आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय आहे रणनीती?
शासन दरबारी पीक विम्याची मागणी करुनही तोडगा निघत नसल्याने आता बीड तालुक्यात एक वेगळाच पर्याय अवलंबला जात आहे. यापूर्वी 2020-21 चा पीक विमा सरसकट देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. केवळ आश्वासनांची बोळवण करण्यात आली पण प्रत्यक्षात अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आता गावागावात जनअंदोलन उभारले जात आहे.
बीड : शासन दरबारी पीक विम्याची मागणी करुनही तोडगा निघत नसल्याने आता बीड तालुक्यात एक वेगळाच पर्याय अवलंबला जात आहे. यापूर्वी 2020-21 चा (Crop Insurance) पीक विमा सरसकट देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. केवळ आश्वासनांची बोळवण करण्यात आली पण प्रत्यक्षात अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आता गावागावात जनअंदोलन उभारले जात आहे. त्याच अनुशंगाने सोमवारी (Beed) बीड तालुक्यातील 52 गावांमध्ये (Farmer) शेतकरी एकजूटीच्या घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले.
पीक विम्याची काय आहे स्थिती?
पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनाच विमा रक्कम मिळालेली नाही. शिवाय हे एका वर्षाचे नाही तर गेल्या 3 वर्षापासूनच हीच अवस्था आहे. 2018 मध्ये 5 हजार, 2020 मध्ये तर 4 लाख आणि आता 2021 मध्ये 30 हजार शेतकरी हे विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी ऑनलाईन-ऑफलाईन तक्रारी दाखल केलेल्या आहेत. शिवाय जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनाही निवेदन दिले आहे. मात्र, आश्वासनापलिकडे काहीच मिळालेले नाही. विमा कंपनीचे प्रतिनीधी जिल्ह्यात फिरकच नसल्याने दाद कुणाकडे मागावी हा प्रश्न आहे. यासंबंधीचे वृत्त दै. दिव्य मराठीने प्रकाशित केले आहे.
आता एकजूटीचाच विजय होईल : धनंजय गुंदेकर
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही अशी अवस्था झाली आहे. जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे अधिकचे नुकसान होऊन शेतकरी हक्काच्या पैशापासून वंचित आहेत. त्यामुळे सुरवातीला जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. असे असूनही विमा रक्कम मिळत नसल्याने आता गावस्तरावरच आंदोलन उभारले जाणार आहे. पहिल्या वेळी बीड तालुक्यातील 52 गावांमधील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये वाढ होऊन हे एक जनअंदोलन केले जाणार आहे. हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय माघार नाही असे धनंजय गुंदेकर यांनी सांगितले आहे.
तक्रारी दाखल करुनही परतावा नाही
ज्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही अशांनी तक्रारी दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय, पीक विमा कंपनीचे कार्यालय तसेच ग्रामपंचायत या ठिकाणी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तक्रारी दाखल करुन आता महिना उलटला तरी कोणतीच कारवाई झालेली नाही. यासंबंधी ना अधिकारी काही सांगत आहेत ना विमा कंपनीचे प्रतिनीधी. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
संबंधित बातम्या :
Carrot : कवलापूरच्या गाजराची चवच न्यारी, काय आहे गावच्या पाण्याचा गुणधर्म, वाचा सविस्तर
काळाच्या ओघात शेती व्यवसयाचे बदलते स्वरुप, हवामान तज्ञांचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला
अवकाळीची अवकृपा : पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे, शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतिक्षा