Nanded : बंद हरभरा केंद्रासमोरही शेतकऱ्यांच्या रांगा, नाफेडच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांना फटका

रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात वाढ झाल्याने खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर हे घसरले. परिणामी शेतकऱ्यांना नाफेड च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्राचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे यंदा खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्रमी आवक झाली. असे असतानाच मुदतीपुर्वीच खरेदी केंद्र ही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रति क्विटलमागे शेतकऱ्यांचे 1 हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कारण खुल्या बाजारपेठेत हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल असा दर आहे तर खरेदी केंद्रावर 5 हजार 300 असा दर निश्चित झाला आहे.

Nanded : बंद हरभरा केंद्रासमोरही शेतकऱ्यांच्या रांगा, नाफेडच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांना फटका
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 1:23 PM

नांदेड : हंगामाच्या सुरवातीला (NAFED) ‘नाफेड’ने उभारलेल्या  खरेदी केंद्रावर (Chickpea Crop) हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. आता 2 महिन्यानंतर चित्र बदलले गेले आहे. आता शेतकरीच हरभरा विक्रीच्या प्रतिक्षेत खरेदी केंद्राच्या दारात तासंनतास् बसून राहत आहेत. (Shopping Center) खरेदी केंद्र बंद होण्यासाठी सहा दिवसाचा आवधी असतनाच राज्यातील सर्वच केंद्र ही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नोंदणी केलेला हरभरा विक्री तरी करायचा कुठे असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. 29 मे पर्यंत हरभरा खरेदी केंद्र ही सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. याकरिता अजून एक दिवसाचा आवधी असल्याने शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ठाण मांडूनच आहेत.

दरात तफावत, शेतकऱ्यांचे नुकसान

रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात वाढ झाल्याने खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर हे घसरले. परिणामी शेतकऱ्यांना नाफेड च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्राचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे यंदा खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्रमी आवक झाली. असे असतानाच मुदतीपुर्वीच खरेदी केंद्र ही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रति क्विटलमागे शेतकऱ्यांचे 1 हजार रुपयांचे नुकसान होत आहे. कारण खुल्या बाजारपेठेत हरभरा 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल असा दर आहे तर खरेदी केंद्रावर 5 हजार 300 असा दर निश्चित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला असतानाच खरेदी केंद्रच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

खरेदी केंद्रासमोर वाहनांच्या रांगा

खुल्या बाजारात हरभऱ्याची विक्री केल्यावर क्विंटलमागे 1 हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे उशिरा का होईना हमीभाव केंद्रावर हरभऱ्याची विक्री होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे खरेदी केंद्राला टाळे असतनाही केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाफेडवर हरभरा विकण्यासाठी दिवसरात्र एक करत शेतकरी खरेदी केंद्राबाहेर ठाण मांडून बसले आहेत. शिवाय नाफेडनेही मुदतीपुर्वीच खरेदी का बंद केली याबाबत स्पष्टीकरण दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता कायम आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपाची लगबग असताना कामांचा खोळंबा

सध्या शेत शिवारामध्ये खरिपपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती पावसाची. पूर्व मशागतीची कामे उरकून पेरणीसाठी शेत हे तयार ठेवावे लागणार आहे. पेरणीचा हंगाम जवळ आल्याने हरभरा विकून बी-बियाण्याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येतंय, त्यासाठी भाड्याने वाहन आणून शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. मात्र नाफेडचा काहीही निर्णय होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाफेडची भूमिका स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.