फळगळतीमुळे उभ्या संत्रा बागांवर कुऱ्हाड, उत्पादन निम्म्यावर
बागायती क्षेत्र असो की कोरडवाहू यंदा शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. आता जिल्ह्यात संत्र्याच्या फळबागा अंतिम टप्प्यात असतानाच फळगळीताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे बागायत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळगळ ही नियंत्रणाबाहेर गेल्याने जिल्ह्यातील पवनी, नांदगाव, खंडेश्वर या गावातील शेतकऱ्यांनी संत्रा बागच वावरातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
अमरावती : बागायती क्षेत्र असो की कोरडवाहू यंदा शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरुच आहे. आता जिल्ह्यात (Orange Gardener) संत्र्याच्या फळबागा अंतिम टप्प्यात असतानाच (Fruit Leakage) फळगळीताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे बागायत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ( (Decline in Production)) फळगळ ही नियंत्रणाबाहेर गेल्याने जिल्ह्यातील पवनी, नांदगाव, खंडेश्वर या गावातील शेतकऱ्यांनी संत्रा बागच वावरातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले तरी चालेल पण भविष्यातील खर्च तरी होणार नाही ही शेतकऱ्यांची भावना झाली आहे.
दरवर्षी फळगळती व कीड रोगाने शेतकरी हे त्रस्त आहेत. उत्पादनावर झालेला खर्चही निघत नसल्याने बागायत शेतकरी केवळ नावालाच राहिलेले आहेत. फळगळतीने उत्पादनात मोठी घट होत असल्याने जिल्ह्यातील सर्रास शेतकरी हे बाग तोडणीवरच भर देत असल्याचे चित्र आहे. आंबिया बहरातील फळगळतीचे प्रमाण वाढत आहे. शिवाय कृषी विद्यापीठाकडूनही मार्गदर्शन मिळत नसल्याने हताश शेतकरी हे बाग शेताबाहेर काढून टाकण्याच्या तयारीत आहेत. आता संत्राबाग काढून टाकण्यावरच शेतकऱ्यांचा भर आहे. शिवाय भविष्यात यामध्ये वाढ होणार असल्याचेच चित्र आहे.
उत्पादकतेवर परिणाम
जिल्ह्यातील सर्वच फळबागांची फळगळती ही सुरु आहे. विदर्भातील कॅलिफोर्निया अशी ओळख वरुड तालुक्यातही नैराश्यातून शेतकऱ्यांनी संत्रा बागेची तोडणी केली आहे. त्यामुळे या सबंध गोष्टींचा परिणाम आता संत्रा उत्पादनावर होणार आहे. दरवर्षी जिल्ह्यात 5 लाख टनाचे उत्पादन होत असते पण यंदा ते निम्म्यावर येण्याचा धोका आहे. अशा प्रकारे नुकसान होत असतानाही केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था किंवा डॅा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून पूरक उपाययोजनांबाबत कोणत्याही शिफारशी आलेल्या नाहीत हे विशेष
दरवर्षीचे नुकसान
दरवर्षी आंबिया बहरातील फळांची गळ ही ठरलेलीच आहेय त्यामुळे ऐन उत्पादन पदरी पडत असतानाच बागायत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबिया बहरातील फळांची गळ झाली. या वर्षी देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर सर्व्हेक्षण, पंचनामे व भरपाईची मागणी झाली. मात्र, शासनाकडूनच याकडे दुर्लक्ष होत आहे.
आंबिया बहर म्हणजे नेमके काय?
आंबिया बहर हे नोव्हेंदर-डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जाणारे फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे.
धोका फळमाशीचा
फळमाशी ही झाडाच्या खोडात अंडी घालते. अंड्यातील अळ्या ह्या फळाचा गरच खातात. एवढेच नाही तर माशीने तयार केलेल्या छिद्रातून सुक्ष्म किटक हे फळात जातात व फळ हे सडायला लागते. सडलेले फळ हे खाली पडते.
कसे करायचे व्यवस्थापन ?
व्यवस्थापन करण्यापूर्वी जमिनीवर पडलेली फळे ही लागलीच नष्ट करावीत. जेणे करुन इतर झाडांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. फळमाशी ही झाडाखाली जमिनीत कोषावस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीची नांगरण करुन कोष नष्ट करावे लागणार आहेत. या करिता 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी लागणीर आहे.
संबंधित बातम्या :
ऐन रब्बीत ‘डीएपी’ खताचा तुटवडा ; पुरवठ्यातही राजकारण, शेतकऱ्यांकडे काय आहे पर्याय?
बासमती तांदूळ अजून ‘भाव’ खाणार, पावसामुळे नुकसानीचा परिणाम दरावर
शेतकऱ्यांच्या मनातला दर बाजारात, दोन महिन्यात 4 हजाराने वाढले कापसाचे भाव