ठिबक सिंचनास वाढीव अनुदान म्हणजे, पुढचे पाठ.. मागचे सपाट ; काय आहे नेमका प्रकार?
शेततळ्याचे रखडलेले अनुदान दिले जाणार आहे तर ठिबक सिंचनाच्या अनुदनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. मात्र, ठिबकच्या अनुदनात वाढ झाली पण दोन वर्षापासून रखडलेल्या अनुदनाचे काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण राज्यातील तब्बल 2 लाख 75 हजार शेतकरी यांनी योजनेच्या माध्यमातून ठिबकची उभारणी केली आहे. मात्र, त्यांना अद्यापही अनुदान हे मिळालेले नाही.
लातूर : गेल्या तीन दिवसांमध्ये राज्य सरकारने कृषी क्षेत्राच्या अनुशंगाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शेततळ्याचे रखडलेले अनुदान दिले जाणार आहे तर ( Drip irrigation scheme) ठिबक सिंचनाच्या अनुदनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. मात्र, ठिबकच्या अनुदनात वाढ झाली पण दोन वर्षापासून रखडलेल्या (grants stalled) अनुदनाचे काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण राज्यातील तब्बल 2 लाख 75 हजार शेतकरी यांनी योजनेच्या माध्यमातून ठिबकची उभारणी केली आहे. मात्र, त्यांना अद्यापही अनुदान हे मिळालेले नाही.
एकीकडे राज्य सरकार शेतकरी हीताच्या मोठ-मोठ्या घोषणा करीत आहे तर दुसरीकडे अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. दोन दिवसांपूर्वीच ठिबक सिंचनासाठीचे अनुदान हे 45 टक्क्यांहून 80 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय निर्णयाचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडले त्यांचे काय असा सवाल कायम आहे.
रखडलेल्या अनुदानासाठी कोट्यावधी रुपयांची आवश्यकता
ठिबक सिंचन ही काळाची गरज बनले आहे. त्यानुसार शेतकरी हे योजनेचा लाभ घेत असतात. पूर्वी 45 टक्के अनुदान असतानाही राज्यातील तब्बल दोन लाख 75 हजार शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टल नोंदणी करुन ठिबक सिंचन योजनेत सहभाग नोंदवून संच उभारला. मात्र, 45 टक्के अनुदनाच्या अनुशंगाने सरकारकडे 568 कोटी रुपये हे थकीत आहेत. असे असतानाच आता वाढीव अनुदानात ठिबक सिंचनाचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे पाठ..मागचे सपाट अशीच सरकारची भुमिका आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
पूर्वसंमती मिळूनही अडकले अनुदान
ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम महाडिबीटी या ऑनलाईन पोर्टल वर माहिती भरुन अनुदानच्या लाभासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ही किचकट प्रक्रिया पार करुनही राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला. शिवाय शेतकऱ्यांना पूर्वसंमतीही मिळाली. त्यानंतर ठिबकसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीही करण्यात आली. साहित्य खरेदीचे बिल शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे सादरही केले मात्र, त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही अनुदान जमा झालेले नाही. आतापर्यंत कोरोनाचे कारण सांगितले जात होते पण आता अनुदान वितरीत करण्याचे अधिकार हे आयुक्तालयाकडे देण्यात आल्याने अजून अडचणी वाढलेल्या आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे. यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल. यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.