Onion | उन्हाळी हंगामातील कांद्याच्या ‘झळा’ शेतकऱ्यांनाच, आठ महिने साठवणूक करुनही पदरी काय पडले?

उन्हाळी हंगामातील कांदा आता अखेरच्या टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याची साठवणूक, योग्य निगराणी आणि त्यासाठीचा लागणारा खर्च असे सर्वकाही करुनही यंदा उन्हाळी कांद्यातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. साठवणूक करताच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा सडला होता.

Onion | उन्हाळी हंगामातील कांद्याच्या 'झळा' शेतकऱ्यांनाच, आठ महिने साठवणूक करुनही पदरी काय पडले?
भारत देशातून कांद्याची निर्यात वाढली आहे.
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 4:49 PM

नाशिक : उन्हाळी हंगामातील कांदा आता अखेरच्या टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याची साठवणूक, योग्य निगराणी आणि त्यासाठीचा लागणारा खर्च असे सर्वकाही करुनही यंदा उन्हाळी कांद्यातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. साठवणूक करताच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे कांदा सडला होता. त्यामुळे नुकसान हे पहिल्यापासूनच झालेले आहे. लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंद झाली आहे. संपूर्ण हंगामात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी घेतलेले परीश्रम हे वेगळेच.

आवक अंतिम टप्प्यात असताना वाढले दर

निसर्गाची तर साथ नाहीच पण बाजारपेठेतील बदलते सुत्रही शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे. मार्च महिन्यात कांदा काढणीपूर्व झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले होते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कांदा डिसेंबरपर्यंत साठवून त्याची टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी विक्री केली. परंतू यामधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. नंतर पुन्हा ऑगस्टपासून वातावरणातील बदलामुळे साठवलेल्या कांदा अधिक प्रमाणात सडला गेला. आता उन्हाळी हंगामातील कांदा संपत असताना दरात सुधारणा होत आहे हे विशेष. त्यामुळे संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरलेला आहे.

सरकारने योग्य धोरण ठरवले तरच फायद्याचे..

कांदा दराबाबत कायम अनिश्चितता राहिलेली आहे. त्यामुळे कांदा हे नगदी पीक असले तरी तेवढेच बेभरवशाचे. त्यामुळे किमान निर्यातीबाबत तरी सरकारने धोरण ठरवणे गरजेचे आहे. वाहतूकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अपेक्षित निर्यातही होत नाही. कधी वाहतूकीतील अडचण तर कधी दरात होणारे बदल यामुळे कायम नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कंटेनरची कमी उपलब्धता, इंधन दरवाढ अडचणीची ठरली. त्यातच निर्यात धोरण स्थिर नसल्याने मागणीचा फटका बसतो आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी दोन्ही घटक अडचणीत राहिले. शेतकरी व व्यापारी हंगाम अडचणींचा ठरला आहे.

आठ महिने साठणूक तरीही निराशाच

उन्हाळी हंगामातील कांद्याची आठ महिने साठवणूकच नाही तर योग्य काळजी घेऊनही शेवटी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. वातावरणातील बदल, अवकाळीमुळे कांद्याची सड, झालेले नुकसान हे पाहता उन्हाळी कांद्यातून उत्पन्नापेक्षा नुकसानच अधिकचे झाले आहे. आता साठणूकीतला कांदा अंतिम टप्प्यात आहे. किमान सरकारने धोरणे बदलून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

Chemical fertilizer : रब्बी हंगामात दुहेरी संकट, रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हतबल

कृषी आयुक्तांची एक सुचना अन् हळद लागवडीचे गुपीत आले बाहेर, उत्पादन वाढीबाबत काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला ?

शासनाला जमले नाही ते नाम फाऊंडेशनने करुन दाखवले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना असा ‘हा’ मदतीचा हात

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.