कापूस बाजारभाव : कापसाचा भाव वाढल्यामुळे शेतकरी आनंदी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी वाढल्यामुळे…
कापसाचे दर गेल्या काही दिवसांमध्ये हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आता कापूस विक्रीसाठी बाजारपेठेत आणायला सुरुवात केली आहे.
धुळे : शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कापसाचे दर (Cotton rates) 700 ते हजार रुपये प्रति क्विंटल मागे वाढल्यामुळे शेतकरी आनंदी आहे. धुळे जिल्ह्यातील (Dhule) बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस घरात सांभाळून ठेवला होता. गेल्या चार महिन्यांपासून कापसाचे दर हे 8 हजार रुपयांच्या पुढे जात नव्हते. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कापसाचे दर हे दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत जातील. मात्र दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी वाढल्याने दर चांगले मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाचे दर (In the international market Cotton rates) वाढल्यामुळे देशांतर्गत कापूस बाजारपेठेमध्येही तेजी निर्माण झाली आहे.
कापसाचे दर गेल्या काही दिवसांमध्ये हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आता कापूस विक्रीसाठी बाजारपेठेत आणायला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत कापसाचे दर आठ हजार क्विंटलच्या पुढे आहेत. हे दर अजून वाढावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. कारण शेतकऱ्यांनी इतक्या दिवस कापूस सांभाळून ठेवलेला आहे. त्याचा मोबदला चांगला मिळाला पाहिजे अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. तसेच रमजान महिना सुरू आहे, अस असतानाही कलिंगडला चांगले दर मिळते नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कलिंगडचे दर सात रुपये किलोच्या पुढे मिळत नसल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ग्राहकांना हाच कलिंगड 15 ते 25 रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्या किलोमागील किमतीत दुप्पट ते तिप्पटची तफावत आहे.
शेतकऱ्यांकडून व्यापारी 7 रुपये किवा त्यापेक्षा कमी किंमतीती कलिंगड विकत घेत आहेत. तोच कलिंगड ग्राहकांना किमान 15 रुपये किलोपेक्षा अधिक दराने विकला जातं आहे. किमतीतली ही मोठे तफावत शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहे. अनेक व्यापारी शेतकऱ्यांकडून स्वस्तात कलिंगड खरेदी करून, तो नेपाळ, दिल्ली सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवत आहेत, आणि त्या ठिकाणी चढ्या दरामध्ये कलिंगडची विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कलिंगडला किमान दहा ते बारा रुपये पर्यंतचे दर मिळावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.