अहमदनगर : गेल्या वर्षभरापासून शेतकरी हा नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे डाळिंब बागांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रादुर्भाव कमी व्हावा चकाकी यावी यासाठी फवारणी केलेल्या बुरशीनाशकाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचा प्रकार कृषी विभागाच्या चोकशीत समोर आला आहे. (Fake pesticides) बनावट बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे 25 लाखांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतेही किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पिकाचे तर नुकसान होईलच शिवाय किटकनाशकांवर होणारा खर्च हा वेगळाच.
गावडेवाडीतील प्रकाश व विनोद गावडे हे डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. मात्र, डाळिंब काढणीला आले असताना त्यांच्यावर कीडीचा प्रादुर्भाव होऊ नये व चकाकी यावी याकरिता त्यांनी बायोसोल नावाचे बुरशीनाशक फवारले. मात्र, फवारणीनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये फळगळ होण्यास सुरवात झाली होती. यामध्ये त्यांचे 25 लाखाचे नुकसान झाले आहे. झालेल्या घटनेनंतर त्यांनी कृषी विभागात तक्रार नोंद केली होती. मिरजगाव येथील निविष्ठा विक्री करणाऱ्या दुकानावर छापेमारी केल्यानंतर त्या बुरशीनाशकाची कोणती कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समोर आले होते.
किटकनाशकाच्या किमतीाधील फरक यावरवरुनही बनावट किटकनाशके हे ओळखता येते. शेतकरी किटकनाशके खरेदी करण्यात गेला असता विक्रेत्याकडून एमआरपी नुसार विक्री न करता अगदी कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे शेतऱ्यांनीही कमी किमंत आहे म्हणून त्याची खरेदी करू नये असा सल्ला कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिला आहे.ज्या कंपनीच्या किटकनाशकाला अधिकची मागणी आहे त्याच नामांकित कंपनीच्या नावानेच बोगस किटकनाशके ही बाजारात दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची अंतिम मुदतीची तारिख व इतर बाबी तपासूनच खरेदी करणे आवश्यक आहे.
किटकनाशकांची तपासणी करूनच ती बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावीत असा नियम आहे. मात्र, तपासणी ह करताच ती शेतकऱ्यांवर लादली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय खरेदीनंतर शेतकऱ्यांना अधिकृत पावतीही दिली जात नाही.