्देशाने सरकारने खरीप पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तीळ 452 रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर तूर आणि उडीद 300 रुपये प्रति क्विंटलसाठी करण्यात आली आहे. सर्वात कमी एमएसपी मका या पिकाची वाढली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. (Farmers are angry over MSP of maize only increased by 20 rupees)

शेतकरी का संतापले?

मका पिकाची किमान आधारभूत किंमत 20 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. मका पिकाची गेल्या वर्षीचं किमान आधारभूत किंमत 1850 रुपये क्विंटल होती ती यंदा 1870 रुपये करण्यात आली आहे. शेतीच्या मशागतीचा खर्च, कीटकनाशक आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती असताना क्विंटलमागे 20 रुपये वाढवून शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

मका पीक इतर पिकांना पर्याय कसा ठरणार?

काही राज्यांमध्ये पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून दुसऱ्या पिकांची लागवड करण्यात येत आहे. हरयाणा सरकारनं धानाला पर्याय म्हणून मका पिकाची लागवड करण्यास प्रोत्साहन देत आहे. किमान आधारभूत किमंत 20 रुपयांनी वाढणार असेल, मका पीक लागवडीकडे शेतकऱ्यांनी कसे वळावे, असा देखील सावल शेतकऱ्यांनी केला आहे.

डिझेल 24 रुपयांनी वाढलं

भारतात अनेक शेतकरी डिझेल पंपसेटवर शेती करतात. गेल्या वर्षभरात 24 रुपयांनी डिझेलचे दर वाडळे आहेत. दिल्लीत 10 जून 2020 ला डिझेलचे दर 62.29 रुपये प्रति लिटर होते. तर 10 जून 2021 मध्ये 86.47 रुपये झालं आहे. म्हणजेच वर्षभरात डिझेल 24.18 रुपयांनी महागलं आहे.

किमान आधारभूत किंमत का आवश्यक?

नामांकित अर्थशास्त्रज्ञ देविंदर शर्मा यांनी पंजाबमध्ये शेतकऱ्यांना मका 800 ते 850 रुपयांना विकावी लागते. एक क्विंटल उत्पादनासाठी 1246 रुपये खर्च येतो. आनलाईन मार्केट ई-नामवर 1500 रुपयांना एक क्विंटल मका खरेदी केली जाते. बिहार किसान मंचचे अध्यक्ष धीरेंद्र सिंह टुडू यांनी 20 रुपयांची वाढ करण्यात आली त्यामुळे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं दुप्पट करणार, असं विचारलं आहे.

संबंधित बातम्या:

गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ विक्रीला ऑनलाईन शुभारंभ, शेतकऱ्यांमध्ये दसपट दर मिळाल्यानं आनंदाचं वातावरण

शेतकऱ्यांना वार्षिक 10 हजार रुपये देणार, ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

(Farmers are angry over MSP of maize only increased by 20 rupees)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.