कारखानदारांची दिवाळी, शेतकऱ्यांच मात्र दिवाळं, ‘मातोश्री’ कारखान्याकडून एका ‘मातेची’ चेष्टा

साखर कारखान्याचे नाव मातोश्री साखर कारखाना पण कारभार किती मनमानी आहे याचा प्रत्यय अक्कलकोट तालुक्यातील कारखान्याच्या प्रशासनाकडे पाहिल्यावर येतो. एका वयोवृध्द महिलेच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर त्या महिलेचे कारखान्याकडील हक्काच्या पैशासाठी रस्त्यावर उपोषण सुरु आहे.

कारखानदारांची दिवाळी, शेतकऱ्यांच मात्र दिवाळं, 'मातोश्री' कारखान्याकडून एका 'मातेची' चेष्टा
मातोश्री साखर कारखान्याकडील थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचे उपोषण
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 4:07 PM

रोहित पाटील: सोलापूर : साखर कारखान्याचे (Sugar Factory) नाव मातोश्री साखर कारखाना पण कारभार किती मनमानी आहे याचा प्रत्यय (Solapur) अक्कलकोट तालुक्यातील कारखान्याच्या प्रशासनाकडे पाहिल्यावर येतो. एका वयोवृध्द महिलेच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर त्या महिलेचे कारखान्याकडील हक्काच्या पैशासाठी रस्त्यावर उपोषण सुरु आहे. तब्बल 200 टन ऊसाची थकबाकी कारखान्याकडे असल्याने या महिलेवर उपोषणाची वेळ आलेली आहे. एकीकडे साखर कारखानदारांची दिवाळी सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र, ऐन रस्त्यावर उपोषण करीत हक्काच्या पैशाची मागणी करावी लागत आहे.

निसर्गाचा लहरीपणा त्यात साखर कारखानदारांची मनमानी यामध्ये भरडला जातोय तो शेतकरी. एफआरपी ची रक्कम सोडाच पण ऊसाचे हक्काचे बीलही न मिळाल्याने एका शेतकरी महिलेवर उपोषणाची वेळ आलेली आहे. तब्बल 200 टन ऊसाची रक्कम गेल्या वर्षभरापासून पदरी न पडल्याने तुळजापूर तालुक्यातील लक्ष्मीबाई यांच्यावर भर दिवाळीच्या सणामध्ये रस्त्यावर उपोषण करण्याची नामुष्की ओढावली आहे. अक्कलकोट येथील मातोश्री कारखान्याकडे लक्ष्मीबाई यांचे 200 टन ऊसाचे बील अडकलेले आहे. त्यामुळे त्या सोलापूर रस्त्यावर शेतकऱ्यांसमवेत उपोषणाला बसलेल्या आहेत. मात्र, निगरगट्ट कारखाना प्रशासनाला याचे गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे.

लक्ष्मीबाई यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

उस्मानाबाद तालुक्यातील तुळजापूर तालुक्यातील आरळी येथील लक्ष्मीबाई तानवडे येथील महिला शेतकरी. सध्या सर्वत्र गाव दिवाळी साजरी करत असताना लक्ष्मीबाईंना मात्र, दिवाळी सोलापूरच्या रस्त्यावर साजरी करावी लागत आहे, कारण तसच आहे, लक्ष्मीबाई तानवडे यांच्या शेतातील तब्बल 200 टन ऊस अक्कलकोट येथील मातोश्री साखर कारखान्याकडे घालण्यात आला होता. मात्र मागील वर्षांपासून लक्ष्मीबाई तानवडे यांना उसाच्या बिलाच्या पोटासाठी एक रुपयाही मिळाला नाही, त्यातच लक्ष्मीबाई यांच्या मुलावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. मात्र इलाजासाठी पैसे नाहीत म्हणून बिलासाठी शेतकत्यांनी सुरू केलेल्या उपोषणात सहभागी झाल्या आहेत

कारखान्याचे चेअरमन हे माजी आमदार

अक्कलकोट येथील मातोश्री साखर कारखान्याचे चेअरमन हे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे आहेत. या कारखान्याने तब्बल 200 हून अधिक शेतकऱ्यांचे ऊसबिल हे थकविण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. लक्ष्मीबाई यांच्या मुलावर सोलापूर येथीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून मुलाची देखभाल करण्याऐवजी त्यांच्यावर उपोषणाची वेळ ओढावली आहे. तुळजापूर तालुक्यातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी दिवस-रात्र उपोषण सुरु केले आहे. यामध्ये उपचारासाठी लक्ष्मीबाई यांनाही पैशाची गरज असल्याने त्या ही सहभागी झाल्या आहेत.

आता काँग्रेस तत्परता दाखविणार का?

एकीकडे उत्तर प्रदेशमधील लखिमपूर खेरी येथील घटनेचा काँग्रेसने मोठ्याप्रमाणात निश्चित करत महाराष्ट्र बंद पुकारला होता. संबंध देशात हा बंद पाळण्यात आला होता. मात्र, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचाच चेअरमन असलेल्या कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्या्ंवर अन्याय होत आहे. त्यामुळे येथे काँग्रेस तत्परता दाखविणार का सवाल आहे. (Farmers’ fast for outstanding sugarcane bill, elderly woman also included)

संबंधित बातम्या :

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुना, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आम्हालाही दिवाळी साजरी करु द्या..! किसान सभेची संघर्ष दिंडी बीडमध्ये ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या

दिल्ली सीमेवरुन शेतकऱ्यांना हटवले तर मंडई सरकारी कार्यालयातच, राकेश टिकैत यांनी दिली सरकारला ‘डेडलाईन’

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.