‘अहो मी तर तुमचाच कार्यकर्ता’, खासदारासमोर टाहो, ‘ऊसाच्या बिलासाठी चकरा मारुन थकलो’
काका मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझा भाचा तळमळून मेला हे बरोबर नाही. वेळत पैसे मिळाले नाहीत म्हणून दवाखान्यात भाचा मेला, असे म्हणत शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे.
राजेंद्र कांबळे, प्रतिनिधी, सांगली : जिल्ह्याचे खासदार संजय पाटील (Mp Sanjay Patil) यांच्या मालकीच्या नागेवाडी व तासगाव कारखान्याचे बिल गेले वर्षभर न दिल्याने शेतकऱ्याने (Farmer) गहिवर मांडला. काका मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझा भाचा तळमळून मेला हे बरोबर नाही. वेळत पैसे मिळाले नाहीत म्हणून दवाखान्यात भाचा मेला, असे म्हणत त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatna) वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. तो मोर्चा शिवाजी महाराजांना वंदन करून तो मोर्चा विटा नाका येथे आला. चिंचणी रोड येथे पोलिसांनी तो मोर्चा रोखला यावेळी पोलिसांची व स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांची धुमचक्री झाली, परत तो मोर्चा विटा नाका येथे थाबला.
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको
मोर्चा थांबल्यानंतर शेतकरी संघटनेने आक्रमक होत तेथे रस्ता रोको केला. त्यावेळी खासदार संजय काका पाटील हे मोर्चा स्थळी आले आणि त्यानी सागीतले की येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत ऊस बिले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतो. मात्र शेतकऱ्यांनी ते मान्य केले नाही. आता 2500 रूपये नाही 2850 रुपये घेतल्याशिवाय माघार नाही. बेमुदत ठिया आंदोलन तहसीलदार कार्यालय तासगाव येथे सुरू आहे, असे संघटनेकडून सांगण्यात आले. सततच्या नैसर्गिक संकटाचांचा सामना करणारा बळीराजा त्याच्या हक्काच्या पैशासाठी वणवण करतोय.
यावेळी मोर्चातच खासदार संजय पाटील यांच्यासमोर एक शेतकरी गहिवरला आणि म्हणाले,”संजय काका मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, माझा भाचा तळमळून मेला हे बरोबर नाही. वेळ पैसे मिळाले नाहीत म्हणून दवाखान्यात भाचा मेला.”कारखान्याचे बिल ना मिळाल्याने शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या वर्षभरापासून वारंवार चेक आणि तारखा मिळाल्याने शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आता जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तो पर्यंत तासगाव तहसील कार्यालया समोरून उठणार नाही अशी भूमिका शेतकरी यांनी व्यक्त केली आहे. वर्षभर कर्ज काढून, पोट मारून पिकं उभी केली जातात, त्यानंतर ऊस कारखान्याला तुटून गेल्यावरतरी शेतकऱ्याला वेळेत त्याच्या हक्काचे पैसे मिळावे ही अपेक्षा असेत. बिलासाठी कारखान्याच्या चकरा मारून थकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा अशा रितीनी बाहेर आल्या आहेत. त्याचा गांभीर्याने विचार व्हावा अशा भावना शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहेत.