…म्हणून सोयाबीनची आवक कमी, शेतकऱ्यांचा साठवणूकीवर भर

यंदा खरीपातील हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तरी सोयाबीनच्या भावाने उचल खालेली नाही. उलट गेल्या चार दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 400 ते 500 रुपयांनी दर घसरेले आहेत. पावसाने खराब झालेल्या सोयाबीनची विक्री झाली आहे. आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला कमीच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे.

...म्हणून सोयाबीनची आवक कमी, शेतकऱ्यांचा साठवणूकीवर भर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 1:23 PM

लातूर : यंदा खरीपातील हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तरी सोयाबीनच्या भावाने उचल खालेली नाही. (Reduction in soyabean prices)उलट गेल्या चार दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 400 ते 500 रुपयांनी दर घसरेले आहेत. (Latu Market) पावसाने खराब झालेल्या सोयाबीनची विक्री झाली आहे. आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला कमीच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सोयाबीनची आवक ही कमी होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढत असलेली आवक अचानक कमी झाली आहे. याचे कारण आहे शेतकऱ्यांना आशा आहे की, खरीपातील पिकांची (Farmers hope for compensation) नुकसानभरपाई दिवाळीच्या आगोदर जमा होईल याची. त्यामुळे बुधवारी केवळ 12 हजार क्विंटल सोयाबीनची आवक लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली होती.

पावसाने खराब झालेले सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला होता. मळणी झाली की खराब सोयाबीनची साठवणूक न करता थेट बाजारात आणले होते. कारण या सोयाबीनची साठवणूक केली तरी बुरशी लागून याचे नुकसानच होणार होते. पण आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनलाही 4 हजार 600 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीनस साठवणूकीवर भर देत आहे.

नुकसानभरपाई मिळण्याची आशा

सोयाबीनच्या आवक बद्दल लातूर येथील व्यापारी यांना विचारणा केली असता. आता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत मिळेल अशी आशा आहे. दोन दिवसांपूर्वी सोयाबीनची आवक ही 15 हजार क्विंटलपेक्षा अधिक होत होती मात्र, मंगळवारपासून आवक ही कमी होऊ लागली आहे. शिवाय पावसाने खराब झालेले सोयाबीनची शेतकऱ्यांनी विक्री केलेली आहे. तर चांगल्या प्रतीच्या सोयाबीन साठवणूकीवर शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. गतवर्षीपेक्षा बाजारात शुकशुकाट कायम आहे.

उडदाच्या दरात मात्र वाढच

हंगामाच्या सुरवातीपासून उडदाचे दर हे चढेच राहिलेले आहेत. आातपर्यंत 7 हजाराच्या खाली दर आलेले नाहीत. त्यामुले सोयाबीनने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी मात्र, उडदाने कसर भरु काढलेली आहे. मात्र, मराठवाड्यात उडदाचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. आवकही घटली आहे शिवाय भविष्यात दर वाढतील म्हणून शेतकरी हे साठवणूकीवर भर देत आहेत.

सोयाबीनची साठवणूक फायद्याची

सध्या सोयाबीनचे दर खालावले त्यामुळे डागाळलेल्या सोयाबीनची विक्री केली तरी चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची साठवणूक शेतकरी करु शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आताच पैशाची आवश्यकता नाही अशा शेतकऱ्यांनी साठवणूक करण्यास हरकत नसल्याचा सल्ला व्यापारी अशोक आग्रवाल यांनी दिला आहे. चांगले सोयाबीन साठवणूक करुन ठेवले तरी त्याला धोका निर्माण होत नाही. शिवाय शेतीमाल तारण योजनेचाही शेतकरी फायदा घेऊ शकतात.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6100 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6050 रुपये क्विंटल, पिंकू तूर 60000 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 5300, चना मिल 4800, सोयाबीन 5051, चमकी मूग 7150, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7300 एवढा राहिला होता. (Farmers hope for compensation, soyabean arrivals reduced in Latur market committee)

संबंधित बातम्या :

कांदा दराचा लहरीपणा, दर 3 हजारच्या खाली, आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

राज्यातील 150 साखर कारखान्यांना दिलासा, दिल्लीच्या बैठकीत प्राप्तिकरावर तोडगा

50% अनुदानावर करा शेळीपालन, पहिल्या टप्प्यात कोणत्या तीन जिल्ह्यांना मिळणार लाभ ?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.