‘फळबागा नको गांजा लावण्याची परवानगी द्या’ ; यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव

'पारंपारिक पिकाचे उत्पादन घेतले तर निसर्गाचा लहरीपणा फळबागांची लागवड केली तर वन्यप्राण्यांचा धोका. उत्पादनावर लाखोंचा खर्च अन् मेहनतही वाया यामुळे मला गांजाच लागवड करण्याची परवानगी द्या' हे वाक्य आहे वन्यप्राण्यांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचे. नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय आता जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा त्रास सुरु झाला आहे.

'फळबागा नको गांजा लावण्याची परवानगी द्या' ; यवतमाळमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव
यवतमाळ जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे फळबागांचे नुकसान
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 5:14 PM

यवतमाळ : ‘पारंपारिक पिकाचे उत्पादन घेतले तर निसर्गाचा लहरीपणा फळबागांची लागवड केली तर वन्यप्राण्यांचा धोका. उत्पादनावर लाखोंचा खर्च अन् मेहनतही वाया यामुळे मला गांजाच लागवड करण्याची परवानगी द्या‘ हे वाक्य आहे वन्यप्राण्यांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचे. नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय आता (Yavatmal, ) जिल्ह्यात (Wild animals nuisance) वन्य प्राण्यांचा त्रास सुरु झाला आहे. पावसामुळे पपई, केळीच्या बागाचे नुकसान तर झालेच आहे पण आता वन्यप्राणी थेट फळावरच डल्ला मारत आहेत. त्यामुळे यवतमाळ येथील शेतकरी हे त्रस्त झाले आहेत.

शेती व्यवसयात वन्य प्राण्यांचा उपद्रव ही एक मोठी समस्या झाली आहे. फळपिक ऐन बहरात आले की यांचा उपद्रव वाढतो. फळबागांची मोडतोड तर होतेच पण फळांचेही नुकसान होत आहे. हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तरप्रदेश येथील शेतकरीही त्रासलेले आहेत. यवतमाळ येथील शेतकरी अभय श्रीहरी काटेवार यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन 3 एकरामध्ये केळी आणि पपईची लागवड केली होती. आगोदर पावसाने नुकसान झाले आणि आता वन्यप्राण्यांमुळे.

त्यांना तब्बल 15 लाखाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे अभय काटेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चक्क गांज्या लागवडीचीच परवानगी मागितली आहे. पावसामुळे शेतात चिखल साचलेला आहे. अशातच वन्यप्राणी हे फळबागेची नासधूस करीत आहेत. त्यामुळे थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे.

15 लाखांचे नुकसान

वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे यवतमाळ जिल्ह्यातील फळबागाचे क्षेत्र हे घटत आहे. येथील किन्ही गावच्या अभय श्रीहरी काटेवार यांनी 5000 केळी आणि 5000 पपईची झाडे जोपासली होती. वेळोवेळी औषध फवारणी, पाण्याचे नियोजन आणि अथक परीश्रम त्यांनी घेतले होते. परंतु, लागूनच असलेल्या जंगलातून रानडूकरांचा उपद्रव वाढत आहे. रात्रीच्या वेळी रानडूकरे शेतात प्रवेश करतात आणि फळबागांचे नुकसान करीत आहेत. काटेवार यांनी सांगितले की, आतारर्यंत केळीची 1500 हजार आणि पपईच्या 2000 झाडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न पडला आहे.

कृषी विभागाकडून केवळ सर्वेक्षण

वन्य प्राण्यांचा दरवर्षीच त्रास होत असल्याने काटेकर यांनी चार महिन्यापूर्वीच वन विभागाला काहीतरी बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी तर दुर्लक्ष केले तर कृषी विभागाने केवळ सर्वेक्षण केले असून मदतीबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे एकूण क्षेत्रापैकी केवळ 10 टक्के क्षेत्रावर त्यांनी गांजा लावण्याची परवानगा मागितली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही नुकसान

केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्रच वन्यप्रण्यांचा उपद्रव वाढलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरीही वन्य प्राण्यांनी ग्रस्त आहेत. अलीकडेच चिमूर तहसीलमधील सोनगाव गावातील रहिवासी बाबा नावाच्या एका शेतकऱ्याने सांगितले होते की, त्यांची मका लागवड वन्य प्राण्यांनी पूर्णपणे नष्ट केली आहे. जगप्रसिद्ध ताडोबा राइज पार्क चिमूर गावाला लागून आहे, त्यामुळे कधी कधी वन्य प्राणी जवळच्या शेतात प्रवेश करतात. (Farmers in Yavatmal district suffer as wild animals damage orchards due to nuisance)

संबंधित बातम्या :

आता पावसाचा नव्हे, कमी तापमानाचा धोका, पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

सोयाबीनच्या घसरत्या दरात शेतकऱ्यांनी ‘असे’ करावे नियोजन, कृषितज्ञांचा सल्ला

शेतीसाठी पाणी हवंय, मग ‘ही’ प्रक्रीया केल्यावरच मिळणार हक्काचे पाणी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.