16 हजारांची रोपं…लाखोंचा खर्च अन् सिमला मिरची थेट बांधावर
पावसाने (Rain) केवळ खरिप हंगामातील पिकाचेच नुकसान केले नाही तर भाजीपाला, फळबागा (vegetable) यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत शेतकरी नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात पण निसर्गाची अवकृपा आणि बाजार भावाचे गणित शेतकऱ्यांना जुळत नसल्याने नुकसानच पदरी पडत आहे. यापुरर्वी नाशिक, उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजीपाल्याच्या दराचे वास्तव समोर आले होते तर आता बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील. पावसाने सिमला मिरचीचे नुकसान झाले असून 25 टन मिरची ही बांधावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढावलेली आहे.
बीड : पावसाने (Rain) केवळ खरिप हंगामातील पिकाचेच नुकसान केले नाही तर भाजीपाला, फळबागा (vegetable) यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत शेतकरी नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात पण निसर्गाची अवकृपा आणि बाजार भावाचे गणित शेतकऱ्यांना जुळत नसल्याने नुकसानच पदरी पडत आहे. यापुरर्वी नाशिक, उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजीपाल्याच्या दराचे वास्तव समोर आले होते तर आता बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील. पावसाने सिमला मिरचीचे नुकसान झाले असून 25 टन मिरची ही बांधावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढावलेली आहे.
पारंपारिक पध्दतीने शेतीचे उत्पन्न वाढत नाही म्हणून आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील अरुण दादासाहेब पाडोळे यांनी एका एकरामध्ये सिमला मिरचीची लागवड केली होती. तब्बल 16 हजार रुपये खर्ची करून त्यांनी ही रोपे आणली होती. सर्व काही सुरळीत होते, लागवडीनंतर पाऊसही वेळेवर झाले होते. त्यामुळे भविष्यात उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकरी पाडोळे यांना होती.
मात्र, सिमला मिरची काढणीला आली असतानाच पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जी अवस्था खरिपातील पिकांची झाली आहे त्यापेक्षा जास्त सिमला मिरचीची. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीडीचा प्रादुर्भाव वाढल्याने सिमली मिरचीचे नुकसान झाले आहे. लागवडीपासून किटकनाशक, फवारणी, मशागत यावर पाडोळे यांनी दीड लाख रुपये खर्ची केले होते. शिवाय मिर्ची जोमात असल्याने ते बाजारपेठेत दर काय सुरु आहेत.
य़ाच्या चौकशीसाठी बाजार पेठेचा अभ्यासही करीत होते मात्र, पावसाने सर्वकाही हिरावून घेतले आहे. पावसाचे पाणीच मिरचीच्या फडात साठल्याने काढणीही शक्य झाली नाही. या मिरचीतून एकरी त्यांना दोन लाखाच्या उत्पादनाची आशा होती मात्र, सर्वकाही व्यर्थ गेल्याची शेतकरी अरुण पाडोळे यांची भावना झालेली आहे.
काढणीअभावी सडली मिरची
पावसाचे पाणी सिमला मिरचीच्या फडातच साचलेले होते. सलग 15 दिवस पाऊस हा लागूनच असल्याने मिरचीची तोडणीही झाली नाही. हिरव्या मिरच्या झाडालाच वाळल्या मात्र, पावसाने उघडीप दिली नाही आणि आता ही मिरची बांधावर टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढावलेली आहे.
हजारो रुपयांचे नुकसान
मिरची लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याला एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना आलेला आहे. आता हिरवी मिरची झाडालाच लाल झाली आहे. असे असताना बाजारात केवळ 6 रुपये किलो असा दर मिळत असल्याने त्याची काढणी करण्यापेक्षा त्यावर नांगर फिरवणेच शेतकऱ्यांनी पसंत केले आहे.
नांदेडमध्येही भाजीपाल्याला कवडीमोल भाव
शेती पिकांना बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने मेटाकुटीस येत येवल्यात रस्त्यावर टोमॅटो फेकून देतात टोमॅटोचा लाल चिखल केला तर सिमला मिरची, साधी मिरची उपटून देत बांधावर फेकून देत आहेत. त्या पाठोपाठ आता पपईला बाजार भाव नसल्याने येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर मारून संपूर्ण पपई भाग उद्ध्वस्त केली.
सिमला मिरचीला 4 रुपयाचा भाव
येवल्याच्या बाजारपेठेत वाढत असलेली भाजीपाल्याची आवक आणि पावसामुळे झालेला परिणाम यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मध्यंतरी टोमॅटोचे दर कमा झाले होते तर आता सिमला मिरचीचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत की नाही हा प्रश्न आहे. Farmers’ disappointment with chilli production, throwing away chillies
संबंधित बातम्या :
सोयाबीनचे दर स्थिर, उडदाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग
पीक पेऱ्याच्या नोंदी वाढवण्यासाठी नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गाव स्तरावर यंत्रणा
‘एफआरपी’ चा साखर कारखानदारांना विसर, राज्यातील कारखान्यांकडे कोट्यावधीची थकबाकी