बलीप्रतिपदेच्या दिवशी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मूठमाती

शेतकरी ज्या प्रश्नासाठी झगडत आहे त्याचे प्रश्न घेऊन लातूर जिल्ह्यातील औसा येथे शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने शोषक, दमनकारी सरकार व्यवस्थेचा निषेध म्हणून बलीप्रतिपदेच्या दिनी बळीराजाच्या कल्याणकारी व्यवस्थेचे पुनरुत्थान व्हावे व पोशिंद्याची लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मूठमाती देण्यात आली.

बलीप्रतिपदेच्या दिवशी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मूठमाती
बलीप्रतिपदेच्या दिवशी औसा येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मूठमाती
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 3:55 PM

लातूर : दिवाळीच्या पाडव्याचे कोण काय मुहूर्त साधेल याचा नियम नाही. कोणी नविन व्यवसायाला सुरवात करते तर कोणी वाहनाची खरेदी मात्र, शेतकरी ज्या प्रश्नासाठी झगडत आहे त्याचे प्रश्न घेऊन लातूर (latur) जिल्ह्यातील औसा येथे (Farmers’ Association) शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने शोषक, दमनकारी सरकार व्यवस्थेचा निषेध म्हणून बलीप्रतिपदेच्या दिनी बळीराजाच्या कल्याणकारी व्यवस्थेचे पुनरुत्थान व्हावे व पोशिंद्याची लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मूठमाती देण्यात आली.

(Government Policy) सरकारची धोरणे शेतकऱ्यांविरोधी असून ती अन्यायकारक आहेत. शेती मालाचे दर, नुकसानभरपाई, हमीभाव यामध्ये शेतकऱ्यांची काही भुमिका नसून जे सरकारच्या वतीने लादले जाईल तेच आपले म्हणण्याची वेळ ह्या बळीराजावर आलेली आहे. एकेकाळी राजा असलेला शेतकरी आज देशोधडीला लागला आहे. सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आजच्या पाडव्याचे मुहूर्त साधून प्रतिकात्मक पुतळ्याची मूठमाती केली आहे.

सरकारचे धोरण..शेतकऱ्यांचे मरण

शेतकरी विरोधी कायद्यांची निर्मिती करुन शेती क्षेत्रात निर्यात बंदी, अनावश्यक आयात, गरीबांच्या नावाखाली उद्योगांना कच्चा माल कमी किंमतीत उपलब्ध व्हावा यासाठी अनावश्यक हस्तक्षेप करुन शेतीमालाचे भाव पाडण्याचे काम केले आहे.यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरुन न निघाल्याने त्यांना नाविलाजाने कर्जबाजारी होऊन दारिद्र्यात जगावे लागत आहे. खरीपाच्या पेरणीवेळी सोयाबीनचे दर 10 ते 12 हजारांच्या दरम्यान होते.परंतू सरकारने लगेच सोयापेंडीची आयात केली, साठवणूकीवर मर्यादा घातली. यामुळे सोयाबीन 12 हजारांहून 5 हजारांवर आले. अशा या शोषक व्यवस्थेचे आतापर्यंत सुमारे 5 लाख शेतकरी बळी गेले आहेत.

सरकारच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

वामणाच्या व्यवस्थेप्रमाणेच सध्याच्या सरकारची धोरणे आहेत. त्यामुळे शेती व्यवसयात प्रगती तर सोडाच मात्र, कुटूंबाचा उदरनिर्वाह करु शकत नाही. हीच वामणाची कार्यप्रणाली सध्या सरकार राबवत आहे. कधीकाळी शेतकरी हा बळीराजा होता. मात्र, वामणाच्या या व्यवस्थेमुळे बिघडलेल्या शेती व्यवसयाची धोरणे आजही तशीच आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मूठमाती देण्याचे काम आज औसा येथे शेतकरी संघटनेने केले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, संघटनेचे उपाध्यक्ष वसंत आबा कंदगुळे, धोंडीराम पाटील,बब्रुवान धुमाळ,करण भोसले,दत्तु कंदगुळे, ज्ञानोबा मुस्के आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनी साधले पाडव्याचे मुहूर्त, लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक अन् दरही…

सोयाबीननंतर आता खरिपातील ‘हे’ पीक धोक्यात, काय आहे उपाययोजना ?

थंडी सुरु होताच लाळ्या खुरकताचा धोका वाढला, जनावरांची योग्य देखभाल हाच उत्तम पर्याय

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.