Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरीप-रब्बी बेभरवश्याचीच, आता शाश्वत शेतीसाठी ‘हाच’ शेतकऱ्यांकडे पर्याय…!

काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी बदल केला पण पीक पध्दतीमध्ये न केलेल्या बदलामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आला आहे. पण आता कमी पाण्यात अधिकचे उत्पादन असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकरी स्वत:हून पुढे येत आहेत.

खरीप-रब्बी बेभरवश्याचीच, आता शाश्वत शेतीसाठी 'हाच' शेतकऱ्यांकडे पर्याय...!
शेती पध्दतीमध्ये बदल होऊन आता शेतकऱ्यांचा कल तुती लागवडीकडे आहे. राज्यात तुती लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.
Follow us
| Updated on: Nov 30, 2021 | 11:58 AM

सोलापूर : वातावरणातील बदल तर कधी बाजारभावाची अनिश्चितता यामुळे शेतकरी कायम अडचणीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तर निसर्गाच्या लहरीपणामुळे अधिकचा खर्च आणि उत्पादन कमी अशीच अवस्था आहे. काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी बदल केला पण पीक पध्दतीमध्ये न केलेल्या बदलामुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आला आहे. पण आता कमी पाण्यात अधिकचे उत्पादन असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकरी स्वत:हून पुढे येत आहेत. सध्या सबंध राज्यात महारेशीम शिबीर सुरु आहे. त्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी यामध्ये सहभागी होत आहेत. या रेशीम अभियनात पुणे विभागात तसेच खानदेश व ठाणे येथील 1288 शेतकऱ्यांनी 1304 एकरावर तुतीच्या लागवडीसाठी नोंदणी केली आहे.

यंदा विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या रेशीम अभियनात सर्वच विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी मराठवाड्यातील बीड, जालना येथे हे अभियान पार पडले असून आता पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकरी नोंदणी करीत आहेत.

कमी पाण्यात अधिकचे उत्पादन

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आजही पाण्याची समस्या कायम आहे. शिवाय निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेत मिळत नसलेला दर यामुळे शेतकऱ्यांना गरज आहे ती शाश्वत पिकाची. हाच पर्याय आता रेशीम शेतीतून शेतकऱ्यांसमोर राहणार आहे. पुणे विभागात दहा जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे, नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुतीचे लागवड क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे रेषीम कोषाच्या उत्पादनात वाढ होत आहे. तुती लागवडीसंदर्भात मराठवाडा विभागातही जनजागृती करण्यात आली असून याचा परिणाम पुढील वर्षी पाहवयास मिळणार आहे. कमी पाण्यात अधिकचे उत्पादन पदरी पडत असल्याने शेतकरी याकडे लक्ष केंद्रीत करीत आहेत.

फळबागा आणि तुतीची लागवड

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच आहे. विशेष करुन जे शेतकरी केवळ रब्बी- खऱीप हंगामावरच लक्ष केंद्रीत करीत होते. त्यांच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आता फळबाग आणि तुती लागवडीवर भर देत आहेत. पुणे प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत असलेल्या विभागांना यंदा 1600 एक्कर तुती लागवडीचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यामुळे पिकपध्दतीमध्ये तर बदल होत आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होत असल्याने रेशीम शेतीचे महत्व शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे.

काय आहे अभियानाचा उद्देश?

दरवर्षी तुतीच्या लागवडीचा लक्षांक जिल्ह्याला ठरवून दिलेला असतो तर तो पूर्ण करण्याची जबाबदारीही संचानलयाच्या कर्मचाऱ्यांवरच असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पट करणे, लागवडीपूर्वी प्रशिक्षण देणे, वेळेत शेतकऱ्यांची नोंदणी करणे, वेळेत नर्सरी तयार करण्यासाठीची पूर्वतयारी करणे, मनरेगाच्या प्रस्तावास ग्रामसभेचा ठराव घेणे, लेबर बजेट मंजूर करून घेणे, प्रस्तावास तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी, कार्याला मंजूरी वेळेत प्राप्त करून घेणे, पोकरासारख्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करून अंमलबजावणी करणे, रेशीम उद्योगासंबंधीच्या इतर योजनांचा प्रसार करणे आदी उदेश हे महारेशीम अभियानातून साध्य केले जाणार आहेत.

संबंधित बातम्या :

मागणी एकाची, मदत दुसऱ्यालाच, भूमिहीन नागरिकाच्या खात्यावर अतिवृष्टीचे 825 रुपये अनुदान, काय आहे नेमका प्रकार?

वातावरणातील बदलाने रब्बी हंगामाच धोक्यात, योग्य व्यवस्थापन केले तरच पिके पदरात, अन्यथा…

महाराष्ट्रातील शेतकरी ‘लई भारी’, राष्ट्रीय कृषी बाजार योजनेत 12 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.