शेतकऱ्यांना दिलासा : नविन तुरीला मिळणार योग्य दर, मात्र, संवर्धनाची घ्यावी लागणार काळजी

खरिपातील तूर अजूनही वावरातच आहे. मात्र, शेतातील तूर बाजारात येण्यापूर्वीच दराबाबत चर्चा होऊ लागली आहे. कारण खरिपातील कापूस वगळता एकाही शेतीमालाला योग्य दर मिळालेला नाही. ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे सोयाबीनप्रमाणेच तुरीचेही होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून तुरीचे दर हे स्थिर राहिलेले आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा : नविन तुरीला मिळणार योग्य दर, मात्र, संवर्धनाची घ्यावी लागणार काळजी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 2:12 PM

लातूर : खरिपातील तूर अजूनही वावरातच आहे. मात्र, शेतातील तूर बाजारात येण्यापूर्वीच दराबाबत चर्चा होऊ लागली आहे. कारण खरिपातील कापूस वगळता एकाही शेतीमालाला योग्य दर मिळालेला नाही. ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे सोयाबीनप्रमाणेच तुरीचेही होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून तुरीचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. तुरीला सरासरी 5400 ते 5600 चा दर मिळत आहे. शिवाय साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही आता खरेदीसाठी मोकळीकता मिळालेली आहे. त्यामुळे भविष्यात तुरीचे दर हे स्थिर राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

खरिपातील शेतमालाच्या दरात कायम चढःउतार हे पाहवयास मिळालेले आहेत. सोयाबीनचे दर मात्र, कायम घटलेले होते तर कापसाच्या दरात कायम सुधारणा झालेली आहे. आता तुरीचे काय होणार असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला आहे. मात्र, पावसामुळे तुरीचे नुकसान आणि फायदा अशा दोन्हीही बाबी घडलेल्या आहेत. मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी तर तुरीचा शेतामध्येच खराटा झाला. पण अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात तुर ही बहरली असून काही भागात किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मात्र, दर स्थिर राहिल्याने भविष्यात दर वाढतील अशी आशा आहे.

असे करा व्यवस्थापन, अन्यथा उत्पादनात घट

मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. * फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

आयात तुरीचे दर स्थिरावले

देशातील बाजारपेठेत गेल्या आठ दिवसांपासून तुरीचे दर हे स्थिर आहेत. एवढेच नाही तर सरकारने आयात केलेल्या तुरीचे दरही स्थिरच आहेत. मध्यंतरी कडधान्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुरीचीही मोठ्या प्रमाणात आयात केली होती. इतर देशातून तब्बल अडीच लाख टन तुर आयात केली जाणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, दिवाळीनंतर तुरीचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. त्यामुळे आवक नुसार भविष्यातही तुरीला भाव मिळणार आहे.

पुढील महिन्यापासून वाढणार आवक

तुर हे खरिपातील शेवटचे पिक आहे. सध्या तुर ही फुलोऱ्यात असून एक ते दीड महिन्यात नविन तुर ही बाजारात दाखल होणार आहे. शिवाय आता पावसाने उघडीप दिली असल्याने धोका नाही मात्र, वातावरण बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागलेला आहे. तुरीला 5500 ते 6900 पर्यंतचा दर मिळत आहे. दिवाळीत दरांमध्ये काहीशी वाढ झाल्यानंतर आता दर स्थिरावले आहेत. सध्या बाजारपेठेत गेल्या हंगामातील आणि आयात केलेल्या तुरीचा व्यापार होत आहे.

संबंधित बातम्या :

कामगंध सापळ्यातून कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे? व्यवस्थापनात सापळ्यांची भूमिका काय?

नुकसानभरपाई मिळण्यास आणेवारीचा अडसर, कशी ठरवली जाते आणेवारी ?

बळीराजा जागा हो : आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्ती नाही, उरले फक्त चार दिवस

https://www.youtube.com/c/TV9MarathiLive/videos

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.