कधी नव्हे ते शेतीमाल तारण योजनेला महत्व..! काय आहेत कारणे ?
सोयाबीनच्या दरात वाढ होईल ही आशा शेतकऱ्यांची मावळलेली आहे. शिवाय दर हे घसरतच आहेत. एकरी हजारो रुपये खर्च करुन काढलेले पीक आता कवडीमोल दरात विकायचे कसे म्हणून शेतकरी हे शेती माल तारण योजनेचा लाभ घेत आहेत.
उस्मानाबाद : सोयाबीनच्या दरात वाढ होईल ही आशा शेतकऱ्यांची मावळलेली आहे. शिवाय दर हे घसरतच आहेत. एकरी हजारो रुपये खर्च करुन काढलेले पीक (Agricultural Mortgage Scheme, ) आता कवडीमोल दरात विकायचे कसे म्हणून शेतकरी हे शेती माल तारण योजनेचा लाभ घेत आहेत. यापुर्वीही ही योजना कार्यन्वीत होती पण व्यापारी आणि शेतकरी यांचे घनिष्ठ संबंध असल्याने व्यापारी हे शेतकऱ्यांना उचल म्हणून काही रक्कम देत होते मात्र, आवक कमी आणि सध्याचे वातावरण यामुळे व्यापारी हात आखडते घेत आहेत. (Benefits to Farmers,) दोन दिवसांपासून या योजनेला सुरवात झाली असून कळंब सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 हजार क्विंटल सोयाबीन हे तारण म्हणून ठेवण्याात आले आहे तर 9 लाख रुपयांचे या कर्जापोटी वितरण करण्यात आले आहे.
उत्पन्न कमी आणि उत्पादनावर खर्च अधिक अशीच मुख्य पिक असलेल्या सोयाबीनची अवस्था झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला 11 हजारावर गेलेले सोयाबीन हे थेट 4 हजार 500 रुपयांवर आल्याने शेतकरी या वखार महामंडळाच्या योजनेचा लाभ घेत आहे. जनजागृती आणि योजनेचा फायदाही शेतकऱ्यांच्या निदर्शात आल्याने शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी सांगितले आहे.
वखार महामंडळाची जनजागृती
शेतकऱ्यांचा माल शेतात आहे तोपर्यंतच त्याच्या मालकीचा राहतो. एकदा का त्याची काढणी मळणी झाली की त्याचे दर ठरवण्याचा अधिकार हा व्यापाऱ्यांकडे येतो. शिवाय दर नसतानाही साठवणूकीचा प्रश्न असल्याने शेतकरी शेतातूनच थेट बाजारात मालाची विक्री करतो. योग्य दर होण्याची वाट न पाहता कवडीमोल दरात मालाची विक्री होते. शेतीमाल साठवणूकीसाठी वखार महामंडाळाने तशी सोय केली आहे. शेतीमाल तारण कर्ज या माध्यमातून शेतीमालाची साठवणूक करता येते शिवाय कर्जही मिळते. मात्र, याबाबत जनजागृती नसल्याने वखार महामंडाळाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या सर्व योजनांची माहीती देण्यासाठी वखार आपल्या दारी हे अभियान राबवले जाणार आहे. 15 जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार असून सोमवारपासून उस्मानाबाद येथून या अभियानाला सुरवात झाली होती.
शेतीमालावर मिळते कर्ज
1.शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.
2. शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.
3. शेतमाल प्रकार : काजू बी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.
4. शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे. (Farmers benefit from agricultural mortgage scheme, emphasis on storage as soyabean does not have a rate)
संबंधित बातम्या :
शेत जमिनीची गुणवत्ता जाणून घ्या मृदा कार्ड योजनेतून अन् उत्पादन वाढवा
आता शेतरस्त्यांचा प्रश्न मिटणार, शेत-पाणंद रस्ते उभारणीसाठी राज्य सरकारची योजना