लाळ्या-खुरकूताने 35 जनावरे दगावली ; अशी घ्या जनावरांची काळजी
सध्या पश्चिम महाराष्ट्रात या रोगाची लागण जनावरांना झालेली आहे. सांगली जिल्ह्यात तर लहान-मोठी अशी 35 जनावरे ही दगावली आहेत तर 100 जनावरांना लागण झालेली आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण मोहिमेलाही खंड पडला होता. यंदा मात्र पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाला सुरवातही झाली होती. मात्र, सांगली जिल्ह्यातील या घटनेनंतर हा विभाग खडबडून जागा झाला आहे.
सांगली : थंडीला सुरवात झाली की, जनावरांना लाळ्य़ा-खुरकूतची लागण होण्यास सुरवात होते. हा संसर्गजन्य रोग असल्याने अल्पावधीतच याचा प्रादुर्भावही वाढतो. सध्या पश्चिम महाराष्ट्रात या रोगाची लागण जनावरांना झालेली आहे. सांगली जिल्ह्यात तर लहान-मोठी अशी 35 जनावरे ही दगावली आहेत तर 100 जनावरांना लागण झालेली आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण मोहिमेलाही खंड पडला होता. यंदा मात्र पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाला सुरवातही झाली होती. मात्र, सांगली जिल्ह्यातील या घटनेनंतर हा विभाग खडबडून जागा झाला आहे.
लागण झालेल्य़ा जनावरांवर उपचार सुरु आहेत तर जिल्हाभर लसीकरणालाही सुरवात झाली आहे. हिवाळ्यात हा रोग अधिक बळावतो. प्रतिबंधात्मक उपायय़ोजना म्हणून काय करता येईल याची माहिती शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे…सांगली जिल्ह्यातील आटपाडी, भिंगेवाडी या भागात रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिवाळा सुरु झाली की काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती आपण घेणार आहोत…
पाच किलोमिटर परिसरातील जनावरांचे लसीकरण
सांगली जिल्ह्यातील आटपाडी, भिंगेवाडी येथे लाळ्या-खुरकूताचा प्रादुर्भाव वाढत आहे. खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून पाच किमी अंतरावरील जनावरांचे लसीकरण केले जात आहे. शिवाय ज्या जनावरांना लागण झाली आहे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहिम सुरु असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. किरण पराग यांनी सांगितले आहे.
ही आहेत लाळ्या खुरकुताची लक्षणे
* खुरकुताची लागण झाली की जनावर हे शांत राहते नियमितपणे चारा खात नाही पाणी पिणे बंद करते तर दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते. * या दरम्यानच्या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात तर गाभण जनावराच्या मागच्या पायात हे फोड आले तर अपंगत्वसुध्दा येऊ शकते.
हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
* आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जीभेवर घासली जाते. मात्र, असे न करता जर या आजाराची साथच सुरु असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. किंवा ज्या जनावराला आजार झाला आहे त्याच्या शेजारी निरोगी जनावर हे बांधू नये किंवा त्याचा चाराही त्याला देऊ नये कारण लाळ्या आजार हा लाळेपासूनच पसरतो. * लाळ्या खुरकत झालेल्या जनावरांपासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्याची स्वतंत्र सोय करावी * ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी. * जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत. भांड्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल. * जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही. * लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणासाठी लसीकरण हे सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे. (Farmers should take care that animals are infected with infectious diseases in winter)
संबंधित बातम्या :
कापूस विका पण गरजेपुरता अन् उरलेल्या कापसाचे ‘सोनं’ करा, शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला
दुष्काळात तेरावा : शॉर्टसर्किटने 10 एकरातील ऊसाचा फड जळून खाक ; लाखोंचे नुकसान