Rabi Season | शेतकऱ्यांनो स्पर्धेत भाग घ्या अन् हजारोंची बक्षीसे मिळवा, जाणून घ्या सर्वकाही

शासकीय स्तरावर उत्पादनवाढीसाठी सर्वकाही प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत अनुदान, योजना यासारखे अनेक उपक्रम राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहेत. पण रब्बी हंगामात चर्चा आहे ती पीक स्पर्धेची. हो या हंगामात ज्या शेतकऱ्यांने अधिकचे पीक घेतले आहे त्यांना प्रशासनाच्यावतीने बक्षीस दिले जाणार आहे.

Rabi Season | शेतकऱ्यांनो स्पर्धेत भाग घ्या अन् हजारोंची बक्षीसे मिळवा, जाणून घ्या सर्वकाही
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 11:49 AM

लातूर : शासकीय स्तरावर उत्पादनवाढीसाठी सर्वकाही प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत अनुदान, योजना यासारखे अनेक उपक्रम राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहेत. पण ( Rabi season) रब्बी हंगामात चर्चा आहे ती पीक स्पर्धेची. हो या हंगामात ज्या शेतकऱ्यांने अधिकचे पीक घेतले आहे त्यांना प्रशासनाच्यावतीने बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेची प्रक्रिया ही सुरु झाली असून हंगामातील  (production growth competition) उत्पादन वाढावे हाच यामागचा उद्देश राहिलेला आहे. मात्र, यामध्ये काही अटींचे पालन करुन शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत ही 31 डिसेंबर असणार आहे.

काय आहेत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अटी?

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यास किमान 10 आर जमिनक्षेत्रावर पिक घेणे गरजेचे आहे. यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई ,जवस, तीळ या पिकांचा समावेश राहणार आहे. या स्पर्धेतून माघार घ्यावयाची असल्यास पीक कापणीच्या 15 दिवस आगोदर माघार घेतल्याचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी सांगावे लागणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी ही 300 रुपये असणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर ही राहणार आहे.

असे असणार बक्षीसांचे स्वरुप

ही स्पर्धा राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकापातळीवर राहणार आहे. पिकनिहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे बक्षीसांचे स्वरुप राहणार आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार असे राहणार आहे. जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे 5 हजार रुपये राहणार आहे. विभागीय पातळीवर पहिले 25 हजार, द्वितीय 20 हजार तर तिसरे 15 हजार रुपये राहणार आहे. विभागीय स्तरावर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे बक्षीस हे 30 हजार राहणार आहे.

या स्पर्धेची काय आहेत वैशिष्ट्ये

या स्पर्धेत सर्वच शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे केवळ शेतकऱ्यांच्या नावावर जमिन आणि तो स्वत: मेहनत करीत असलेला पाहिजे. एका शेतकऱ्यास एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांच्या स्पर्धेसाठी सहभागी होता येणार आहे. आदिवासी आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा स्वतंत्र घेण्यात येणार आहे. एका तालुक्यातून किमान 15 शेतकऱ्यांचे अर्ज येणे अपेक्षित आहे. अन्यथा पैसे परत करुन ही स्पर्धा रद्द केली जाणार आहे.

स्पर्धेसाठी नोंदणी कुठे करायची?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी कार्यालयाकडून एक अर्ज दिला जात आहे. या अर्जासोबत, 300 रुपये प्रवेश फी, 7/12, 8 ‘अ’ चा उतारा, जात प्रमाणपत्र या कागदपत्रांची आवश्यकता असून हा अर्ज शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत तालुका कृषी कार्यालयात सादर करावा लागणार आहे.

संबंधित बातम्य़ा :

Positve News | रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, थंडीच्या कडाक्यात बहरतोय हरभरा

यवतमाळची जरबेराची फुलं थेट नवी दिल्ली ते हैदराबादच्या बाजारपेठेत, तीन मित्रांची गोष्ट, आत्महत्याग्रस्त जिल्हा ही ओळख पुसण्याचा निर्धार

Pik Vima : विमा कंपन्यांचे पहिले पाढे सुरु ; मनमानी कारभारामुळेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.