Soybean : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडे अनेक पर्याय, खरिपाच्या तोंडावर नेमकं घडलं तरी काय?

भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने जे सोयाबीनेचे नव्याने वाण निर्माण केले आहे. त्याचा फायदा हा उत्पादनवाढीसाठी होणार आहे. विशेष म्हणजे हे वाण मर्यादित क्षेत्राकरिता राहणार आहे. यामध्ये उत्तर पर्वतीय क्षेत्राकरिता वीएलएस 99, उत्तर मैदानी क्षेत्राकरिता एनआरसी149 तसेच मध्य क्षेत्राकरिता 4 वाणांचा समावेश असणार आहे. यामध्ये एनआरसी 152, एनआरसी 150, जे-एस 21-72, हिम्सो 1689 हे वाण असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Soybean : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांकडे अनेक पर्याय, खरिपाच्या तोंडावर नेमकं घडलं तरी काय?
बियाणे
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 11:43 AM

नागपूर :  (Kharif Season) खरीप हंगाम तोंडावर असतानाच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोयाबीन उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आता नव्याने 6 वाण मिळणार आहेत. इंदूर येथील (Soyabean Research Institute) भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या पार पडलेल्या वार्षिक बैठकीत उत्तरी मैदानी तसेच मध्य क्षेत्राकरिता (Soyabean varieties) सोयाबीनच्या या नव्या 6 वाणांची शिफारस करण्यात आलेली आहे. यामध्ये उत्पादन वाढीचे वाण असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.सोयाबीन उत्पादनाचे केंद्रबिंदू असलेल्या मध्यप्रदेशातील मालवा येथे ही 150 संशोधकांची बैठक पार पडली आहे.

सोयाबीनचे सहा वाण, उत्पादनात वाढ

भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने जे सोयाबीनेचे नव्याने वाण निर्माण केले आहे. त्याचा फायदा हा उत्पादनवाढीसाठी होणार आहे. विशेष म्हणजे हे वाण मर्यादित क्षेत्राकरिता राहणार आहे. यामध्ये उत्तर पर्वतीय क्षेत्राकरिता वीएलएस 99, उत्तर मैदानी क्षेत्राकरिता एनआरसी149 तसेच मध्य क्षेत्राकरिता 4 वाणांचा समावेश असणार आहे. यामध्ये एनआरसी 152, एनआरसी 150, जे-एस 21-72, हिम्सो 1689 हे वाण असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोयाबीन वाणांची ही आहेत वैशिष्ट्ये

नव्याने दाखल झालेले सोयाबीन वाण हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहणार आहेत. त्याचबरोबर त्या वाणाचे वैशिष्टे देखील महत्वाचे राहणार आहे. यामधील एनआरसी 150 हे वाण अवघ्या 91 दिवसांमध्ये परिपक्व होते तर यामध्ये उत्पादित होणाऱ्या वाणामध्ये विशिष्ट असा गंध असतो. एनआरसी 152 हे वाण 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीमध्ये परिपक्व होते असा दावा संस्थेने केला आहे. शिवाय खादान्य म्हणूनही याचा वापर होणार आहे.

हे सुद्धा वाचा

सोयीबीन क्षेत्रामध्ये होणार वाढ

यंदा खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. त्यासाठी पोषक वातावरण असून गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय यंदा सरासरीप्रमाणे दरही मिळाला आहे. सोयाबीन हे खरीप हंगामातील हुकमी पीक असून मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहेत. देशात सर्वाधिक क्षेत्र हे मध्यप्रदेशात असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात उत्पादन घेतले जाते. यंदाही शेतकऱ्यांनी सर्वतोपरी तयारी केली असून पेरणी योग्य पाऊस होताच शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.