या जिल्ह्यात मिरची लागवड अधिक होणार, शेतकरी लागले मशागतीच्या कामाला…
या वर्षीच्या खरीप हंगामात मिरचीच्या क्षेत्रात प्रचंड अशी वाढ होणार असून शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. नर्सरीतून तयार मिरचीचे रोप आणून लागवड सुरू झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र वाढणार आहे.
जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक (Chilli growers) जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी बाजारपेठेत ओल्या, लाल मिरचीला चांगला दर मिळाल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचा (Farmer) मिरची लागवडीकडे कल वाढला आहे. यावर्षी जिल्ह्यात मिरचीच्या क्षेत्रात फोन हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात मिरची लागवडीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पपई तर काही ठिकाणी कापसाला पर्याय म्हणून मिरची लागवडीकडे कल वाढवला आहे.
या वर्षीच्या खरीप हंगामात मिरचीच्या क्षेत्रात प्रचंड अशी वाढ होणार असून शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. नर्सरीतून तयार मिरचीचे रोप आणून लागवड सुरू झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात मिरचीचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र त्याचसोबत लागवड खर्चात ही वाढ होणार आहे. नर्सरीतून मिरचीच्या एक रोप 1.25 ते 1.50 पैश्याना मिळत असून, मिरची एकरी एक लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून एकरी दोनशे ते अडीचशे क्विंटल उत्पादन येत असतो. खर्च आणि मजुरी काढून चांगला नफा प्राप्त होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर मागील वर्षाप्रमाणे बाजारात तेजी राहिल्यास अजून नफ्यात वाढ होईल असा अंदाज मोहन पाटील, शेतकरी यांनी व्यक्त केला आहे.
खरीप आणि रब्बी हंगामात पाऊस झाल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी सरकारच्या मदतीची वाट पाहत असून अद्याप मदत मिळाली नसल्याचं शेतकरी सांगत आहे. देशात अनेक राज्यात हवामानात बदल झाल्यामुळे पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात केळी बागा, त्याचबरोबर द्राक्षांच्या बागा, आंब्याच्या बागा अवकाळी पावसामुळे खराब झाल्या आहेत.