दिवाळी आली, तरीही कपाशी खरेदीला मुहूर्त मिळेना, वर्ध्यात कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल
दिवाळी जवळ आली. त्यामुळे कापूस खरेदीला लवकर सुरुवात व्हावी, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे (Farmers register their name to CCI for cotton sell but government not buying yet)
वर्धा : सोयाबीन हातचे गेल्यावर आता विदर्भातील शेतकऱ्यांची भिस्त कपाशीच्या पिकावर आहे. कपाशीसाठी सीसीआयकडे जिल्ह्यातील 62 हजार 624 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पण नोंदणीची मुदत संपल्यामुळे नोंदणीला पूर्णविराम मिळाला. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा कपाशीचा पहिला वेचा घरात पडून आहे. त्यामुळे कपाशीच्या खरेदीला मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. दरम्यान, दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कापूस खरेदी सुरु होण्याची आस आहे (Farmers register their name to CCI for cotton sell but government not buying yet).
वर्धा जिल्ह्यात मागील वर्षी 50 हजार 134 शेतकऱ्यांची सीसीआयकडे नोंदणी झाली होती. नोंदणी झालेले आणि न झालेल्या एकूण 1 लाख 75 हजार 159 शेतकऱ्यांनी आपला कापूस खरेदी केंद्रांना विकला होता. कोरोनाच्या संकटात शेतकरी कपाशीच्या खरेदीसाठी त्रस्त झाला होता. अखेर तडजोड करीत खरेदी केंद्रावरुन युद्ध स्तरावर कपाशीची खरेदी करण्यात आली. पण यावर्षी अजूनही खरेदी सुरु झालेली नाही. मागील वर्षी 32 लाख 20 हजार 590 क्विंटल इतका कापूस खरेदी करण्यात आला होता.
या हंगामातील कपाशी खरेदी सुरु व्हायची आहे. आतापर्यंत 62 हजार 624 इतक्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. कपाशीच्या खरेदीसाठी सेलू, समुद्रपूर, आर्वी, हिंगणघाट, देवळी, कोंढाळी आणि वायगाव अशा सात केंद्राची आखणी करण्यात आली आहे. कारंजा आणि पुलगाव येथे फेडरेशनकडे खरेदीची जबाबदारी देण्यात आली आहे (Farmers register their name to CCI for cotton sell but government not buying yet).
तालुकानिहाय शेतकऱ्यांची नोंदणी
वर्धा – 7541 आर्वी – 5038 आष्टी – 5927 हिंगणघाट – 14392 समुद्रपूर – 7858 सेलू – 8998 देवळी – 12870
शेतकऱ्याने कापूस वेचून आपल्या घरी ठेवला आहे. काहींनी शेतात साठवून ठेवला आहे. साठवलेल्या या कापसात बोंडअळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर कापूस विकून दिवाळी करण्याची लगबग शेतकऱ्याला लागली आहे. कपाशी घरी असल्याने त्यात जर बोंडअळी झाली तर त्याचा त्रास इतर शेजारील शेतकऱ्यांनादेखील होणार आहे. त्यामुळे कापूस खरेदी सुरु व्हावी हीच मागणी शेतकरी करीत आहे.
हेही वाचा : मणिपूरचा प्रसिद्ध काळा तांदूळ धुळ्यात, अभिनव प्रयोगाने शेती फुलवली