Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati: काळ्या आईची सेवा अन् शेती बांधावरच मिळाला पुरस्कार, अमरावतीच्या शेतकऱ्याचे वेगळेपण काय?

धामनगाव तालुक्यातील रमेशराव साखरकर हे केवळ शेतामध्ये राबतच नाहीतर वेगवेगळे प्रयोगही करतात. उत्पादनवाढीसाठी काळाच्या ओघात शेती व्यवसायात बदल झाला असला तरी साखरकर यांनी गावरान बियाणाकडे दुर्लक्ष केले नाही. गावरान देशी बियाणेचे संवर्धन व जतन व निर्मितीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आतापर्यंत गावराण बियाणांच्या माध्यमातून त्यांनी शेती तर केलीच पण इतरांना गावरान बियाणे वापरण्यास भाग पाडले आहे.

Amravati: काळ्या आईची सेवा अन् शेती बांधावरच मिळाला पुरस्कार, अमरावतीच्या शेतकऱ्याचे वेगळेपण काय?
कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा राजीव गांधी कृषी विज्ञान मंडळाच्या व सत्कर करण्यात आला आहे.
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:35 AM

अमरावती :  (Farming) शेती व्यवसायाच उल्लेखनीय काम केल्याबद्दल शेतकऱ्यांचा सन्मान हा होतोच. या निमित्ताने शेतकऱ्याने दिलेले योगदान तर सर्वांसमोर येतेच पण अनेकजण यातून प्रेरणाही घेतात. अशाच शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची परंपरा (Rajiv Gandhi Agricultural Science) राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने जोपासली जात आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करुन शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी राबवण्याच्या उद्देशाने दरवर्षी राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान केला जातो. विशेष म्हणजे (Farmers’ Experiments) शेतकऱ्यांचा वेगळा प्रयोग तर यामाध्यमातून समोर तर यतोच पण विशेष म्हणजे ही संस्था थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पुरस्काराचे वितरण करते. यंदाचा हा पुरस्कार धामनगाव तालुक्यातील भिल्ली येथील रमेशराव साखऱकर यांना देण्यात आला आहे. काळ्या आईची सेवा त्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान यामुळे त्याचे वेगळेपण जपून आहे.

गावरान बियाणेमुळे पुरस्कार प्रदान

धामनगाव तालुक्यातील रमेशराव साखरकर हे केवळ शेतामध्ये राबतच नाहीतर वेगवेगळे प्रयोगही करतात. उत्पादनवाढीसाठी काळाच्या ओघात शेती व्यवसायात बदल झाला असला तरी साखरकर यांनी गावरान बियाणाकडे दुर्लक्ष केले नाही. गावरान देशी बियाणेचे संवर्धन व जतन व निर्मितीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आतापर्यंत गावराण बियाणांच्या माध्यमातून त्यांनी शेती तर केलीच पण इतरांना गावरान बियाणे वापरण्यास भाग पाडले आहे. प्राकृतिक पोषण आहारासाठी गावरान बियाणांशिवाय पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कार्याची दखल

कृषी क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या अनेकांना शासनाच्या माध्यमातून पुरस्काराचे वितरण होते. मात्र, राबायचं शेतामध्ये आणि पुरस्कार प्रदान होणार शहरांमध्ये. त्यामुळे काळ्या आईची सेवा शेतकऱ्यांनी कोणकोणत्या माध्यमातून केली आहे. त्याचा कितपत फायदा इतर शेतकऱ्यांना झाला आहे. याचा अभ्यास करुन हा पुरस्कार प्रदान केला जोता. विशेष म्हणजे, पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन हा पुरस्कार दिला जातो.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांच्या बांधावर हेच वेगळेपण

विविध क्षेत्रातील नागरिकांना शेतीसाठी काय योगदान दिले आहे याचा अभ्यास राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने केला जातो. त्याचअनुशंगाने अमरावती जिल्ह्यातील गावरान बियाणांची साठणूक करणारे रमेशराव साखरकर तसेच उत्कृष्ट तिफणकरी म्हणून तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील सुभाष राऊत या शेतकऱ्याला देण्यात आला. यावेळी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रकाशदादा साबळे तसेच शेतकरी निवड समितीचे सदस्य मा.प्रा.दिलीप काळे,मा.अविनाशजी पांडे, नितीन दगडकर,महेंद्र रोंघे,ऐनूला खान, नामदेवराव वैद्य, गोपाळराव धोटे उपस्थित होते.

.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले
.. अन् सुनील तटकरे मंत्रालयाकडे पायीच निघाले.
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा
'भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही...’, मनसे नेत्याचा इशारा.
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.