ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट, हंगाम अंतिम टप्प्यात तरीही ऊस शेतातच उभा
पोषक वातावरणामुळे ऊसाच्या क्षेत्रात आणि आता उत्पादनातही वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वकाही अलबेल असे नाही. वावरातला ऊस कारखान्यावर घालण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत आहे. ऊस सर्वसाधारण 12 महिन्यांमध्ये कारखान्यावर जाणे अपेक्षित आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मात्र, 15 महिने उलटूनही शेतकऱ्यांचा ऊस हा शेतातच उभा आहे.
लातूर : पोषक वातावरणामुळे ऊसाच्या क्षेत्रात आणि आता उत्पादनातही वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वकाही अलबेल असे नाही. वावरातला (Sugarcane) ऊस कारखान्यावर घालण्यासाठी (Farmer) शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत आहे. ऊस सर्वसाधारण 12 महिन्यांमध्ये कारखान्यावर जाणे अपेक्षित आहे. (Latur) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मात्र, 15 महिने उलटूनही शेतकऱ्यांचा ऊस हा शेतातच उभा आहे. त्यामुळे ऊसाला तुरे फुटले आहेत तर हा ऊस उंदरे पोखऱत आहेत. एकीकडे ऊसाच्या उत्पादनामुळे मांजरा पट्यातील शेतकरी हा सधन होत आहे तर दुसरीकडे त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे. वेळेत ऊसाचे गाळप झाले नाही तर उत्पादनात मोठी घट होणार आहे.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
नोंद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस दोन महिने उशिरा का होईना कारखाने गाळप करतील की नाही अशी भीती निर्माण झाली असून कारखान्याच्या गट कार्यालयात शेतकरी खेटे घालत आहेत. निलंगा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या उसाची नोंद कारखान्यांकडे केली नसल्यामुळे तर काही सभासद नसल्यामुळे व उत्पन्नातील होणाऱ्या तोट्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निलंग्यातील शेतकऱ्यांची भिस्त असणारा जागृती कारखाना आहे. मांजरा परिवातील कारखाने उसाला योग्य भाव देतात. मात्र, 13-14 महिने झाले तरी कारखाने ऊस गाळपाला घेऊन जात नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
ऊसाच्या उतारावर होणार परिणाम
10 ते 11 महिन्याचा ऊसाचे जर गाळप झाले तर उतारा चांगला पडतो. म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होते. निलंगा तालुक्यात तर 13 ते 14 महिन्याचा ऊसही अजून उभाच आहे. त्यामुळे ऊसाला तुरा फुटला आहे तर पोंग फुटल्याने त्याचा परिणाम हा आता उतारावर होणार आहे. शिवाय ऊसाची तोड होण्यास विलंब झाला तर पुन्हा साखर कारखान्यांकडूनही दुर्लक्ष केले जाते. मांजरा नदीलगतच्या भागातील शेतकरी हे ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. यंदा अतिवृष्टीमुळे इतर पिकांचे नुकसान झाले पण ऊस जोपासला गेला. पण आता कारखाना तोडणीच करीत नसल्याने या भरवश्याच्या पिकाचेही नुकसानच होऊ लागले आहे.
तालुक्यात एक कारखाना तोही बंद अवस्थेत
ऊस उत्पादक सभासदांकडून पर्याय म्हणून तालुक्यातील हलगरा येथी हनुमान खांडसरी कारखान्याकडे पाहिले जात आहेत. मात्र, यांच्याकडे सुद्धा वेटिंग लागल्यामुळे चकरा मारून शेतकरी हैराण झाला आहे. शेताला रस्ते झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी योग्य वेळी म्हणजे आक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड केली असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडला आहे. निलंगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तालुक्याच्या हक्काचा अंबुलगा सहकारी साखर कारखाना होता. मात्र, तो अनेक वर्षांपासून बंद आहे.