पावसामुळं शेतकरी संकटात, खरिपाच्या पिकांचं नुकसान, वाशिममध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

खरिप हंगामातील पिकांची काढणी अंतीम टप्प्यात असताना राज्यात पावसानं हजेरी लावलीय. पिके  काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

पावसामुळं शेतकरी संकटात, खरिपाच्या पिकांचं नुकसान, वाशिममध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 6:13 PM

मुंबई: खरिप हंगामातील पिकांची काढणी अंतीम टप्प्यात असताना राज्यात पावसानं हजेरी लावलीय. पिके  काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. अनेक ठिकाणी सोयाबीन, भात काढणी सुरू असताना झालेल्या पावसामुळं पिकांचे नुकसान झालं आहे. आहे. नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, वाशिम, हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला. ऊस, बाजरी, मूग, तूर, संत्रा, कपाशी, भात, हळद सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ( Farmers facing problems due to rain, many crops damaged in rain, two died in thunder storm in Washim)

वाशिममध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सोयाबीन गंजीवर ताडपत्री टाकण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तर नारेगाव येथील 15 वर्षीय धीरज धोरक व पिंपळगाव इथल्या 55 वर्षीय नानासाहेब टोंग हे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर

जिल्ह्यातील कर्जत आणि शेवगाव तालुक्यात वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालं. अतिवृष्टीने भागातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. या पिकांमध्ये ऊसाचे सर्वाधिक नुकसान, तोडणीसाठी आलेला ऊस जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या वादळी पावसामुळे बाजरी, मूग, तूर आदी पिकांचे नुकसान झाले होते जोरदार सुरू असलेल्या पावसाने शेवगाव तालुक्यातील बोधे गाव येथे नदीला पूर आल्याने शेवगाव- गेवराई मार्ग ५ तासांपासून पाण्याखाली होता. बोधेगाव येथील पूलावरही पाणी आले होते.

अमरावती

सोयाबीन पीक विदर्भात सर्वाधिक घेतलं जातं. मात्र, सोयाबीन काढणीवेळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळं गंजी लावलेलं सोयाबीन पाण्याने पूर्णतः भिजलं आहे. पावसाने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. या वर्षी अमरावती जिल्ह्यातील संत्रा, कपाशी, आणि सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. कपाशीचे बोंड देखील पावसाने खराब झालेली आहे. आता, सरकार यातून सावरण्यासाठी कोणती पावलं उचलतं याकडे शेतकरी लक्ष लावून बसलेला आहे.

अकोला

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. शेतामध्ये कापलेले सोयाबीन तसेच शेतात वेचानीसाठी आलेला कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्हातील मूर्तिजापूर येथे जोरदार पाऊस झाला. यामुळं सोयाबीन,कापूस,तूर पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

ठाणे: भातशेतीचे नुकसान

शहापूरमध्ये पावसाने भात शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. भातशेती वर अगोदरच करपा आणि खोड किडा पडल्याने शेतीचे नुकसान झाले होते, तर त्यामध्ये आता पावसाची भर पडल्याने भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी राजा संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी जोर धरत आहे..

हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास एक तास मुसळधार पाऊस झाला. या झालेल्या पाऊसामुळे सोयाबीन उत्पादक शेतऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. कापून टाकलेल्या सोयाबीनचं मोठ्या प्रमानात नुकसान झालंय तर, कापूस ,तूर या सह इतर पिकांचं ही मोठ नुकसान झाले. सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्या मुळे विद्युत पोल व झाडे उखळून पडले होते.

बुलडाणा

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद सोंगून त्याच्या गंजी लावल्या आहेत, तर काही प्रमाणात उडीद पिकांचे नुकसान ही झालंय. चिखली, मेहकर, डोनगांव सह लोणार तालुक्यातील भुमराळा, वझर आघाव, किनगाव जट्टू, सावरगाव तेली, सह तालुक्यात अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने सोयाबीन पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, काही भागात अचानक आलेल्या पावसामुळे सोंगून टाकलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांना गोळा करण्याआधी पूर्णपणे पावसाच्या पाण्यात भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

वाशिम

कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सोयाबीन गंजीवर ताडपत्री टाकण्यासाठी गेलेल्य दोन जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. नारेगाव येथील 15 वर्षीय धीरज धोरक व पिंपळगाव इथल्या 55 वर्षीय नानासाहेब टोंग या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे रिसोड तालुक्यातील काढणी झालेले सोयाबीन शेतात भिजले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. दुसरीकडे मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात सोयाबीन काढणी दरम्यान टॅक्टर चिखलात फसत असल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

परभणी : सोयीबनसह हळदीला पावसाचा फटका

शहरासह जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मूग, उडीद सोयाबीन पीक देखील हातचे जाते की काय, अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.

थोडाफार उरलेल्या कापूस पिकावर लाल्या (दहिया) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात मोठ्या प्रमाणांत पाणी जमा झाल्याने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. बदलत्या वातावरणामुळे अनेक भागात कीडी,बुरशीजन्य रोगांनी डोक वर काढलय. हळद पिकावर हुमणी,आणि पर्णकरपा,रोगांचा प्रादुर्भाव झालाय. या मुळे उत्पादनात घट होणार असून हळद उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

रत्नागिरीतील भातशेतीचे नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री पाऊस कोसळला. रात्री पडलेल्या पावसामुळं कोकणातील भातशेतीचं प्रचंड नुकसान झालय. भातशेती पाण्याखाली गेलीय. भातशेती तयार झाल्याने इथल्या शेतकऱ्यांना भात कापणीला सुरुवात केली होती. कापलेलं भात पाण्यात गेल्यानं ते पुन्हा रुजण्याची भिती शेतकऱ्यांन वाटू लागलीय.

संबंधित बातम्या:

Maharashtra Rain | मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूरपर्यंत जोरदार पाऊस

Weather Alert: पुढच्या 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून इशारा

( Farmers facing problems due to rain, many crops damaged in rain, two died in thunder storm in Washim)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.