काय म्हणता..! भंडाऱ्यातील शेतकऱ्यांकडे महावितरणची 225 कोटी रुपयांची थकबाकी, सवलतीचा लाभ घ्या अन्…

कृषीपंप धारकांकडून विजबील वसुली होत नाही हे वास्तव आहे. केवळ भंडाराच नाही तर संबंध राज्यातील जिल्ह्यांची हीच अवस्था आहे. वाढती थकबाकी लक्षात घेता आता महावितरण आणि राज्य सरकारने अनोखा फंडा काढला आहे. जो सबंध राज्यात राबवला जात आहे. कृषीपंपधारकांनी केवळ चालू विजबील अदा करायचे आहे आणि थकबाकीवरील व्याज आणि दंड यातून सुटका करुन घ्यायची आहे.

काय म्हणता..! भंडाऱ्यातील शेतकऱ्यांकडे महावितरणची 225 कोटी रुपयांची थकबाकी, सवलतीचा लाभ घ्या अन्...
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 6:08 PM

भंडारा : कृषीपंप धारकांकडून विजबील वसुली होत नाही हे वास्तव आहे. केवळ (Bhandara) भंडाराच नाही तर संबंध राज्यातील जिल्ह्यांची हीच अवस्था आहे. वाढती थकबाकी लक्षात घेता आता महावितरण आणि राज्य सरकारने अनोखा फंडा काढला आहे. जो सबंध राज्यात राबवला जात आहे. (agricultural pump dues) कृषीपंपधारकांनी केवळ चालू विजबील अदा करायचे आहे आणि थकबाकीवरील व्याज आणि दंड यातून सुटका करुन घ्यायची आहे. यामुळे शेतकऱ्यांवरचा भारही कमी होणार आहे आणि महावितरणचा थकबाकीचा आकडाही कमी होणार आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात 225 कोटी रुपयांची थकबाकी ही शेतकऱ्यांकडे आहे.

दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हे अडचणीत येत आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची विजतोडणी न करण्याचे आदेश हे सरकारचे असतात. त्यामुळे थकबाकीचा आकडा हा वाढत आहे. दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की वसुलीच्या अनुशंगाने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच ही योजना आहे.

शेतकरीही आर्थिक संकटात

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कृषीपंप वीज बिलाच्या थकबाकीमुक्तीसाठी 66 टक्के सूट देण्यात येत आहे. सर्वात आगोदर पुणे परीमंडळातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ घेतला आहे. शिवाय शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास अणखीन माफी मिळणार आहे.

असा मिळाला सवलतीचा लाभ

कृषीपंपधारकांकडे दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा हा वाढत आहे. शिवाय बिल भरुन घेण्यासाठी आतापर्यंत एक ना अनेक योजना महावितरणच्या माध्यमातून अवलंबण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने थेट विजबिलातच 66 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय थकबाकीवरील व्याज आणि दंडही आकारण्यात येणार नाही. शेतकऱ्यांसाठी थकबाकीतून मुक्त होण्याची संधी आहे. पण आजही मराठवाडा, विदर्भातील शेतकरी हे गांभिर्याने याकडे पाहत नाहीत. त्यामुळे थकबाकीचा आकडा हा वाढत आहे.

असे आहे भंडारा जिल्ह्याचे थकबाकीचे चित्र

भंडारा विभागात 4186 कृषि ग्राहकांनी 19 कोटी 40 लाख, मोहाड़ीत 6973 कृषि ग्राहकांनी 26 कोटी, पवनीत 9700 कृषि ग्राहकांनी 53 कोटी, तुमसर 5866 कृषि ग्राहकांनी 32 कोटी, लाखांदूर 6494 कृषि ग्राहकांनी 31 कोटी, लाखनी 6986 कृषि ग्राहकांनी 30 कोटी, साकोली 6536 कृषि ग्राहकांनी 94 कोटी इतकी थकबाक़ी आहे. भविष्यात ह्या थकित कृषि विज बिला पोटी महावितरणाद्वारे विज खंडित करण्याची मोहिम आयोजित केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

पुणे बाजार समितीमध्ये आता एकरकमी पार्कींग शुल्क, बंदचा निर्णय मागे

कृषीपंपधारकांना महावितरणकडून नवसंजिवनी, 12 लाख शेतकऱ्यांना विजबिलात सवलत

105 लाख टन ऊसाला 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, उतार कमीच

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.